दशावतार 5 ( वामनावतार ) भाग ६, (१० ते ११)

मास्याला नदीत सोडल्यावर तो मासा नदीत देखील तीव्र वेगाने वाढू लागला. त्यामुळे पाण्याचा प्रवाह रोखला गेला. नदीकाठचे गावे वाहून जाऊ लागले. द्रविड राज्यात हाकार माजला. जे लोक वाचले............

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

मास्याला नदीत सोडल्यावर तो मासा नदीत देखील तीव्र वेगाने वाढू लागला. त्यामुळे पाण्याचा प्रवाह रोखला गेला. नदीकाठचे गावे वाहून जाऊ लागले. द्रविड राज्यात हाकार माजला. जे लोक वाचले…………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!!  दशावतार ( वामनावतार ) !!! 

!!!  दशावतार ( वामनावतार )  !!!

भाग – ११.

               एक दिवस वामनदेव बळीकडे आले. ती ब्रह्मतेजमय मूर्ती पाहून उपस्थित सगळे लोक त्यांच्याकडे आकृष्ट झाले. त्या तेजस्वी बाल मूर्तीला पाहून बळींच्या मनात स्नेहभाव  उत्पन्न निर्माण झाला. बळीने स्वतः त्यांना आसनस्थ केले. त्यांची चरण धुवून पूजा केली. नैवेद्य म्हणून मधूपर्क दिला. त्याकाळी कोण्या माननीय व्यक्तीचे स्वागत अशाच प्रकारे करण्याची प्रथा होती.

         वामनदेवांनी बळीराजाची, त्याच्या पूर्वजांच्या कीर्तीची आपल्या मधुर कंठाने स्तुती करू लागले. हिरण्यकश्यपूची वीरता, प्रल्हादाची भक्ती, विरोचनाची दानशूरता, बळीराजाच्या यज्ञाची दातृत्वाची, विनयता, सौजन्यता वगैरे गुणांची इतकी भरभरून कौतुक केले की, सर्व लोक मंत्रमुग्ध झाले. त्यांना वाटले आज हे वामन रुपी नारायण काहीतरी मोठी वस्तू घेतल्याशिवाय राहणार नाही.

            वामन देवांचे तेजस्वी रूप पाहून बळीराजा प्रभावित होऊन अत्यंत नम्रपणे म्हणाले, प्रभो, आपण माझ्याकडून काही दान ग्रहण केल्यास मी कृतर्थ होईल. वामन देव म्हणाले, तुमच्या दातृत्वाची कीर्ती ऐकून मी छोटीशी इच्छा मनी धरून आपल्याकडे आलो आहे. मला फक्त तीन पावले जमीन हवी आहे.

                  बळीराजा म्हणाले, प्रभो, आपण बालक असल्यामुळे आपल्याला समजत नसेल,  मी त्रिभुवनचा राजा आहे. मी काहीही देण्यास समर्थ आहे. असे काहीतरी माझा की तुम्हाला आयुष्यात पुन्हा काही कोणाला मागायची गरजच राहणार नाही.

             वामन देव म्हणाले, तृप्ती, समाधान मनाचे असते. मी समाधानी आहे.  इंद्रिय माझ्या वश आहे. त्यामुळे मला तीन पावले जमीन मिळाली की मी संतुष्ट होईल. ठीक आहे. तुमची इच्छा. असे म्हणून तीन पावले भूमी दान करण्यासाठी हातात जल घेणार तोच  आतापर्यंत चुपचाप सगळा वार्तालाप ऐकत असलेले शुक्राचार्यांनी मनोमन जाणले, हे बालक रुपातील कुणी देवता आहे. त्यांनी बळींना भूमिदान करण्यापासून मनाई केली. परंतु अभिमानी राजा बळीने त्यांचे ऐकले नाही. म्हणाले, एक वेळ दानाचा संकल्प सोडल्यावर माघार घेण्याचा प्रश्नच नाही. मी प्रल्हादांचा नातू आणि विरोचनाचा पुत्र आहे. माझ्या पितामहांनी बालपणी अत्यंत कष्ट सहन केले. पित्याने ज्या सत्यासाठी प्राणत्याग केले त्यांच्याच वंश मी कोणत्याही स्थितीत माघार घेणार नाही.

           जरी हे छद्मी वेशातील देवता असले तरी माझे काय नुकसान होईल? सत्याचे पालन करून मला सद्गतीच मिळेल. जीवाच्या भीतीने सत्यापासून विचलित होऊन मला नरकाचा धनी व्हायचे नाही. असे म्हणून त्यांनी कमंडलू उचलून जल सोडण्यासाठी हाती घेतले. तोच राजा ऐकत नाहीसे पाहून शुक्राचार्यांनी सूक्ष्मरूप धारण करून झारीच्या तोटीत जाऊन बसले. तोटेतून पाणी येत नाहीसे पाहून छिद्र मोकळे करण्यासाठी राजाने तृणाची काडी तोटीत घुसवू लागले. आत असलेल्या शुक्राचार्यांना जखम होऊन एक डोळा फुटला. क्रोधाने आतूनच त्यांनी बळींना शाप दिला,  ” तू श्री पासून भ्रष्ट होशील.”

          बळीराजांनी वेदमंत्रात वामदेवांना तीन पावले भूमी देण्यास सज्ज झाले. आणि वामदेवता एकदम परिवर्तित झाले. त्यांनी एका पावलात संपूर्ण पृथ्वी आवळून घेतली. दुसऱ्या पावलात आकाश झाकून घेतले. तिसरे पाऊल कुठे ठेवू म्हणून ते बळीराजाला विचारू लागले. उपस्थित सगळे मोठ्या भीतीने आतंकित झाले. बळीराजा किंकर्तव्यमुढ झाले. त्यांना काही सुचत नव्हते. वामन देव त्यांना डिवचून म्हणाले, तुम्ही जर वचनभंग केले तर नरकात जायला तयार व्हा. असे म्हणून वामनांनी देवदूतांना आवाहन केल्यावर वर ते येऊन बळीराजाला बांधले. आपल्या राजाची ही स्थिती, दूर्दशा पाहून त्यांनी मायावीरुपाने वामनांवर आक्रमण केले. परंतु बळीने त्यांना रोखले. संपूर्ण राज्यात हाहाकार माजला.

        त्यावेळी भक्त प्रल्हाद निर्जन स्थळी श्रीकृष्णाच्या ध्यानात मग्न होते. संकटग्रस्त बळीने  आर्ततेने त्यांचे स्मरण करताच त्यांची समाधी भंग पावली. तात्काळ बळीच्या राज्यसभेत पोहोचले. तिथे नारायणाची मूर्ती पाहून भाव-विभोर होऊन ते देवांची स्तुती करताना पाहून, वामनदेव तीव्र स्वरात बळी वचन पूर्ण करत नसल्याचे सांगितले. प्रल्हाद वामनाची स्तुती करत म्हणाले, प्रभो, बळी दाताचे रूपात तो अहंकार ग्रस्त झाला आहे. परंतु ऋषींनाही दुर्लभ असे आपले दर्शन त्याला झाले. वचनभंग होणार नाही. आपला तिसरा पाय बळीच्या मस्तकी ठेवून त्याचे सत्यभंगापासून रक्षण करावे.

                    आता बळीचा अहंकार चूरचूर झाला.  श्रीहरीच्या कृपेने  त्यांची मनचक्षु उघडले. संपूर्ण शरणागती पत्करून बळींनी वामन देवाच्या चरणावर स्वतःला झोकून दिले. भक्त वत्सल नारायणाने आपला तिसरा पाय बळीच्या मस्तकावर ठेवून त्याच्या वचनाची लाज राखली. प्रसन्न होऊन म्हणाले, बळीराजा तुम्ही पाताळात निवास करा. आजपासून नेहमीसाठी अमर राहाल. आणि मी हाती गदा घेऊन तुमच्या द्वारावर रक्षक म्हणून पहारा करीन. आत्म समर्पण केलेल्या बळींना परमेश्वराची अगाध कृपा प्राप्त होऊन कृतकृत्य झाले. देवतागण पुन्हा स्वर्गात जाऊन आपले राज्य उपभोगू लागले.

        बळीचे गर्वहरण करून वामन देवाने युग धर्माचा प्रचार केला. असुरांचे संकट दूर करून लोक शांतमय जीवन जगू लागले.

             क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
               दि. १७-१०-२०२३.

                भाग – १०.

                हिरण्यकश्यपूच्या वधा नंतर प्रल्हाद दैत्यांचा राजा झाला. त्याचा पुत्र विरोचन मोठा झाल्यावर त्यांचे वर राज्यकारभार सोपवून प्रल्हाद भजन, पूजन, साधनेत आपला वेळ व्यतीत करू लागले. विरोचन मोठा शूरवीर होता. तसेच त्याच्यात दातृत्वही होते. पण दातृत्वाचा त्याला अभिमान होता. एक दिवस देवताने ब्राह्मण वेशात येऊन त्याच्या आयुष्याची भिक्षा मागितली. आणि विरोचनने स्वतःचे आयुष्य दान करून देहत्याग केला. त्याच्यानंतर त्याचा पुत्र बळी राजा झाला.  बळीराजा खूप धार्मिक होता. परंतु वंश दोषामुळे तो देवांचा विरोधक होता. ईर्षा वाढत गेली. देवांबरोबर त्याचे युद्ध झाले. त्यात तो अतिशय जखमी झाल्यामुळे पराजित झाला.

            भृगुवंशाचे ब्राह्मण बळीराजाचे पुरोहित होते. ते मोठे तपस्वी होते. त्यांनी आपल्या योग बलाने बळीराजाला दुरुस्त केले. त्यांनी बळीराजाकडून विश्वजीत यज्ञ करवला. त्या यज्ञामुळे बळीराजाला विश्वविजय प्राप्त करण्याची शक्ती निर्माण झाली. त्यामुळे देवांबरोबर त्याचा विरोध वाढतच गेला. बळीने स्वर्गावर आक्रमण केले. भृगुवंशी ब्राह्मणाच्या साह्यतेने बळीराजाला मोठी शक्ती संचय झाल्यामुळे त्याला हरवणे अशक्य होते. म्हणून देवांचे गुरु बृहस्पतीने देवांना सल्ला दिला, तुम्ही युद्धातून अंग काढून घ्या. आणि स्वर्गलोक सोडून मृत्यूलोकांत गुप्तपणे राहून स्वतःचे संरक्षण करा. कालांतराने असुरांची शक्ती नष्ट झाली की परत येऊन स्वर्गावर आपला अधिकार स्थापित करा.

          देवगण स्वर्ग सोडून निघून गेले. बळी स्वर्गाचे राजा झाले. भृगुवंशी पुरोहिताच्या सल्ल्याने बळीराजांनी शंभर यज्ञाचे अनुष्ठान करून ते इंद्राच्या बरोबरीचे झाले.

      बळीराजा आपला वंश गौरव व स्वतःचा गौरव वाढवण्यासाठी तसेच धर्मरक्षणार्थ गोरगरिबांना व ब्राह्मणांना मुक्तहस्ते दान करू लागले. दान करत करत त्याची लालसा इतकी वाढली की त्यांनी संपूर्ण राज्यात दवंडी पेटवली की, त्यांना जे काही मागतील जी इच्छा असेल ती पूर्ण होईल. तिन्ही लोकांतील गोरगरीब, निर्जनांचे कष्ट दूर झाले. सगळे आनंदात राहू लागले. चहुदिशांनी त्याच्या दातृत्वाची कीर्ती वाढू लागली. त्याचा जयजयकार होऊ लागला. बळीराजा धार्मिक आणि दाता होते पण त्याचबरोबर त्यांच्या अहंकारही तेवढाच तीव्रतेने वाढू लागला. विरोधक कुणीच राहिला नाही. मनमानी करू लागला. त्याचा परिणाम ते धर्म पथापासून विचलित झाले. बळीच्या गौरवाने उचल खाऊन असुरगण लोकांवर अत्याचार करू लागेल. बळीराजाला हे सर्व दिसत होते. पण आपले प्रभुत्व कायम राखण्यासाठी आपल्या लोकांचा मानमरातब कायम राखण्यासाठी ते दुर्लक्ष करीत होते. परंतु प्रल्हादाचे रक्त बळीच्या शरीरात असल्यामुळे त्याचा लगाव धार्मिकतेकडे होता. मात्र बाकीचे असूर भोगातच लिप्त होते.

         कश्यपपत्नी अदिती देवतांची आई होती. असुरांच्या भयामुळे देवगण स्वर्ग सोडून गुप्त वेशात मोठ्या कष्टात जीवन व्यतीत करीत आहे हे पाहून अदिती खूप दुःखी होती. कश्यप रात्रंदिवस तपस्येत  मग्न असल्यामुळे आपल्या पुत्रांच्या सुखदुःखाची त्यांना पर्वा नव्हती. परंतु आदिती आपले पुत्र कष्टमय जीवन व्यतीत करत असलेले पाहून ती आपल्या पती कश्यपांना विनवणी करू लागली. तिची व्याकुलता पाहून कश्यपांनी तिला तपश्चर्या करायला सांगितले. अदितीने घोर तपश्चर्या केली. तिच्या तपश्चर्याने संतुष्ट होऊन नारायणांनी तिला वर मागण्या सांगितला. अदिती म्हणाली, हे प्रभू, पुत्रांचे दुःख माझेने पाहावल्या जात नाही. त्यांच्या शत्रूचा बिमोड करून मला कृतर्थ करावे.

             नारायण म्हणाले, असुरांच्या कुकर्माचा क्षय झाल्याशिवाय त्यांचा विनाश असंभव आहे. तुला प्रतिक्षा करावी लागेल. युग धर्माची स्थापना करण्यासाठी मी तुझ्या पोटी जन्म घेऊन असुरांना स्वर्गातून पळून लावेल. पण ही गोष्ट कोणाला सांगू नकोस.

               आदिती रात्रंदिवस नारायणाच्या आराधनेत मग्न राहू लागली. काही दिवसांनी तिने ब्रम्हतेजाने युक्त अशा बालकाला जन्म दिला. ते बाळ पाच वर्षाचे झाल्यावर कश्यपांनी त्याला गायत्री मंत्राची दीक्षा प्रदान केली. अल्पावधीत ते बाळ सर्व विद्येत पारंगत झाले. त्या बाळाचे वय वाढले पण शरीर मात्र पाच वर्षाच्या बालकासारखे राहिले. म्हणून त्याला ‘वामन” म्हणून संबोधल्या जाऊ लागले.

           नर्मदा तीरावर भृगुकच्छ नावाचे एक सुंदर रमणीय  स्थान होते. तिथे बळीराजांनी अश्वमेध यज्ञ केला. यज्ञाचे यजमानपद दैत्य गुरु शुक्राचार्यांनी केले. त्या यज्ञाला विश्वातील समस्त विद्वान ब्राह्मण उपस्थित होते. विविध भागातून कितीतरी ब्राह्मण, गरीब लोक बळीराजाच्या यज्ञात येऊन स्वेच्छानुसार दान घेऊन  त्यांना आशीर्वाद देऊन तृप्त होऊन परत जात होते. अन्नदान, वस्त्रदान, भूदान, गोदान सर्व प्रकारचे दान दिले जात होते. चाहू दिशांनी बळीराजाचा जयजयकार होत होता.

          क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
               दि. १७-१०-२०२३.

दशावतार ( मत्स्यावतार ) संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading