
आज *मंदोदरी* मंचकावर पहुडली होती. सकाळपासुनच तीला फार अस्वस्थ वाटत होते. बाहेर वातावरण सुध्दा कुंद होते. सगळीकडे उदासीनता व्यापुन आहे अस तीला वाटत होते. सारखी तगमग होत होती तीच्या जीवाची. ते तीचे पहिले गर्भाधान होते. त्यामुळे सर्वजण आनंदात होते तीला जपत होते.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! सीता चरित्र !!!
!!सीता !!
*सीताः*
*भागः-१*
आज *मंदोदरी* मंचकावर पहुडली होती. सकाळपासुनच तीला फार अस्वस्थ वाटत होते. बाहेर वातावरण सुध्दा कुंद होते. सगळीकडे उदासीनता व्यापुन आहे अस तीला वाटत होते. सारखी तगमग होत होती तीच्या जीवाची. ते तीचे पहिले गर्भाधान होते. त्यामुळे सर्वजण आनंदात होते तीला जपत होते. पण आज अचानक तीच्यावर उदासीनतेची छाया पसरली होती. अशातच दुपारी तीच्या सासुचे राजमाता रावणाची माता कैकसीने तीला बोलावण्याचा निरोप आला. अतिथी कक्षात एका अनोळखी व्यक्तिसह त्या मंदोदरीची प्रतिक्षा करीत होत्या. राजमातेने त्याची ओळख आर्यवर्तातून आलेला एक द्रष्टा ज्योतिषी असल्याचे सांगितले. तो केवळ मुखावलोकन करुन भविष्यकथन करतो, म्हणुन सुनेच्या उदरात वाढणार्या वंशांकुराबद्दल भविष्य सांगण्यास सांगीतले.
ज्योतिष्याने मंदोदरीच्या मुखाचे आणि हस्तरेषांचे बरेच निरिक्षण केल्यावर एकाएकी तो गप्प झाला.
कैकसीने त्याला त्याच्या सुरक्षिततेबद्दल आश्वस्त केले आणि जे असेल ते सांगण्याचा आग्रह केला. तेव्हा त्याच्या मुखातुन भयानक भविष्यवाणी बाहेर पडली….. *राणीच्या पोटी कन्यारत्न जन्मास येईल आणि त्या कन्येमुळे लंकापतीचा सर्वनाश ओढवेल.*
ताडीघाताप्रमाणे ते शब्द बाहेर पडताच मंदोदरी आणि केकसीचा थरकाप उडाला. दोघींचेही चेहरे पांढरे फटक पडले. हळुहळु कैकसीच्या भयाची जागा क्रोधाने घेतली. तिच्या डोळ्यात अंगार फुलला. करड्या स्वरात म्हणाली देवकृपेने तुला पुत्रच होईल आणि जर कन्या झालीच, तर समुद्रात तीचे तर्पन करीन.
सासुच्या तोंडची ती महाभयंकर वाणी ऐकुन मंदोदरी थरथर कापायला लागली. या बाबतीत पतीला रावणाला यातले अक्षरही समजता कामा नये अशी सक्त ताकीद दिल्यामुळे तीच्या मनाचा असह्य कोंडमारा सोशित दिवस व्यतीत करणे भाग होते. त्या जन्माला न आलेल्या अर्भकाच्या काळजीने तीचा जीव आक्रसून गेला. सर्वासमोर विशेषतः पति रावणासमोर हसतमुख, सहज राहण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मनातील अस्वस्थता लपत नव्हती. मग एकांतात जाऊन ती ओक्सीबोक्सी रडायची.
अशाच व्याकुळ अवस्थेत तीला ती कल्पना, युक्ती सुचली आणि कार्यान्वित करण्याचा निश्चय पक्का केला. तीच्या पितृगृहातुन खास तिच्या सेवेसाठी गुणम्बिका व तिचा पति उर्जयन दोघे मंदोदरीच्या सेवेसाठी पाठवले होते. त्यांची मदत घेण्याचा निश्चय केल्यावर तीला थोडी शांतता लाभली. थोडी चैन पडली.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
*सीताः-*
*भागः-२*
मंदोदरी आणी गुणम्बिकेचे हितगुज, खलबत झाले व ठरले की, जर कन्या झाली तर इथुनच *तीचे गुप्तपणे स्थलांतर करायचे.* आर्यवर्तात उर्जयनने जाऊन कन्येसाठी योग्य जागेची निवड करण्याचे ठरले. त्याप्रमाणे तो आर्यवर्तात जाऊन *मिथिलेचा राजा जनक* हे रावणाच्या कन्येला आपली मानण्यास तयार असल्याची बातमी मंदोदरीला सांगीतली.
जेव्हा एकांतात जनक राजाची आणि उर्जयनची भेट झाली व स्वतःची ओळख मयाचा सेवक असल्याचे सांगीतले. “मयनायकाच्या कन्येचा विवाह लंकाधिश *रावणाशी* झाला. पाठराखण म्हणुन मी व माझी पत्नी, *गुणाबिका* उभयतांना मयाने मंदोदरीकडे पाठविले. आज मंदोदरीचा दूत म्हणुन आपल्याकडे आलो आहे.”
“मयकन्येवर आलेल्या दुर्घट प्रसंगाचे आपणच निराकरण करु शकता. मंदोदरीसमोर दोनच पर्याय आहेत, एक तर स्वतःच्या अपत्याचे बलीदान किंवा त्याला कायमचे दुरावणे. कमीत कमी दुसर्या पर्यायात कन्या दूर कां होईना जिवंत तरी राहील.”
जनकाकडुन कन्येचा स्विकार करण्याचे आश्वासन मिळाल्याने मंदोदरीला बराच धीर आला. तरी मनातील हुरहुर कायम होतीच.
मंदोदरीचे सात मास पुर्ण होताच ती जास्तीत जास्त अंतःगृहात राहु लागली. तीथे फक्त गुणम्बिकेशिवाय कोणीच जात नसत. एखादे वेळी कैकसी विचारपूस व तिचे निरिक्षण करीत असे. मंदोदरीची प्रसुती झाल्याबरोबर गुणम्बिका लागलीच *पशुपतिच्या दर्शनाला* जाणार अशी वदंता पसरवली गेली. मंदोदरी प्रसुत होताच तात्काळ निघण्याचा *संकल्प* तीने केला होता.
अखेर एका मध्यरात्री सारी लंकानगरी निद्रिस्त असतांना मंदोदरीने कन्येला जन्म दिला. बेत ठरल्याप्रमाणे सकाळी स्वतः गुणम्बिकेने राजमातेला वार्ता दिली की, मंदोदरीने अपरात्री मृत कन्येला जन्म दिला. रुढीप्रमाणे मातापित्यांनी मृत अपत्याचे मुखावलोकन करण्याआधीच तो देह समुद्रात विसर्जीत केला. कैकसीने सुटकेचा निश्वास टाकला. टळले एकदाचे संकट असे तीला वाटले, पण तीला काय माहिती नियती तिच्यावर हसत आहे.
त्याचवेळी उर्जयन सागर ओलांडुन त्याच्या असलेल्या शिसवी पेटीतल्या उबदार अंथरुणात नुकतीच जन्मलेली मंदोदरीची कन्या घेऊन दंडकारण्याच्या दक्षिण किनार्यावर प्रविष्ट झाला. तिथेच गुणम्बिका लंकेहून येऊन दोघेही मिथिलेच्या प्रवासास निघण्याचे ठरले होते.
सागराने वेढलेल्या दक्षिणेच्या भूमीवर रुजलेले रोप उत्तरेला गंगेच्या किनार्यावर नेऊन लावायचे होते. गुणम्बिका व उर्जयन एका खडतर महाप्रवासाला निघाले होते. पेटीत निद्रिस्त असलेल्या मंदोदरीची ठेव, तीची फुलासारखी जपणुक करायची होती.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
*सीताः-*
*भागः-३*
शेकडो कोस दूर असलेल्या, सर्व अडचणीवर मात करुन *दंडकारण्य* पार करायचे होते. शिसवी पेटीत उबदार अंथरुणात *नवजात बालिका* निद्रा घेत सुस्त पहुडली होती. आत हवा जाण्यासाठी पेटीच्या झाकणास दोन छिद्रे ठेवली होती.
मजल दर मजल करत प्रवास सुरु होता. ज्या गावात जात तीथे बालीकेला दुध पाजणार्या मातेचा शोध घेऊन त्यांना बदल्यात सुवर्ण मुद्रा देऊन राजी करत. असे करत करत प्रवास सुरु होता.
मिथिलेला पोहचेपर्यत मंदोदरीची कन्या सहा महिन्यांची झाली. प्रवासाचा शेवटचा टप्पा पुर्ण झाला होता. *जनक राजाच्या* पुर्वसुचनेनुसार *उर्जयन* जनकराजाला भेटायला गेला. त्यांनी प्रवासाचा संपुर्ण आणि सखोल तपशील विचारल्यावर त्यांचे समाधान झाले. ते उर्जयनला म्हणाले, “प्रासादाच्या पश्चिमेकडल्या जमीनीची नांगरणी सुरु आहे. सुर्योदयापुर्वी ती पेटी त्या नांगरलेल्या भूमीत नेऊन ठेव. नांगरणी करण्यास आलेल्या भूदासांना ती पेटी सापडली की, अर्थातच ते माझे जवळ आणुन देतील.”
ठरल्याप्रमाणे उर्जयन नांगरलेल्या शेतात छोटा खळगा उकरुन ती पेटी त्यात ठेवली. अंतःकरणावर दगड ठेवुन सहा महिने फुलांसारखी जपलेल्या राजकन्येला सोडतांना त्याचे पोटात गलबलुन आले. तिथुन बर्याच अंतरावर जाऊन तो पेटीवर नजर राहील अशा ठिकाणी लपुन राहिला. थोड्याच वेळात तीथे गर्दी झालेली व त्या बालीकेची पेटी जनकराजाच्या राजप्रसादाच्या दिशेने नेतांना त्याने बघीतले आणि निश्चींत मनाने माघारी परतला.
अशा तर्हेने ती बालीका *भूमीकन्या सीता* म्हणुन जनक राजाकडे कलेकलेने वाढु लागली. तीच्या बाललीलांत सर्व दंग होते. अशातच तीला तीन बहिणींची प्राप्ती झाली. *ऊर्मिला, मांडवी, श्रृतिका.*
वास्तविक सीतेचे पुर्व जन्मीचे नांव *वेदवती* होते. विष्णुपती मिळावा म्हणुन तपश्चर्या करीत असतांना रावणाने तीला भ्रष्ट केले होते. ती प्रक्षोभित होऊन अग्निप्रवेश करण्याआधी रावणाला शाप दिला की, ” *पुढच्या जन्मी तुझ्याच पोटी जन्म घेऊन तुझा व तुझ्या साम्राज्याचा सर्वनाश करीन.* “
जवळ जवळ एक वर्षाच्या कालावधीनंतर उर्जयन व गुणम्बिका लंकेत येऊन पोहचले. मंदोदरी त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. कन्येबद्दलची माहिती ऐकण्यास व्याकुळ, कासाविस आणि अतिशय उत्सुक झाली होती. जेव्हा तीची कन्या जनकराजाच्या घरी सुखरुप पोहचवल्याबद्दलचा वृतांत कळला तेव्हा कन्येला वाचवल्याबद्दल, निदान कुठे का होईना सुखरुप जिवंत राहिल या बद्दल तीला समाधान वाटले.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
*सीता*
*भाग – ४*
इकडे गंगा परिक्रमणाच्या निमित्ताने उत्तरेत भ्रमंती करणार्या विश्वामित्र कांही दिवस अयोध्यात मुक्कामास असतांना *युवा वीर युद्धविशारद द्वय* म्हणुन सार्या आर्यवर्तात ख्याती असलेले *राम लक्ष्मण* त्यांच्या दृष्टीस पडले. राम आणि लक्ष्मणास *चम्पारण्यात* पाठविण्यास त्यांनी राजा दशरथास विनंती केली. कारण चम्पारण्यात *ताटीकेने* कहर केला होता. दंडकारण्यात घुसून ऋषि – मुनींचा ती निःपात करी. तीच्या भयाने अनेक आश्रम ओस पडले होते. विंध्य सीमेलगतच्या आर्य प्रदेशात तीने हाहाःकार माजवला होता. मुनीगण आपल्या शिष्यांसह उत्तरेकडे प्रयाण करु लागले. परंतु जिद्दी व आग्रही विश्वामित्र हार मानण्यास तयार नव्हते. त्या जिद्दीपोटीच आज राम लक्ष्मणाला ताटीकेचा वध करण्यास उद्युक्त केले.
*स्री हत्या कशी करावी?* असा संदेह मनात असुनही रामाने तीचा वध केला. तीचे दफन करण्यापुर्वी तीच्या गळ्यातील सुवर्णाची राजमुद्रा आणि भला मोठा लोह ताईत रामाच्या गळ्यात घालीत विश्वमित्र रामाला म्हणाले तुझ्या आजच्या पराक्रमाची खुण तुझेजवळ ठेव.
विश्वामित्र रामाला म्हणाले, “तू आर्यवंशाचा मानबिंदु आहेस. सार्या आर्यवर्तास पुरुन उरेल एवढी संपती लंका नामक बेटावर केंद्रीत झाली आहे. आम्ही स्वतःला उच्चवर्णी आर्य समजतो पण सुधारणा कांहीच नाही. दंडकारण्य प्रदेश आर्यवर्ताहुन मोठा आहे व त्यावर रावणाची सत्ता आहे पण तो भोग विलासात दंग असल्यामुळे प्रजेसाठी तो काहीही करीत नाही. वास्तविक रावण वेदविद्यापारंगत, मोठा संगीत तज्ञ आहे. त्याच्या सारखा विद्वान आणि कलावंत राजकर्ता त्रिभुवनात नाही. पण लोकपालक या अर्थाने राजा म्हणवुन घेण्यास तो सर्वस्वी अपात्र आहे.”
ते पुढे म्हणाले, “ताटीका ही सुकेतू नामक यक्षप्रमुखाची कन्या. तीचा विवाह सुंद नामक राक्षसवीराशी झाला. त्याच्यापासुन तिला मारीच नावाचा पुत्र झाला. अगस्ती मुनींच्या छात्रांबरोबर झालेल्या लढाईत सुंद राक्षसाचा वध झाल्यावर ती पुत्राला घेऊन जनस्थानाला गेली. तीथे तिच्या दिमतीला सैन्यदल देऊन तीची सीमारक्षक म्हणुन नियुक्ती केली होती.”
विश्वामित्रांनी राम लक्ष्मणाला त्यांच्या पुर्वजांची बरीच माहीती सांगीतली. आक्रमक आणि आक्रमित या सार्यांनी या संघर्षात ज्यांची जीवनेच्छा अधिक टिकाव धरुन अडचणींवर मात करुन आर्यवंश जेत्याची धारणा धरतील तेच तग धरु शकतात, असे सांगितले.
हे सर्व ऐकल्यावर लक्ष्मणाला, राम म्हणाले आर्यवर्तात सुवर्ण युगाची प्रभा पसरविण्यासाठी आपल्या दोघांना कटीबध्द व्हावे लागेल.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
*सीता*
*भाग – ५*
विश्वामित्राच्या सानिध्यात असलेले राम लक्ष्मण अयोध्येस घरी जाण्यास उत्सुक झाले होते, परंतु उद्या *मिथिलेस* जायचे आहे असे सांगीतल्यामुळे दोघेही थोडे हिरमुसले. विश्वामित्रांनी त्यांना सांगीतले की, जनकराजाची *भूमिजा कन्येचे* स्वयंवर आहे, त्यासाठी जायचे आहे. रामाला प्रश्न पडला की, ” *भूभर्गातुन माणसाचे अपत्य जन्मास कसे येऊ शकते?*”
विश्वामित्र त्या दोघांना आर्यवंशाचा पुर्वेतिहास ऐकवीत एका राजकुमाराची एक *स्वयंपूर्ण स्वयंसिध्द पुरुष* घडवित होते. विश्वामित्र हे *एक चालते बोलते ज्ञानपीठ* होते. राजकुलात जन्म घेऊनही त्यांनी राजकुलाचा त्याग करुन आपली तीव्र ज्ञानलालसा आणि असीम महत्वाकांक्षा, वेळ पडल्यास आपल्या ज्ञानाचा शस्रासारखा उपयोग ते करीत.
चम्पारण्यापासुन मिथिलेपर्यतचा प्रवास करीत असतांना त्यांना अत्यंत विदारक अनुभव गौतम मुनिंच्या आश्रमात आला. तेथील निःस्तब्ध वातावरण पाहुन रामाला अहिल्येबद्दल ऐकण्याची उत्सुकता आहे हे विश्वामित्रांनी जाणले. त्यांनी जास्त संभ्रमात न ठेवता सांगण्यास सुरुवात केली. पन्नास वर्षापुर्वी गंगाकिनार्यावरल्या या आश्रमातील तरुण असलेले गौतम मुनिंना एकदा उष्मा असह्य झाल्याने दुपारी नदीवर गेले असता नदीमधे एक अरण्यवासी यौवना जलक्रिडा करीत मत्स्य कन्येप्रमाणे पाण्यात विहार करीत असलेली दृष्टीस पडली. तीला पाहताच गौतम मुनि तिच्यावर मोहित झालेत. गणनायकाशी बोलणी करुन एका गोरज मुहुर्तावर ते तिच्याशी विवाहबध्द झाले, आणि तीचे *अहिल्या* असे नामकरण केले.
अहिल्येशी विवाह करतांना तीचे मन कुठे गुंतले असेल का? याचा विचारही त्यांच्या मनी आला नाही. परंतु ती गणातल्याच एका तरुणावर आसक्त होती, त्यामुळे विवाह झाल्यावरही ती त्याला विसरु शकली नाही. त्यांच्या भेटी- गाठी सुरुच राहिल्या. एके दिवशी गौतम मुनींनी त्यांना आपत्तीजनक स्थितीत बघितले. त्या तरुणाचे जनावरासारखे खच्चीकरण केले. आणि अहिल्येला जन्मभरासाठी एकांतवासाची शिक्षा दिली. नदीकिनारी एका गुहेत ती दिवाभीताप्रमाणे *पाषाणवत होऊन आज पन्नास वर्षापासुन तिथे तिचे वास्तव्य आहे.*
दंतकथा अशीही आहे की, अहिल्याच्या सौंदर्याने मोहित होऊन इंद्राने तिच्या पतीच्या रुपात तिच्याशी अतिप्रसंग करीत असतांनाच गौतम मुनींच्या दृष्टीस पडले. त्यामुळे संतापुन त्यांनी *इंद्राच्या सर्वांगात छिद्रे पडतील आणि अहिल्या पाषाण, शीळा होऊन पडेल असा शाप दिला*.
उःशाप मागीतल्यावर सांगीतले की, *श्रीराम इथे येतील तेव्हा तीचा ऊध्दार होईल.*
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
*जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे
–


