सती सावित्री चरीत्र भाग १, (१ ते ५)

"तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।" असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇


        सावित्रीचे पिता मद्राधिपती राजा अश्वपतीचा यांचा आज ४० वा जन्मोत्सव फारच थाटामाटात, जनता प्रेमाच्या बहराने अन्युन साजरा करीत होते. जन्मोत्सवाची शोभा यात्रा, सन्मान्ययात्रा, सनई-चौघडा, रणशिंगे, रणझाजा, भेर्‍या, तुतार्‍या, ढोल, मृदुंग यांच्या गगनभेदी आवाजाने सर्वत्र चेतन्य उसळले होते.

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! सती सावित्री चरित्र !!!

!! सावित्री  !!

भाग – १.

      सावित्री बद्दल सांगण्यापुर्वी तीच्या आई-वडिलांची थोडी माहिती देणे आवश्यक आहे.

      सावित्रीचे पिता मद्राधिपती राजा अश्वपतीचा यांचा आज ४० वा जन्मोत्सव फारच थाटामाटात, जनता प्रेमाच्या बहराने अन्युन साजरा करीत होते. जन्मोत्सवाची शोभा यात्रा, सन्मान्ययात्रा, सनई-चौघडा, रणशिंगे, रणझाजा, भेर्‍या, तुतार्‍या, ढोल, मृदुंग यांच्या गगनभेदी आवाजाने सर्वत्र चेतन्य उसळले होते. पन्नास कुमारीका नखशिखांत, पन्नास सुहासीनी शिखामणी पासुन पैंजण पर्यत सर्व अलंकाकृत सजुन डोक्यावर मंगल कलश व मंगलगीते गात शोभायात्रेची शोभा वाढवत चालत होत्या. त्यांंच्या मागे चार शुभ्र उमद्या अश्वांच्या प्रशस्त सुवर्ण रथात महाराज अश्वपती आणि त्यांच्या वामांगी जेष्ठ महाराणी मालवीदेवी आसनस्थ होत्या.

       त्या सुवर्ण रथामागुन सजुन धजुन सर्व मंत्रीगण, दोन्ही बाजुने सशस्र सैनिक, त्यांच्या मागुन अश्वदल, पिछाडीला असंख्य जनसागर जयगीते, शौर्यगीते, इशस्तवन म्हणत, तसेच नृत्यांगनाही सुंदर नृत्ये करीत शोभायात्रेची शोभा वाढवित होते. संपुर्ण राजधानी नव्या नवरी सारखी   नटली होती. जन्मोत्सवासाठी  वनवासीलोक, ग्रामवासी आणि नगरवासी स्री पुरुष उत्सहाने सामील झाले होते, कारण महाराज अश्वपती राज्यातील सर्व ठीकाणच्या लोकांसाठी स्वतः जातीने सर्व सोयी सुविद्यांची उत्कृष्ट व्यवस्था केली होती. म्हणुनच ते सर्वांचे अतिशय प्रेमाचे व आदरणीय स्थान होते.

          महाराज अश्वपती अत्यंत विचारी असल्यामुळे हा उत्साह दरवर्षी न करतां दर पांच  वर्षांनी जन्मोत्सव थाटाने करायचा प्रघात पडला होता. ही शोभायात्रा प्रत्येक बाजारपेठेतुन मिरवित राजप्रसादाकडे निघाली. महाराज व महाराणी पायउतार झाल्यावर प्रत्येक ज्ञातीतील अकरा महिलांनी त्यांना औक्षण केले. महाराजांनी हात उंचावुन भरदार उच्च स्वरांत अभिवादन व वंदन करुन अंतःपुराकडे प्रस्थान केले. दिसेनासे होईस्तोवर प्रजाजनांचा जयजयकार चालु होता.

 राजा अश्वपतींनी तळागळातील जनतेची विशेष काळजी घेतली. वन्य जमातीला सुधारीत शेतीचे तंत्रज्ञान शिकविले. वनौषधीची माहिती दिली, त्यामुळे स्रीमृत्यु, बालमृत्युचे प्रमाण बरेचसे कमी झाले. जे होतकरु युवक होते त्यांना लिहिणे वाचणे शिकवुन सैन्यदलात समाविष्ट केले. अशाप्रकारे वनातील वाडे पाडे सुस्थितीत, सुखासमाधानात जीवन व्यतीत करीत होते. म्हणुनच राजाची आज्ञा इश्वराज्ञा मानुन वेळ आली तर कोणताही त्याग करण्याची त्यांची तयारी असे.

    राजांनी लोकांना श्रमाचे महत्व, तसेच शेतीबरोबर इतर व्यवसाय, इतर पिके कशी घ्यायची तसेच स्रीयांचाहीसहभाग कसा असावा, शिक्षणाचे महत्व, धर्माविषयी, आचरणाविषयी किर्तनाद्वारे लोकांमधे जनजागृती केली. अशा राजाविषयी आदर कां नाही वाटणार? राज्यातील सर्वच थरातील जनतेला मान, धन, घरेदारे, शेतजमीन, धर्माविषयीचे ज्ञान, संस्कार शिक्षण मिळाले. त्यामुळे सर्व जनता राजाला पितृसमान, देवाप्रमाणे मानत होते.

     आणि महाराज सुध्दा प्रजेला अपत्यवत मानत होते. म्हणुनच इतके वर्ष अपत्यहीन असुनही त्यांना जराही खंत वाटत नव्हती.

                    क्रमशः

                           मिनाक्षी देशमुख

……………………………………………………………………………………………………………………

 !!  सावित्री  !!

भाग – २.

        महाराज अश्वपतींच्या राज्यात सर्व कांही ठीक होते तरी त्यांचे गुप्तचर वेशात प्रजाजनांमधे मिसळलेली असत. आणि महाराज ४० वर्षांचे असुनही संतान नाही म्हणुन सारी प्रजा दुःखी आहे हे गुप्तचरांना कळले. महोत्सवाच्या तिसर्‍या दिवशी बंदिस्त कक्षात महाराज, महामंत्री व गुप्तचर प्रमुख यांची बैठक झाली.

        प्रमुख गुप्तचर उठुन म्हणाला, राज्यात बाकी तर सर्व आनंद आहे. प्रजा सुखी समाधानी आहेत. पण महाराजांना संतान नसल्याचे दुःख सर्वांना आहे. महाराज व मंत्रीची गहन चर्चा होऊन त्रृषीजनांना बोलावुन ज्ञानाद्वारे, धर्माद्वारे कांही उपाय मिळेल का? याची समग्र चर्चा करण्यासाठी परिषद आयोजित करण्याचे ठरले.त्याप्रमाणे निवडक ज्ञानी लोकांना  निमंत्रन पत्रीकेत विषय नमुद करुन आमंत्रणे पाठविण्यात आली.

       शांत चित्ताने अश्वपतींनी अंतःपुरांकडे प्रस्थान केले. अंतःपुरात प्रतिक्षित महाराणीनी महारांजाचे म्लान व चिंतीत  मुख पाहुन कारण विचारले असतां, त्यांनी सांगीतले की, आम्हाला संतान नसल्याने प्रजा दुःखी आहे. त्यावर महाराणी म्हणाल्या हे दुःख तर बरेच दिवसांपासुन आम्हाला सुध्दा सलत आहे, पण! “प्रजा हीच संतान” असा आपला विचार असल्यामुळे आम्ही कांही बोललो नाही आतापर्यत. राजा म्हणाले, या संबंधी परिषद बोलावली, त्यांत अचुक उपाय मिळेलच.

       दुसर्‍या दिवशी महामंत्री  विवेकमणीनी राजगुरु, राजपुरोहित, राजवैद्य आदी विशेष व्यक्तींशी परामर्श झाल्यावर, मुनिवर्य गौतम, वंदनीय भारद्वाज,त्रृषीवर दाल्भ्य यांना आमंत्रीत करण्याचे ठरले. तसेच आजुबाजूंच्या व आपल्या राज्यातील व्युत्पन्न विप्र, पंडीत यांनाही परिषदेसाठी आमंत्रित करण्याचे ठरले.

       निमंत्रणाप्रमाणे सर्वांनी जेषठ शूध्द चतुदर्शीला आपल्या धर्मग्रंथासहित उपस्थीत राहायचे म्हणुन ज्ञानीजन जमत असल्यामुळे आदरयुक्त दबदबा पसरला.

        जेष्ठ शुध्द पोर्णीमेला परिषदेकरितां सुसज्ज विशाल गोष्ठीदालनात सर्व मान्यवर आसनस्थ झाले. दोन दिवस खल चर्चा होऊन तिसर्‍या दिवशी मुनिवर गौतमत्रृषींनी आपल्या धीरगंभीर आवाजांत सर्वानुमते मान्य झालेला निर्णायात्मक उपाय म्हणजे “याग” करणे होय. यात जप,तपस्या आणी कडक व्रतस्थ राहुन हे दिव्य व्रत करायचे आहे. याचा समय निश्चित नाही पण दृढ निष्ठा, विश्वास आणि भक्ती अविचल असावी. धर्मानुसार महाराणी मालवीदेवींनाही सहभागी व्हावे लागेल. व्रत कठीण असले तरी फळ निश्चित आहे.

        तोच महाराजांचा कणखर आणि दृढ स्वर सर्वांच्या कानी पडला. ते म्हणाले, प्रजा हीच आम्ही संतान मानली, त्यामुळे संतान नसल्याचे दुःख कधीच जाणवले नाही, पण आम्ही संतानहीन असल्याने प्रजा दुःखी! आणि प्रजा दुःखी असने आम्ही सहन करुं शकत नाही. राजगादीला वारस, महाराणींना मातृत्वाचा आनंद मिळण्यासाठी कितीही कठीण तपश्चर्या असली तरी यत्किंचितही तृटी न ठेवतां मनापासुन साधना करु!

  मुनीवर भारद्वाज त्रृषी म्हणाले, वर्षाकाल संपल्यावर, दसर्‍याचे सिमोल्लोघंन झाल्यावर अश्विन वद्य द्वादशीपासुन यज्ञारंभ सुरु करावा. नगराबाहेर असलेल्या विशाल भूखंडात या साधनेची व्यवस्था करण्याबाबत गौतमत्रृषींनी सुचित केले.सर्वांचा यथोच्चित सत्कार करुन महाराज निघुन गेले.

                        क्रमशः
                           मिनाक्षी देशमुख.

……………………………………………………………………………………………………………………

 !!!  सावित्री  !!!

भाग – ३.

       कितीही खडतर साधना असली तरी , महाराजांनी तो पुर्ण करण्याचा निश्चय केल्यावर, राजपुरोहित ब्रम्हानंद, महाराणी मालवीदेवीच्या कक्षात प्रवेश करुन “याग” च्या कठीण साधनेची माहिती देत, त्यांची सम्मती विचारली असता, महाराणींनी मनोनिग्रह करुन म्हणाल्या, राज्याला वारस तर हवाच! प्रजाहितदक्ष महारांजाच्या खडतर साधनेत  कार्यसिध्दी पुर्ण होण्यासाठी आम्ही मनोकायावाचा सहभाग करुन पुर्ण व्रतस्थ राहु.

      महाराणींचे धैर्ययुक्त, विवेकपुर्ण विचार ऐकुन राजपुरोहितांच्या मनांत विचार चमकला, हे दाम्पत्य धैर्यवान आणि दृढनिश्चयाने, निष्ठेने “सावित्रीदेवी” व्रत केल्याने खचितच यश येईल. प्रणाम करुन त्यांनी प्रस्थान केले.

         अश्वपतींनी राणीकक्षात प्रवेश केला. राजांनी परिषदेत झालेला निर्णय महाराणीना सांगीतल्यावर, त्या म्हणाल्या, स्वामी!  मी आपली अर्धांगिनी आहोत. आपल्या नियमपालनात मी कायावाचा मनोभावे साथ देण्यास मी कटीबद्ध असेन. महाराज आनंदीत होऊन म्हणाले आपल्याकडुन हीच अपेक्षा होती.

      लवकरच सावित्रीयागाची पुर्ण तयारी सुरु झाली. महाराज अश्वपती फारच चाणाक्ष, धोरणी, बुध्दीमान, दुर्दर्शी होते. मंत्रीगणांत त्यांनी प्रत्येक व्यक्ती पारखुन घेतलेला होता, महाराज एका मोठ्या तपश्चर्येला प्रारंभ करणार, म्हणुन व्रतस्थ रहावे लागणार! तप साधनेचा काळही निश्चित नसल्यामुळे सर्व मंत्रीगण, अधिकारी, सेनापती, गुप्तचर प्रमुख या सर्वांकडुन परामर्श घेण्यासाठी सभा आयोजीत केली.

       साधनेच्या काळात महाराज लक्ष देऊ शकणार नाहीत म्हणुनच आपण सर्वांनी त्यांना अत्यंत काळजीपुर्वक, प्रामाणिकपणे, निरलसपणे प्रत्येकाला नेमुण दिलेले कार्य कर्तव्यनिष्ठेने, सावधतेने पार पाडण्यात येईल, आज राज्य उत्तम, सुस्थीतीत आहे तसेच महारांजाच्या अनुपस्थीतीतही राहील असे सर्वांनी वचन दिले.

         सावित्रीयागाची नगराबाहेर सर्व प्रकारची तयारी करण्यास सर्व जण मनोभावे कामाला लागलेत. या सर्वांचे कर्तव्यबुध्दी व प्रेम पाहुन महाराजांना गहिवरुन आले.

       मद्रदेशाधिपती अश्वपतींंच्या “सावित्रीयाग” चा समाचार वायुवेगाने सर्वत्र पसरला. ही वार्ता शाल्वदेशाधिपती द्युमत्सेन  राजांच्याही कानी पडली. धर्मपरायण, सरलस्वभावी द्युमत्सेन महारांजानाही अत्यंत आनंद झाला. त्यांनाही संतान नसल्यामुळे थोडे अस्वस्थ झालेत. कांही विचार करुन राजपुरोहित व राजगुरु यांनाआमंत्रीत केले.

      ते आल्यावर द्युमत्सेन महाराज त्यांना म्हणाले, महाराज अश्वपती संतानप्राप्तीसाठी “सावित्रीयाग” करीत आहेत. आम्हालाही संतान नसल्यामुळे त्यावर विचारविमर्श करण्यास्तव आपल्याला पाचारण केले आहे.

       राजगुरु म्हणाले! ब्रम्हदेव विश्वाचे निर्माते असल्यामुळे त्यांनाच प्रसन्न केले तर निश्चितच फळ मिळेल. “ब्रम्ह! त्वं जगतः कर्ता, मम वंशार्य सिध्दये। सवितृसम पुत्रं मे! देहि राष्र्टाय कामये।।  हा ब्रम्हदेवाच्या अनेक उत्तम मंत्रापैकी विशेष प्रसिध्द आणि फलदायी असल्यामुळे या मंत्राने हवन केल्यास संतानप्राप्ती निश्चितच होईल.

                       क्रमशः

                          मिनाक्षी देशमुख.

!!!    सावित्री   !!!

भाग – ४.

           राजगुरु  शाल्वदेशाधिपती द्युमत्सेन यांना म्हणाले. प्रथम गणेशपुजन, प्रार्थना करुन पुत्रप्राप्तीसाठी संकल्प सोडुन आरंभ करण्यापुर्वी ब्रम्हदेवाचेही पुजन करुन या मंत्राचे एक सहस्र हवन करावे. प्रेमळ,कृपाळु, ब्रम्हदेव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. ही आराधना, उपासना आहे, व्रत नाही, त्यामुळे व्रतस्थ राहुन नियमपालन करण्याची गरज नाही. फक्त ही उपासना करतांना दृढ भक्ती, निष्ठा, पुर्ण निर्धार, निश्चय मात्र आवश्यक आहे. पंचगानुसार पुढील साप्ताहातील चतुर्थीपासुन प्रारंभ करण्याचे निश्चित झाले.

           महाराजांचा अत्यंत विश्वासु परंतु तो अंतरी दुष्टप्रवृत्तीयुक्त अमात्य कुमारसेन ऐकत तेथेच होता. त्याच्या मनांत दुष्टचक्र सुरु झाले. शेजारचे दोन राष्र्टे कलिंग व वारिंग विरोधात आहेतच, शिवाय राजा अश्वपती यज्ञातच मग्न राहणार असल्यामुळे  शाल्वदेश व मद्रदेश ही दोन मोठे राज्य ताब्यात येण्याचे तो स्वप्न बघु लागला.

       आज शाल्वदेशाधिपती द्युमत्सेनांच्या राजधानीत खुपच गडबड सुरु होती, कारण राजगुरु व राजपुरोहित यांच्या सल्ल्यानुसार क्षेमकारक! कल्याणकारी यज्ञ करायचे ठरल्यामुळे या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी  तपोनिधी गौतम त्रृषी, मुनिवर्य भारद्वाज  आणि कांही  ख्यातनाम विद्वत्जन त्रृत्विज यांना  आमंत्रीत केले असल्यामुृळे त्यांच्या स्वागत, सत्कारासाठी व्यवस्थापनाच्या व्यवस्थेनची गडबड उडाली होती.

         महाराज द्युमत्सेन व अमात्य कुमारसेन यांनी गोष्ठीकक्षेत प्रवेश केला. सर्वांचे उत्थान झाल्यावर बरीचशी साधक बाधक चर्चा होऊन वेदशास्रसंपन्न नारायण शास्रींनी अभिवादन करुन म्हणाले, महाराजांचा मानस आहे की, देश,प्रजा, राजपरिवार यांचे क्षेम, कल्याण व्हावे म्हणुन शक्तीशाली, मंगलकारी, कल्याणदात्री, गौरी, मंगला, शिवा या सर्व महादेवींसाठी यज्ञ केल्यास महाराजांनी प्रकट केलेले विचार सत्यात येण्यास कांही प्रत्यय नाही, त्यासाठी— सर्व मंगल मांगल्ये शावे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायाणी नमोस्तुते।। या मंत्राने हवन करुन ‘कल्यानार्थ यज्ञ’ मार्गशीर्ष मासातील प्रतिपदेपासुन सुरु करण्याचे निश्चित झाले.

       मुळातच धर्मपरायण, सत्यवचनी, साधा सरळ व भोळसर स्वभाव असलेल्या  महाराज द्युमत्सेनांनी यज्ञाच्या तयारीची उत्तरदायीत्व अमात्य कुमारसेन व व्यवस्थामंत्री रवी वर्मा कडे सोपवली. कुमारसेन, सेनापती वीरसेन, कोषाध्यक्ष लक्ष्मीधर हे तिघेही कुटील कारस्थानी व खलप्रवृत्तीचे असुन महाराजांच्या साध्या स्वभावाचा ते नेहमीच गैरफायदा घेत असत. आतां तर त्यांना स्वार्थ साधण्याची संधीच प्राप्त झाली. परंतु महाराजांचे निकट सेवक श्रीपती व श्रीधर हे दोघेही अत्यंत प्रामाणिक व महारांजाशी एकनिष्ठ होते.त्यांना अमात्य कुमारसेनचे वागणे संशयास्पद वाटत असल्यामुळे कांही गोष्टी राजांच्या कानावर घालत पण सरळस्वभावी महाराजांचा विश्वास बसत नसे.

         यज्ञाची सिध्दता वेगात सुरु होती. कुमारसेन, लक्ष्मीधर, वीरसेन यांची यज्ञाच्या निमित्याने कसे धन लुबाडता येईल याची एका बंदिस्त कक्षात गुप्त मंत्रणा सुरु  असतांना योगायोगाने विश्वासु सेवक श्रीधर व श्रीपती तिथुन जात असतांना हळू आवाजातले  बोलणे  लपुन ऐकु लागले. त्यांचा प्लान त्यांनी महाराजाच्या कानावर घालत असलेलं आमात्य कुमारसेनने ऐकले  व आंत येऊन खोटे सांगुन या विश्वासु सेवकांवरच आळ घेतला. महारांज्यांच्या संशयाचे निर्सन करुन त्या विश्वासु सेवकांची रवानगी यज्ञ संपेपर्यत यज्ञशाळेबाहेर करुन या कुटीलांचा रस्ता निर्वीघ्न केला.

                        क्रमशः
                            मिनाक्षी देशमुख.

……………………………………………………………………………………………………………………

!!!   सावित्री   !!!

भाग – ५.

         अमात्य कुमारसेनने आपल्या गोड बोलण्याने महाराजांच्या मनातील किल्मिष दुर केले. श्रीपती, श्रीधर समजुन चुकले की, आपल्याला हेतुपुरस्पर महाराजांपासुन दूर केल्या गेले.

      यज्ञकार्याची सर्व सज्जता झाली. सर्व मान्यवर आणि त्रृषीमुनींचे आगमण झाले. मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदा यज्ञाचा दिवस उगवला. महाराज व महाराणी सुचिर्भुत होऊन यज्ञवेदीजवळ पोहोचले. गणेशपुजन, पुण्याहवाचन होऊन सर्व त्रृषीगण एका सुरात मंत्र म्हणून प्रज्वलीत झालेल्या यज्ञकुंडात आहुत्या अर्पन होऊ लागल्या. तिसर्‍यादिवशी दुपार पर्यत हवन व पुर्णाहुती होऊन यज्ञसमाप्ती झाली. सर्वत्र तृप्त,समाधानी व पावित्र्याने वातावरण भरुन गेले. सर्वांचे यथोच्चित स्वागत सत्कार करुन सर्वांनी प्रस्थान केले. गौतमादी त्रृषी मात्र वसतीस थांबले.

      गौतमत्रृषी  सायंसध्या करण्यासाठी नदीकिनारी गेले. देवदर्शनासाठी मंदिरात जात असतां तीथुन सर्वांग काळ्या घोंगडीने झाकुन धनाची मोठी गाठोडी सांभाळत कुमारसेन, कोषाध्यक्ष व दोन मंत्री वेगाने बाहेर पडत असलेले त्यांनी बघीतले.

     ही घटना बघुन  गौतमत्रृषी समजुन चुकले, काही तरी गौडबंगाल आहे. दुसर्‍या दिवशी प्रस्थानापुर्वी महाराजांच्या भेटीस गेले असतां सर्वांच्या न कळत हळुच महाराजांना गुप्तपणे आश्रमात येण्यास सांगीतले. महाराज भेटल्यानंतर त्यांनी काल पाहिलेली घटना त्यांच्या कानी घातली.

      इकडे मगधदेशीच्या महाराणी मालदेवीकडे अनेक हुशार व चतुर दासी होत्या.पण सात वर्षाच्या यमुनेवर त्यांचे विशेष प्रेम होते. ती दासी नव्हती, पण सेवेत तत्पर असायची. यमुना रुपवान, गुणवान असुन वयाच्या मानाने ती सर्व गोष्टीत हुशार होती. ती वर्मा या क्षत्रिय घराण्यातील होती. तीचा भाऊ शेखर हा गुप्तचर खात्यात होता पण हे त्याच्या वडिलांशिवाय कोणालाच ज्ञात नव्हते.यज्ञसमारंभात साध्या वेषात फिरुन कांही विपरीत घडु नये म्हणुन त्याची विशेष कामगीरीवर नियुक्ती झाली होती.

          मध्यान्हवेळी यज्ञस्थानी जाण्यास शेखर निघाला असतां त्याची सात वर्षाची बहिण त्याच्याबरोबर येण्याचा हट्ट करु लागली. शेवटी तो तिच्यासह यज्ञस्थानी आला. तिथली भव्यता, महाराज महाराणींच्या कुटी पाहुन ती अचंबीत झाली.

          यज्ञमंडपी सर्व सिध्दता झाल्यावर महाराज व महाराणी ब्रम्हवृंदासमवेत यज्ञस्थानी आलेत. त्यांचेसमोर प्रत्यक्ष अध्वयू तपोनिधी नित्यानंद महर्षींची शामल मूर्ती व त्यांच्या नयनातील तेज पाहुन ते दिपुन गेलेत. महाराजांनी त्यांच्या पायावर लोटांगण घातले.

      महाराजांनी पहिली आहुती टाकुन सावित्रीहवनास आरंभ झाला. सावित्रीमंत्राने सर्व परिसर दुमदुमला. सर्वच वातावरण आनंदी व समाधानी दिसत होते. बघता बघतां अश्वपतींच्या तपश्चर्या हवनाला दोन वर्षे पुर्ण झाली.

        कलिंग आणि वारिंग देशाचे  राजे व शाल्वदेशाचा अमात्य कुमारसेन यांच्या गुप्त भेटीगाठी कटकारस्थान स्थळी वाढूं लागल्या, पण हवे तसे यश त्यांना मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी वेगळाच मार्ग शोधला. अश्वपती राजाविरुध्द वनवासी गांवकर्‍यांना फितवून त्यांच्या विषयी मन कलुषित करावे या उद्देशाने गुप्तचर पथकाला कुटील प्रशिक्षण दिल्या गेले, त्यातील दोन गुप्तचर मद्रदेशीच्या वनवासी पाड्याकडे रवाना केले, पण ते स्वतःच फसले.

                       क्रमशः
                             मिनाक्षी देशमुख.

!!! सती सावित्री!!!

*जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे

सती सावित्री चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading