
……रामाचा सत्कार करुन झाल्यावर ऋषी म्हणाले,रामा तूं सर्वांचा राजा आहे. तूं महारथी,धर्मप्रवर्तक असून माझ्यासह सार्या ऋषींना प्रिय आहेस,तसंच सर्वमान्य आहेस.ऋषीवर! आपण फार महान आहांत.आम्ही ज्या ज्या आश्रमां ना भेटी दिल्यात तिथे केवळ आपल्या गुणांचे,कार्यांची महतीच कानी पडली. रामाचे हे अनुभवाचे बोल…..
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
अभिनव रामायण
!!! अभिनव रामायण !!!
भाग – ११.
भरताच्या निर्णयाने सर्वांचे डोळे आंनदाश्रूंनी भरुन आले.भरत सुमंताला आज्ञा देत म्हणाला,सैन्य आणि संबधीत लोकांना,रामाला परत आणण्यासाठी तयार राहण्यास सांगावे.दुसर्या दिवशी भल्या पहाटे भरत,शतृघ्न सुसज्य रथारुढ होऊन श्रीराम दर्शनाच्या उत्सुक तेने अयोध्या सोडली.सोबतच्या रथात मंत्रीगण व राजपुरोहित वसिष्ठ मुनीही होते.भरताच्या रथामागुन चतुरंग सैन्य शिस्तित चालले होते.सोबत राजमाता कौसल्या,सुमित्रा आणि कैकयीही होत्या.
सैन्याच्या मागुन प्रतिष्ठीत नागरीकही स्वखुशीने रामाला अयोध्येत परत आणण्याच्या मोहीमेत सामील झाले होते
भरताच्या अधिपत्याखाली मजल दर मजल करीत गंगातीरी गुहकाच्या शृंगवेरपुरासमोर आलेत.सेने सहित भरताला आलेला पाहुन गुहकाला वाटले,कैकयीपुत्र भरत रामाचा घात करण्याच्या उद्देशाने आला असावा असे वाटुन त्याला अडवुन सैनिक व युध्द सामग्रीसहित ५०० नौका तयार ठेवण्या चा आदेश देऊन म्हणाला,रामाबद्दल भरताची भावना शुध्द असली तरच तो ससैन्य गंगापार करुं शकेल.भरतासाठी मध,उत्तम फळांचे पेटारे घेऊन गुहक गंगानदी ओलांडुन भरताच्या तळाकडे गेला.गुहक येतांच त्याच्या भेटी स्विकारुन यथोचित सत्कार करुन भरत म्हणाला,गुहका तूं श्रीरामाचा स्नेही आहेस.गंगाकाठचा हा प्रदेश दुर्गम दिसतोय,श्रीरामाला भेटण्यासाठी भरद्वाजऋषींच्या आश्रमात पोहचण्यास मदत करावी.महाबली भरता!मी स्वतः व वाटाडे सोबत येऊ,पण तूं ससैन्य आल्या मुळे मनांत शंका निर्माण झाली.गुहकाचे बोलणे ऐकुन निर्मळ मनाच्या भरताला अतिशय क्लेष झाले.गहिवरुन म्हणाला, निषदराजा!राम माझा मोठा भाऊ पित्या च्या ठीकाणी आहे.मनांत कोणताही किंतु आणु नका.त्याचे राज्य त्याला परत करुन त्याला अयोध्येला परत नेण्यास आलो आहे.भरताचे बोलणे ऐकुन गुहका चे मन भरुन आले,म्हणाला,भरता! धन्य आहेस.अनायास आलेले राज्य तूं सोडतोस, तुझ्यासारखा महात्मा क्वचितच आढळेल.दुसर्या दिवशी सकाळी गुहकाच्या ५०० नौकांच्या सहाय्याने भरत ससैन्य व परिवारासहित गंगापार करुन,स्वतः गुहक व त्याचे वाटाडे निबिड अरण्यातुन भरद्वाज ऋषींच्या आश्रमाकडे निघाले.आश्रम जवळ येताच भरताने आपले सैन्य आणि शाही इतमाम कोसभर अंतरावर ठेवुन साध्या वेषात वसिष्ठमुनीसह शस्रहीन भरत एकटाच आश्रमाच्या परिसरात आला.भरद्वाजऋषींनी वसिष्ठमुनींचे यथा योग्य स्वागत केल्यावर,अयोध्येची वार्ता व अपौचारिक बोलणे झाल्यावर,भरता ला म्हणाले,भरता!तूं राज्यकारभार सोडुन इतक्या दूर कोणत्या दुष्ट हेतूने रामाचे अनिष्ट करण्यास आला आहे का?
भरद्वाजांचे बोलणे ऐकुन, व्याकुळतेने भरत म्हणाला,आपल्या सारख्या पुज्य व्यकीनेच जर मजविषयी शंका घेतली तर मी मेल्यातच जमा आहे. माझ्या मातेची शिक्षा माझ्या माथी नका हो लावु!मी श्रीरामाला त्याचेच राज्य त्याला सोपवण्यासाठी परत नेण्यास आलो आहे.त्याचे कळकळीचे अंतःकरणांतील बोल ऐकुन,व वसिष्ठांनी दुजोरा दिल्यावर,राम चित्रकुट पर्वतावर असल्याचे सांगुन,आज रात्री सैन्यासह माझा पाहुचार घेऊन उद्या सकाळी प्रस्थान करा.
चित्रकुट पर्वताच्या वनात मंदाकीनी नदीकाठी एका पर्णकुटीत श्रीराम,सीता व लक्ष्मण वास्तव्यास असल्याचे भरद्वाज ऋषींनी भरताला सांगीतले होते.रानांतील नयनमनमोहक सौंदर्य बघुन भरताचे मन प्रफुल्लीत झाले.भरताच्या आज्ञेनुसार निवडक सैन्य श्रीरामाचे निवास शोधत असतांना आकाशांत उठणार्या धूराची रेषा दिसल्याचे भरताला कळल्यावर भरत व सुमंत दोघेच धुराच्या अनुरोधाने शोध घेत पुढे निघाले.
भरत चित्रकुट वनात शिरला,त्याच वेळी मंदाकिनी नदीच्या एका सपाट व स्वच्छ कातळावर लक्ष्मण सीतेहस राम बसले होते.या दोघांच्या सानिध्यात राज प्रसादापासुन दूर एकाकी अरण्यात असुन सुध्दा रामाचे वास्तव्य आनंदात व्यतित होत होते.तिघेही आंनदात वेळ घालवित असतांनाच वनात जवळच मोठ्या सैन्याच्या हालचाली होऊन धुळ उठतांना दिसल्यावर,अचानक होणार्या कोलाहलाचे,गडबडीचे कारण शोधण्यास लक्ष्मणाला आदेश दिला.उंच शालवृक्षा वर चढुन लक्ष्मण शोधक दृष्टीने सभोवार पाहु लागला तोच…..
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ८-३-२०२१.
!!! अभिनव रामायण !!!
भाग – १२.
उतर दिशेकडुन फार मोठे सैन्यदल येत असलेले लक्ष्मणाला दिसल्यावर धोका लक्षात येताच,श्रीरामाला शेकोटी विझवायला सांगीतली व सीतेला जवळच्या गुहेत लपुन बसण्यास सांगीतले.दादा!भरत आपल्यावर चालुन येत आहेसे दिसतेय!श्रीराम जराही विचलित न होता,लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा! शांत हो…भरत आक्रमण करायला नाही तर,आईची कठोर निर्भत्सना करुन,मला राज्य परत करायला येत आहे.निरर्थक शंका घेऊ नकोस.तिघेही आपल्याकुटीत परत आले कुटीचा शोध लागताच,तीन्ही माता,मंत्री गण,वसिष्ठमुनी,शत्रुघ्नासह मोठ्या उत्साहाने भरताने पर्णकुटीकडे धाव घेतली.श्रीराम दिसल्याबरोबर भरत, शतृघ्न त्यांच्या पायावर कोसळले.रामाने दोघांना ह्रदयाशी धरले.चारही भावांच्या डोळ्यांतुन अश्रूंचा पूर वाहुं लागला.
तेवढ्यात तिन्हीही माता,गुहक,मंत्री गण,मुख्यलोक आणि राजगुरु वसिष्ठ तेथे येऊन पोहचले.त्यांचा आदरसत्कार झाल्यावर,येण्याचे कारण विचारल्यावर भरत म्हणाला,दादा!तुम्ही तिघेही वनांत जाताच अति शोकाने आपले पिताजी स्वर्गवासी झालेत.प्रथम त्यांना श्रधांजली देऊन,आपण त्यांचे जेष्ठपुत्र व राज्याचे उत्तराधिकारी असल्यामुळे अयोध्येस चलुन आपण राज्य सांभाळावे.या भरताच्या विनंतीला सर्व प्रमुख लोकांनी अनुमदन दिले.स्थिरबुध्दी रामाने भरताचे सांत्वन करीत म्हणाले, भरता! सर्व गोष्टी नियतीने आधीच ठरवलेल्या असतात. उगाच शोक न करतां,पितृज्ञानुसार परत जा व अयोध्येस राज्य कर..मी त्यांच्याच आज्ञेने वनात वास्तव्य करीन.हे नरश्रेष्ठा! तुम्ही आत्मज्ञानी असल्यामुळे कोणत्या ही प्रसंगी स्थीरबुध्दीच्या तुमच्या मनाला विषाद वाटत नसला तरी,माझे तसे नाही. माझ्या माघारी मातेने केलेले पापकृत्य मला मान्य नाही.कायद्याने बांधील असल्यामुळे तीला कठोर शिक्षासुध्दा करुं शकत नाही.पिताजी परलोकवासी झाले आहेत,त्यांच्याबद्दलही वाईट बोलुं शकत नाही.राघवा!क्षात्रधर्माला जागुन, माझ्या मातेचे निंद्यकर्म धुवुन व आपल्या वडिलांना सुध्दा लोकनिंदेपासुन वाचवुन क्षत्रिय धर्माचे पालन करुन राज्य करावे.
भरताची प्रार्थना ऐकुन,त्याला समजावत श्रीराम म्हणाले, भरता! ज्या वेळी कैकयीमातेचा विवाह आपल्या पिताजीसोबत झाला,त्यावेळी तुझ्या आजोबांनी तीला होणार्या पुत्राला राज्य देण्याचे राज्यशुल्क मान्य केले होते. शिवाय एका संकटप्रसंगी तीने पिताजींना मदत केल्यामुळे तीला दोन ‘वर’ दिलेहोते त्यासंदर्भानुसारच राज्य तुझ्याकडे आले आहे.तेव्हा पितृज्ञेनुसार मला वनांत राहु दे व तूं अयोध्येचे राज्य सुखाने स्विकार!
श्रीराम ऐकत नाहीसे पाहुन, वैतागलेला भरत सुमंताला म्हणाला, अंगनांत या यज्ञवेदीसमोर गवताची बैठक तयार कर!जोपर्यंत दादा माझे म्हणने ऐकत नाही तोवर अन्नजलाचा त्याग करतो.सुमंत रामाकडे आज्ञेसाठी बघतो आहेसे पाहुन,स्वतःच उठुन कुशाची चटई अंथरुन बसला.लोकांनी तरी श्रीरामाला विनंती करावी.पण हाही प्रयत्न फसल्याने भरत उठुन सर्वांकडे पाहत म्हणाला,मी पिताजींकडे राज्य मागीतले नव्हते किंवा मातेलाही असे कांहीही म्हटले नव्हते.शिवाय दादाच्या वनवासाला माझी संमत्ती कधीच नव्हती.
असे असुनसुध्दा जर श्रीरामांना पित्याच्या आज्ञापालनासाठी वनांत राहणे अनिवार्य असेल तर,मी सुध्दा १४ वर्षे वनांत राहीन.
भरताच्या बोलण्याने राम चकित झाले,ते म्हणाले,पिताजींची आज्ञा पाळणे मला भाग आहे,मी समर्थ असतांना दुसरा प्रतिनिधीही नेमू शकत नाही.त्यामुळे परत अयोध्येस जाऊन राज्य करावे.
दोघां भावांमधील संभाषण अनेक ऋषीमुनी मोठ्या कौतुकाने ऐकत होते. मनोमन त्यांची प्रशंसाही करीत होते.तरी पण या सर्व ऋषींना वाटत होते,इथे वनांत आलेल्या रामाने रावणाचे निर्दालन करावे.असे वाटत असल्यामुळे सर्वजण भरताला म्हणाले,पित्याच्या इच्छेचा मान ठेवुन रामाने पितृऋण चुकवावे व भरताने राज्य करावे.
अखेर भरताने आपले निर्णायक बाण काढुन म्हणाला,मी एकटा हे विशाल राज्य व प्रजाजनाची प्रसन्नता साधु शकणार नाही.हे श्रीरामा! माझ्या व माझ्या मातेच्या विनंतीस मान देऊन जेष्ठ पुत्राचे कर्तव्य म्हणुन प्रजापालन करुन आपला कुळधर्म पाळावा.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ८-३-२०२१.
!!! अभिनव रामायण !!!
भाग – १३.
श्रीराम हसुन म्हणाले,भरता! हा तुझा विनय आहे.तुझ्या बुध्दीबळावर सर्व पृथ्वीचे रक्षण करण्यास तू सक्षम आहेस.शिवाय अनेक मित्र,आमात्य, हुशार मंत्री आहेत,त्यांच्या सल्ल्यानुसार कितीही अवघड काम तूं पार पाडु शकतो
आतां मात्र भरताचा नाइलाज झाला,तरी तो असा हरणारा नव्हता.ठीक आहे!सुवर्णमंडीत पादुका श्रीरामासमोर ठेवुन म्हणाला,ह्या पायात घालुन मला द्या.या पादुकांवर सर्व राज्याचा योगक्षेमाचा भार आतां तुमचाच राहील.आददरपुर्वक नमस्कार करुन,पादुका घेऊन भरत म्हणाला,मी सुध्दा १४ वर्षे फळंमुळं खाऊन,जटा वाढवुन अयोध्यानगरी बाहेर वास्तव्य करुन ही १४ वर्षे या पादुकांवर आपल्या संपुर्ण साम्राज्याच्या कारभारा चा न्यास करुन तुझ्यातर्फे शासनाचे काम करीत राहीन.१४ वर्षानंतरही तूं आला नाहीस तर मी अग्निभक्षण करीन.
श्रीरामाने मान्यता देऊन दोघांनाही दृढ अलिंगन देत म्हणाले,कैकयीमातेला योग्य सन्मान द्या,तीचा राग धरु नका.
दुसर्या दिवशी श्रीरामांच्या रत्न जडीत सुवर्णमंडीत पादुका रथात ठेवुन भरत,शतृघ्न लव्याजमासहित अयोध्ये कडे रवाना झाले.ठरल्याप्रमाणे भरत अयोध्याबाहेर नंदीग्रामात तापसाच्या वेशात,श्रीरामाच्या पादुका सिंहासनावर ठेवुन राज्यकारभार पाहु लागला.सहज गत्या चालुन आलेले राज्य नाकारुन भरत श्रेष्ठ ठरला,चरित्र उजळुन निघाले. हीनस्वार्थाच्या वर उठण्याची मनाची ताकद त्याने निर्विवाद सिध्द केली.त्याचा हा मोठेपणा,श्रीरामांच्या राज्यत्यागा इतकाच किंबहुना कदाचित त्याहुन जास्त मोठा होता.कुठल्याही सबबी खाली,वाटेल तो प्रकार करुन सत्तेला चिकटणार्या पुढार्यांनी सामान्यतः आधुनिक पुढार्यांनी यातुन धडा घेण्यासारखा आहे.
आतां सहाजिकच प्रश्न उद्भवतो की, सर्व मंत्री,सर्व सामंत,सर्व श्रेष्ठ नागरिक,एवढेच नव्हे तर तीन्हीही माते समक्ष,भरताला मिळालेले राज्य,श्रीमाला अर्पण केल्यावरही रामाने राज्य कां स्विकारले नाही? हरकत कां घ्यावी?याचे उत्तर..राज्य देणार्या भरताला सर्वांची मान्यता होती,प्रयत्नशील होते,पण मूळ व्यवहार राजा दशरथ आणि राणी कैकयी मधे झाला होता.आणि कैकयीने शब्दही काढला नव्हता.हा व्यवहार कैकयीच्या संमतीखेरीज बदलावयाचा नव्हता,तो हक्क,अधिकार फक्त कैकयी चा होता.वैयक्तिक दृष्ट्या आणि राज्य पातळीवर कांही कां कारणाने मान्य झालेला हक्क नाकारणे योग्य ठरले नसते.सर्वांची इच्छा असली तरीही… कैकयीने तिच्या दृष्टीने योग्य तेच मागीतले आणि दशरथांनी त्यांच्या दृष्टी कोणातुन वचनभंग न व्हावा म्हणुन बरोबरच वागले.हा निर्णय राम एकतर्फी कसे काय बदलु शकेल?आधुनिक भाषेत सांगायचे म्हणजे,अल्पसंख्यकांच्या मूलभूत हक्कांना बहुसंख्यकांनी बाध आणने रास्त नाही हे रामांनी दाखवुन दिले.कोणत्त्या कां कारणाने होईना तथाकथित नेत्यांप्रमाणे आपले शब्द न फिरवतां व्यवहार मान्य केला होता.
श्रीरामांचे म्हणणेअसे की,मीच जर सत्तेच्या लालसेने वागु लागलो तर स्वेच्छाचारी ठरेन.प्रजा राजाचे अनुकरण करत असते.राजाला आपले वर्तन फार सांभाळावे लागते.सद्यस्थितीत बोकावले ल्या भ्रष्र्टाचारांचे मुळच श्रीरामाने दाखवुन दिले.भरत-शतृघ्नाने रामाचे राज्य त्यांची ठेव म्हणुन सांभाळले. लक्ष्मणाने वनात राहुन रामांना हरप्रकारे संरक्षण व मदत केली.या चार भावां मधील प्रेम,सलोखा, सौदार्ह्य व एक वाक्यता व्यक्तीगत आणि सामाजिक दोन्ही स्तरांवर सदैव आदरणीय,वंदणीय व अनुकरणीय आहे.
भरत मोठ्या सैन्यानिशी रामाचा शोध घेत येतांना पाहुन,गुहक,भरद्वाज आणि लक्ष्मण या सर्वांच्या मनांत त्याच्या हेतूविषयी शंका निर्माण झाली होती,पण श्रीरामाचे मन निःशंक होते.भरताला मिळालेले राज्य नाकारल्यामुळे कैकयी दुष्ट ठरल्या गेली.वास्तविक तीला रामा बद्दल प्रेम होते,त्यांच्या गुणांचा आदर होता.केवळ पुत्रमोहाने तीने भरतासाठी राज्य मागुन घेतले होते का?मुळीच नाही ती एक विचारी,सुसंस्कृत,अस्रशस्र विद्येत प्रविण,मुत्सद्दी राजकारणी होती. राम सक्षम होऊन कुठेही त्यांनी उणे न पडावे,राज्ययंत्रणा सुव्यवस्थित चालावी, कारण त्यावेळी राक्षसी प्रवृत्ती,अनाचार फारच वाढलेला,त्याला आळा,साध्या सरळ स्वभावाचा राम घालु शकणार नाही असे वाटल्यानेच तीने स्वतःला नेहमीसाठी बदनामीच्या आगीत झोकुन दिले होते,ऐवढेच काय अकाली वैधव्यही पत्करले होते.तीने रामाला द्वेषबुध्दीने वनांत धाडले नव्हते तर पुढील भविष्या ची योग्य दक्षता तिने घेतली होती आणि स्वतः मात्र सर्वांच्या नजरेतुन उतरली होती.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ८-३-२०२१.
!!! अभिनव रामायण !!
भाग – १४.
या सर्व प्रकाराने कांही अंशी रामानांही कैकयीच्या नेहमीच्या स्वभावा विपरित जाऊन अचानक बदल कां घडला? नक्कीच यामागे दैवीहेतू स्पष्ट दिसतो.तीच्या त्यागाची कल्पना त्यांना आली असावीसे वाटते.कारण तीचे प्रेम भरतापेक्षा कणभर जास्तच रामावर होते. असे असतांना,त्यांचा राज्याभिषेक न होऊ देता वनवासात पाठवले.नक्कीच कांहीतरी तेवढेच मोठे कारण असावे,हे सुबुध्द रामांनी जाणले असावे.शिवाय विश्वामित्रांनी तर उघडच राक्षसी रावणाचे असंस्कृत वर्चस्व नष्ट करण्याच्या हेतूने, इराद्याने अनेक अस्रे शिकवली.अनेक ऋषीमुनी रावण पराभवासाठी रामाची वाट बघत होते.चित्रकुटात आल्यावर तिथेसुध्दा राक्षसांचे छोटेमोठे उपद्रव रामाला दिसताअसल्यामुळे दैवयोगाने वनवासात आलोच आहो तर,राक्षसी वृत्तीच्या पाशवी लोकांची विध्वंशक,दुष्ट व संस्कृतिनाशक कृत्ये आपण थांबवावे असे रामाला वाटले असावे.
रामाला अयोध्येची चिंता नव्हती. कारण त्यांचा प्रतिनिधी म्हणुन भरत राज्य सांभाळण्यास सक्षम होता.रामाला सीता व लक्ष्मणासहित,राक्षसांच्या अधिपत्याखालील वनात राहण्याचा धोका पत्करुन वनवासाचे हाल भोगावे लागणार होते.परंतु राक्षसाचा बंदोबस्त करण्याचे प्रशासकाचे आद्य कर्तव्य समजुन निबिड दंडकारण्यात प्रवेश केला जोपर्यंत संस्कृतीचा विध्वंस करणारे राक्षसी प्रवृत्ती,आततायी आणि अहंकारा ने अंध झालेले अतिरेकी लोक जगात आहे,तोपर्यंतअशा दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी ‘रामाची’ गरज आहे. त्या मुळेच “रामायण” सार्वत्रिक व सर्व कालीत आहे.
राक्षसांचे निर्दालन करण्यांचे शासकीय कर्तव्य पार पाडण्यासाठी श्रीराम दक्षिण दंडकारण्यांत निघाले तेव्हा मार्गातील आश्रमवासीयांनी सांगीतले की,या महारण्यात माणुसकीला
खाणारे नाना रुपांत राक्षस आणि रक्त पिपासु हिंस्रपशुंचे वास्तव्य आहे.माणसा ला राक्षसाने अक्षरशः खावेच लागते असे नाही.एकदा माणुसकी संपली की,रक्त भक्षी पशू व राक्षसी माणुस यात फरक उरत नाही.या राक्षसी प्रवृतींचे संनियमन करणे श्रीरामाचे मुख्य कार्य होते.
एवढ्या दुर्गम अरण्यात सुध्दा त्यागी आणि परोपकारी ऋषीमुनीनी आपापले आश्रम थाटले होते.ज्ञानाचा आणि संस्कृतीचा प्रसार मृत्युचे भय न बाळगतां निर्भिडपणे व चिकाटीने आणि नितांत निष्ठेने करीत होते.श्रीराम,लक्ष्मण आणि सीता वनांत आलेले पाहुन,आश्रम वासी प्रसन्न मनाने त्यांना मंगलाशिर्वाद देऊन फळे,कंद,मुळे,फुले अर्पण
करीत ते म्हणत,आपण राजधानीत असला काय किंवा वनांत,आमचे राजे या नात्याने समस्त जनसमुदायाचे पालक आहांत. तिघेही निबिड अरण्यांत शिरल्या वर त्यांची गाठ विराध नांवाच्या भयानक राक्षसाशी पडली.जव आणि शतह्रदा यांचा मुलगा हा विराध!जव म्हणजे सुक्ष्म तसेच अतिवेगवान!आपला जीव अनुहुन लहान,पण त्यात विलक्षण शक्ती दडलेली असते.ही शक्ती कधीही पुर्या न होणार्या वासनापुर्तीसाठी वापरली जाते यातुनच विराध म्हणजे विपरीत इच्छा पूर्तीच्या आसक्तीतुन विपरीत कृत्यांची आराधना करणारी राक्षसी वृत्ती उफाळुन येते.
राक्षसी प्रवृत्तीचा द्योतक असणार्या विराधाला विश्वकर्त्याकडुन अवध्यतेचा ‘वर’ मिळाला होता.विराध राक्षसाची मजल सीतेला पळवण्यापर्यंत जाते तेव्हा रामलक्ष्मणाने तीक्ष्ण बाणांनी विराधला घायाळ केल्यावर,सीतेला सोडुन त्या दोघांना आपल्या प्रबळ हातांनी उचलुन खांद्यावर घेतले व वेगाने वनांत शिरला हे पाहुन सीता भयाने ओरडु लागली.रामलक्ष्मणाने वेळ न दवडता धारदार तलवारीने विराधचे दोन्ही हात खांद्यापासुन छाटले.विराध घायाळ होऊन जमीनीवर पडला पण अवध्य असल्यामुळे मेला नाही.जमीनीत खोल खड्डा खोदुन त्यात विराधला पुरले व वरुन जड शिलाखंड ठेवले.याचाच अर्थ,वासनेच्या बेलगाम उद्दामपणाचे राक्षसी चाळे वरपांगी तोडुन प्रश्न सुटत नाही तर,अशा विपरीत आसक्तीला मुळा पर्यंत जाऊन खोलवर कायमचे गाडावे लागते.
महाबलशाली भयानक विराध राक्षसाला संपविल्यावर,या दुर्गम,कष्ट दायक निबिड अरण्यांत राहण्यापेक्षा तिघेही शरभंग ऋषीच्या आश्रमांत पोहोचले तेव्हा,शरभंग ऋषी देहत्याग करुन ब्रम्हलोकात जाण्याची तयारी करुन श्रीरामाची वाट बघत होते.रामाचे दर्शन व सल्लामसलत होऊन शरभंग ऋषीं देहत्याग करुन ब्रम्हलोकाला गेले.यानिमित्याने आजु बाजुच्या आश्रमातील बरेच ऋषी व वनवासी जमा झाले होते.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ८-३-२०२१.
!!! अभिनव रामायण !!
भाग – १५.
शरभंगऋषीच्या आश्रमात जमलेल्या लोकांनी श्रीरामाचे यथोचित स्वागत करुन नम्रपणे म्हणाले,श्रीरामा! प्रजा ही धर्मानेच राखली जाते.राजाच्या राज्यात राहणारे ऋषीमुनी फळंमुळां सारखा साधा आहार घेऊन धर्माचे अनुष्ठान करतात व त्याचे श्रेय,पुण्य शासकाला मिळते.आम्ही वानप्रस्थाश्रमा त राहुन समाजकार्य करतो.पण तुझ्या सारखा प्रबळ शासक असुनही आम्ही एखाद्या अनाथासारखे राक्षसांकडुन मारले जात आहोत.नंतर मारल्या गेलेल्या वनवासीयांचे हाडाचे सांगाडे श्रीरामाला दाखवुन म्हणाले,आम्ही रक्षणाची याचना घेऊन तुझ्याकडे आलो
हे ऐकताच राम सविनय म्हणाले, मुनिवर! याचना नको आज्ञा करा!राक्षसी प्रवृत्तीच्या निशाचरांकडुन आपले सरंक्षण करण्यासाठी पित्याच्या आज्ञेने व आपल्या लोकांचा हेतू साध्य व्हावा या यदृच्छेने वनांत पोहोचलो आहे.आपल्या
रक्षणाचा हेतू साध्य झाल्यावरच माझा वनवास सफल होईल.
शरभंगऋषीच्या सल्ल्यानुसार राम लक्ष्मण,सीता बराच खडतड प्रवास करुन सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमांत जेव्हा पोहोचले,तेव्हा सुताक्ष्णमुनी ध्यानमग्न होते.त्यांनी डोळे उघडल्यावर त्यांना श्रीरामाचे दर्शन झाले.त्वरेने उठुन श्रीरामांना दृढ अलिंगन देत म्हणाले, रघुश्रेष्ठ श्रीरामा!सत्यवादी लोकांमधे तुझा दर्जा फार वरचा आहे.तू भेट देऊन या आश्रमाला सनाथ केले.मी तुझीच वाट बघत होतो.ती रात्र तीघांनी सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमात काढली.पहाटे लवकर उठुन नैमत्यीक कार्ये आटोपुन सुतीक्ष्ण मुनींना अभिवादन करुन पुढे जाण्याची अनुमती मागीतली.चरण स्पर्शासाठी वाकलेल्या श्रीराम-लक्ष्मणा ला प्रगाढ अलिंगन व आशिर्वाद देत म्हणाले,दंडकारण्यांतील इतर आश्रम बघुन परत याच आश्रमाला यावे.
ठीक! असे म्हणुन तिघेही पुढच्या प्रवासास निघाले.विंध्याद्रींच्या जवळपास च्या आश्रमांच्या परिक्रमेत अनेक आश्रमांना श्रीरामाने भेटी दिल्यात.कधीकधी एखाद्या आश्रमांत दुसर्यांदासुध्दा गेले.कोणत्या आश्रमांत दहा महिने,कुठे सालभर,कुठे चार तर कुठे ५-६ महिने अशा प्रकारे विभिन्न ऋषींच्या आश्रमांत श्रीरामांनी वनवासाची दहा वर्षे काढली.नंतर पुनः राम,लक्ष्मण,सीता सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमांत परत आल्यानंतर,श्रीरामाने अगस्तीऋषींबद्दल विचारले असतां, सुतीक्ष्ण ऋषी प्रसन्न होऊन म्हणाले, येथुन चार योजने अंतरावर अगस्तीच्या भावाचा आश्रम आहे,तिथे एक रात्र विश्रांती घेऊन पुढे दक्षिणेस आणखी एक योजना अंतरावर अगस्तीऋषींचा आश्रम आहे.
अगस्तीऋषींचे दर्शन घेण्याच्या शुभ कार्याला विलंब न लावतां लगेच प्रस्थान करा!सुतीक्ष्णऋषींचा निरोप घेऊन अनेक चित्रविचित्र वने,जलाशय, नद्या बघत,मेघांसारख्या काळ्या पत्थरां नी बनलेल्या पर्वतरांगा ओलांडत श्रीराम फळाफुलांनी बहरलेल्या वृक्षराजीच्या अगस्तीऋषींच्या भावाच्या आश्रमाजवळ आले.दैत्यांना परास्त करुन,अगस्तींनी लोककल्याणार्थ दक्षिण दिशा निर्वेध व सुरक्षित केल्या.ती रात्र त्या आश्रमांत काढुन दुसर्या दिवश अगस्तीऋषींच्या आश्रमांत पोहचले.स्वतः अगस्तीऋषी बाहेर येऊन अतिथींचा आदरसत्कार केला.
भोजनोत्तर श्रीरामाची स्तुती करुन,अगस्तीऋषींनी अनेक आयुधे, प्रत्यक्ष विश्वकर्त्याने निर्माण केलेले रत्न जडीत धनुष्य,विष्णुंनी दिलेला सूर्या सारखा तेजस्वी बाण,तीक्ष्ण बाणांचा कधीही न संपणारा अक्षय भाता,आणि शुध्द सोन्याचा रत्नजडीत मुठीच्या दोन धारदार तलवारी,असे शस्र दाखवुन श्रीमाला ते म्हणाले,फार पुर्वी याच धनुष्याचा विष्णुंनी उपयोग करुन,असुरां चा संहार करुन,देवांना त्यांचे वैभव परत मिळवुन दिले होते.श्रीरामा ही शस्रे स्विकारुन राक्षसांवर विजय प्राप्त कर! आयुधे स्विकारुन रामाने त्यांना नम्रपणे, कुठे आश्रम थाटावा म्हणुन विचारले असतां,ऋषींनी थोडा विचार करुन म्हणाले,इथुन थोड्या अंतरावर गोदावरी काठी पंचवटी नांवाचे एक विख्यात स्थान आहे,तिथे मुबलक फळंमुळं आणि पाण्याची सुविधा पण आहे.त्या प्रदेशाती ल तापसांना राक्षसांपासुन रक्षण करण्या च्या दृष्टीने तिथे वास्तव कर!
महामुनी अगस्तींचा आदरपुर्वक निरोप घेऊन,राम,लक्ष्मण,सीता पंचवटी च्या मार्गी लागले.वाटेत त्यांना मोठ्या आकाराचा गिधाड जातीचा जटायू नांवाचा पक्षी भेटला.दोघांत मैत्रीचे नाते जडले.जटायू म्हणाला,हा प्रदेश हिंस्र पशु पक्षी व राक्षसांचा असल्यामुळे,आपल्या निवासाची व सीतामाई एकट्या असल्या तरी रक्षणाची जबाबदारी माझेवर असेन.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ९-३-२०२१.


