
संतवाड्ःमयाच्या अभ्यासकाला समर्थ वाड्ःमय टाळुन पुढे जाताच येत नाही. इतर संतापेक्षा अगदी वेगळी वाट चोखळलेला हा शस्रधारी संत! स्वान्तुसुखाय अध्यात्ममार्गाच्या बरोबरी नं पुरुषार्थ घडणार भक्कम समाजरचनेची आलोचना करणारा हा संत! माणुस-माणुस अंतर्बाह्य पारखुन शिवकारणासाठी जोडण्याचा प्रचंड अभियान आयोजणारा हा द्रष्टा धर्मगुरु!
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!श्री समर्थ रामदास !!
श्री समर्थ रामदास
भाग २१
उत्तरप्रांताची सीमा जरजशी जवळ येत होती, तशी रामदासांची बेचेनी अधीक वाढु लागली,कारण यवन सत्तेचा वरवंटा अमानुषपणे सर्वत्र फिरत होता. रयतेची ससेहोलपट, धर्माचा विनाश, ओस पडलेली गांवे, स्वकीय, स्वार्थांध, क्रौर्याच्या कथा तर असंख्य! हे सर्व पाहुन रामदास अंतर्बाह्य पेटुन उठत.पण त्याचा दृढ विश्वास प्रभू राम चंद्रावर होता. त्याच्या अस्तित्वामुळेच अत्मारामाचा बोध झाला.शोकावेगाच्या एका घातक क्षणी प्रभूच्या अस्तित्वाची शंका घेतल्याबद्दल त्यांना अत्यंत वाईट वाटले. बुंदेलखंड सोडुन ऊत्तरेची वाटचाल करीत असतां रामदासांची मानसिक अवस्था पुनः राममय झाली. त्यांच सर्व अस्तित्वच रामविचारांनी वलयांकित झालं होतं.
एका कंदबवृक्षातळी बसुन समर्थ रामभजनांत तल्लीन होते. त्यांनी डोळे उघडल्यावल समोर एक वृध्द महात्मा, इतर बैरागी, गोसाव्यांपेक्षा वेगळा आणि जवळचा वाटला. त्याने समर्थांना एक कुबडी भेट दिली. कुबडीचा वरचा भाग फिरवल्यावर अर्धा वाव लांबीचं दुधारी शस्र होते. समर्थांनी कुबडी मस्तकाला लावल्याबरोबर एक तेजस्वी चेतना जाणवुन सार्या अंगात विद्युल्लतेची चमक संचारली, सारे गात्र निमिषभर स्थिर झाले. आणि कुठलीतरी अबोध शक्ती स्फुरण पावु लागली. समर्थांनी आजुबाजुला पाहिलं तर कुणीही नव्हते.
रामदासाचं रक्षण करण्याचा, रामचंद्रां नी दिलेला आदेश मारुतीरायाने पाळला होता! समर्थ सद्गगदित होऊन नेत्रात आसवांनी दाटी केली. समर्थ मारुती रायाच्या मुर्तीला कवटाळुन भुभुःकार करुं लागले, मोठ्या आवाजात म्हणू लागले,” रामदूत, वायुसूत,भीमगर्भ जुप्तती। जो नरात, वानरा भक्तीप्रेम, विप्तती। दासदक्ष, स्वामीपक्ष,नजिकाज, सारथी। वीरजोर, शिरजोर,धक्काधिंग, मारुती।।” देहभान विसरुन समर्थ अविरत धावत सुटले. चित्रकुट मागे पडला. कपिराणा अनंत वेशात, अनेकवेळा आपल्यासमोर येतात पण त्यांना ओळखु शकलो नाही याचे त्यांना फार वैशम्य वाटले, मन अस्थिर झाले. कुणी बैरागी, सैनिक, पथिक,पुजारी, भगत असे अनेक रुपात आपली यात्रा निर्विघ्न पार पडण्यासाठी मदत करीत होते, मी मात्र मारुतीरायाला ओळखले नाही.क्षमा कर रे बलभीमा, मारुतीराया,
यापुढे क्षणभरही तुला विसरणार नाही.जिथं वास्तव्य करीन तिथं तिथं तुझी प्रतिष्ठापना करुन येणार्या प्रत्येका ला तुझी उपासना करायला सांगेन!विचारांच्या आवर्तनात समर्थ पडत झडत, रात्रंदिवसाचे भान हरपुन सरयू तीरावर पोहोचले. अर्ध्या कोसावर राम जन्मभूमी होती. घाटावरच्या नागेश्वर व शरयूगंगेचे दर्शन घेऊन सात मोक्षपुरीं पैकी एक मोक्षपुरी प्रभूरामचंद्राची ही राजधानी सार्या ईक्क्षाकु कुलांच ह्रदय स्थान वैवस्वतमनुनं ही नगरी वसवली .
रामजन्माच्या पर्वणीला तर अवघ्या भारतवर्षाचं विविधरंगी रुपच प्रभू राम चंद्राच्या पुण्यभूमीच्या दर्शनासाठी आतुरतेने विविध वाहनांनी जमा झालेत. अचानक धावपळ, आरडा ओरडा किंकाळ्या, आक्रोश यांनी सारा आसमंत ढवळुन निघाला. यात्रेकरुंची कत्तल, सर्वत्र रक्तमासांचा चिखल, पाशवी सत्येने धर्मस्थानावर जिहाद पुकारुन क्षणार्धात होत्याच नव्हतं करुन निघुन गेले.एक यवन समर्थाजवळ येऊन तलवार उपसली असतां, समर्थां नी कुबडीतील विद्युल्लताने त्याचा प्राण घेतला.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.
श्री समर्थ रामदास
भाग – २२
या अमानुष अत्याचाराने व्यथीत झालेले समर्थ अयोध्येस न जाता सप्ताह भरात ते मथुरेस पोहोचले. तिथेही हेच दृष्य! यवनांच्या रुपाने अत्याचार कंस पुनः अवतरल्याची ही खुण…. तीन दिवस कोणी समविचारी भेटतो का? याचा अंदाज घेत माधुकरीच्या निमित्या ने भटकत राहिले. सांपडला एक हरीकृष्ण जो यावणी अत्याचाराच्या असह्य वेदनेने अंतर्बाह्य व्यथीत झालेला एखादी तरुणांची संघटना उभारुन निदान आपल्या विभागाची संरक्षण फळी बळकट करावी, यासाठी त्यांची धडपड चालली होती. हरीकृष्ण मूळ महाराष्र्टातलाच असल्यामुळे समर्थांची तळतळ त्याला पटकण जाणवली.
आणि तो समर्थशिष्य झाला. मथुरेला झालेल्या सांप्रदाय मठाचा तो मठापती झाला. मथुरेप्रमाणेच अयोध्यालाही हरी कृष्णाच्या साह्याने त्याचा मित्र रामकृष्ण ने सांप्रदायिक मठाची स्थापना करुन तिथला मठाधीपती झाला रामकृष्ण! वारंवार अनुभवललेल्या भिषण घटनांनी तप्त झालेलं मन शांत होण्यासाठी समर्थ हिमालयाकडे निघाले. हिमालया च्या पायथ्याशी हरीद्वारला पोहचल्यावर समर्थ थोडे शांत झाले.तिथुन ते ह्रषिकेशकडे वळले. ह्रषिकेशला आद्य शंकराचार्यांनी गंगाकिनारी बांधलेल्या चंद्रेश्वर महादेवाच्या मंदिरात समर्थानी तीन रात्री मुक्काम केला…. त्यानंतर चालत चालत तिसर्या दिवशी संध्या काळचा मुक्काम देवप्रयागच्या रघुनाथ मंदिरात पडला. गंगा आणि अलकनंदा या हिमकन्यांचे संगमस्थान!
एक दिवस विश्रांती घेऊन समर्थ रुद्र प्रयागकडे निघाले. रात्रीचा मुक्काम कण्वत्रृषींच्या आश्रम परिसर श्रीनगरला रात्रीचा मुक्काम केला. जवळच कोटद्बार सम्राट भरताचं जन्मस्थान! दुसर्या दिवशी समर्थांनी रुद्रप्रयागच्या जंगलातील एका देवदार वृक्षाखाली ध्यानस्थ असतांना पाठीच्या मेरुदंडात अचानक विजेचा संचार झाला.वातावर णांत केशर कस्तुरीचा परिमळ दरवळला समर्थासमोर प्रत्यक्ष महारुद्रानं हुर्मुजी रंगाची जाड लोकरीची अंगभर घालता येईल अशी पायघोळ मेखला ठेवली व अंतरी ज्ञानप्रकाश पडला. इथेही थंडी पासुन बचावासाठी महारुद्र हनुमान कफनी घेऊन सहाय्यास आला.
दुसर्या दिवशी पहाटेच कफनी घालुन मजल दर मजल करत गुप्तकाशी ला आले. मनकर्णिका कुंडात स्नान व अर्ध्य देऊन त्रिगुजी नारायण, सोमप्रयागवरुन गौरीकुंडाला आले… चौदा कोसांचा सरळ चढ चढुन समर्थ पांडवांनी स्थापिलेल्या ज्योतिर्लिंगाचं केदारनाथाचं दर्शन घेऊन शंकराचार्या च्या समाधीपुढे नतमस्तक झाले. केदार नाथाची यात्रा सफल झाल्यावर ते बद्रीनारायणाकडे वळले. दीड मासाच्या अखंड वाटचालीनंतर समर्थ बद्रीनाथला पोहोचले. पंचकपाल, वसुधारा,व्यास गुंफा या सार्या तिर्थांचे दर्शन घेऊन एक रात्र व्यासगुंफेजवळ ध्यान लावलं. व्यासांचा आशिर्वाद त्यांना लाभला.
उत्तरखंडाची यात्रा संपवुन समर्थ अंतरवेदीत परतले. तिथे हरिश्चंंद्र नांवा चा एक कर्तुत्ववान शिष्य मिळाल्याने आणखी एका मठाची स्थापना झाली. प्रल्हाद घाटावरच्या कबिराश्रमात समर्थ शांतपणे पहुडले असतां त्यांना खुप छान स्वप्न पडले त्यात त्यांनी पाहिले म्लेच्छांचा नायनाट झाला. पापी औंरगजेब बुडाला. तोडलेली मंदिरे पुनः उभारल्या गेलीत. चांडाळ, पातकी फितवेखोर देशोधडीला लागुन रसातळा ला गेले. अवनी मंगलमय झाली. मायभूमी आनंदवनभूमी झाली…! जाग आल्यावर सत्याची तिव्रता वाढली.यात्रा संपवुन मायभूमीला जाण्याची ओढ लागली. ” मर्हाटा तितुका मेळवावा। महाराष्र्ट धर्म वाढवावा।।”
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.
श्री समर्थ रामदास
भाग – २३.
शके १५६४ मधे शिवाजी महाराजांंनी रोहिडेश्वरी स्वराज्याची शपथ घेतली. रायरेश्वराच्या पिंडीवर अंगठ्याच्या रक्ताचा अभिषेक केला. समर्थांनी काशीला मठस्थापना करुन रामचंद्र नांवाच्या शिष्याकडे मठ व्यवस्था सोपवुन काशीक्षेत्र सोडलं.परत अखंड वाटचाल सुरु झाली. बुध्दगया, गंगासागर भुवनेश्वर, गयेला जगन्नाथ,मच्छलीपट्टणला कृष्णेचं सागरमीलन,तिरुपतीचा बालाजी, मदुरेची मीनाक्षी, श्रीरंगपट्टण,उडप्पीचा चंद्रमौलेश्वर,परशु रामभूमी, गोकर्ण, कोल्हापुर करत टाकळीला पोहचलेत. वाटेत ऊध्वव भेटला. उध्दवाने टाकळीच्या मठाचं छोटसं रोपटं मशागत करुन मोठ्या वृक्षात रुपांतर झालं!
ऊध्दवासह समर्थ पंचवटीत येऊन प्रभूरामचंद्रापुढे विनम्रपणे नतमस्तक झालेत. आवेगात त्यांची समाधी लागली बाह्यसृष्टीचे अवधान संपुन आंतरदृष्टीचे कवाड उघडले. प्रभूरामचंद्र प्रगटुन आवेगाने समर्थांना उराशी कवटाळले. शांत स्वरुपाचं स्मितहास्य करत प्रभू म्हणाले, उठ नारायणा! तुझी साधना संपली. सह्यांद्रिच्या दरीखोर्यात महा पर्वाच्या शुभारंभाचा पडघम दुमदुमतो आहे, ते शब्दबध्द करुन मोहनिद्रेत असलेल्या मानवसमूहाला जागृत कर!आत्मतत्वाचा बोध करुन जे बाह्यदृष्टी ला दिसत नाही ते मनाच्या डोळ्यांनी पाहण्याची प्रेरणा प्रभु रामचंद्रांनी दिली.
गेल्या चोवीस वर्षापासुन मातेची, स्वजनांच्या भेटीची ओढ लागल्याने रामदास टाकळीकरांचा निरोप व उध्ववा ला उपदेश करुन रामदास जन्मभूमीकडे निघाले. जातांना पुणतांब्याचे जिवाजी पंत दशपांडेच्या विधवा सुनेने आपला चार वर्षाच्या मुलाला समर्थांच्या पायावर ठेवले. समर्थांनी त्याला सांप्र दायाला प्रापंचिक शिष्य म्हणुन दीक्षा दिली. तिथुन समर्थ पैठणला आले, एकनाथांच्या सुक्ष्मरुपाशी हितगुज झाले रात्री नाथमंदिराच्या प्रांगणांत त्यांनी किर्तन केले. प्रांगण श्रोत्यांनी फुलुन गेले किर्तन सुरु असतांना जांबचे केशव इनामदारांनी समर्थांना ओळखले.किर्तन संपल्यावर समर्थांची भेट घेऊन म्हणाले, तुझी आई अहोरात्र तुझी वाट बघत आहे. ती तुझ्या वियोगात ठार आंधळी झाली. वडीलकीच्या अधिकाराने ते म्हणाले, मातृसेवा हीच इश्वरसेवा! म्हणुन तू पुत्रकर्तव्य पुर्ण कर……
केशववरावांच्या तळमळीच्या बोलण्याने समर्थ गहिवरले. क्षणाचाही विलंब न करतां २४ वर्षानंतर जांब गावात स्वतःच्या दारासमोर ऊभे राहुन धीरगंभीर आवाजात म्हणाले…. प्रभाते मनी राम चिंतीत जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा। सदाचार हा थोर सांडु नये तो। जनी तोचि तो मानवी धन्य होतो।।”
मांजघरांत बसलेल्या राणुबाईंनी मोठ्या सुनेला बाहेर आलेल्या भिक्षेकर्याला स्वयंपाक झाला असल्या स नैवद्य घाल म्हणाल्या. तेवढ्यात बाहेर खेळत असलेल्या दोन्ही पुतण्यांना खांद्यावर बसवुन माजघराच्या दारांत येऊन समर्थ म्हणाले, वहिणी! मला ओळखल का? म्हणत माजघराच्या अंधार्या कोपर्यांत बसलेल्या आईकडे धाव घेतली. आपल्या जीर्ण हाताने समर्थांना कवटाळले. मायलेकराच्या या विहंग भेटीत आनंदाश्रु वाहु लागले. आईची दृष्टी येई पर्यत जवळ राहण्याचे आश्वासन दिले. तेवढ्यात मोठे बंधु गंगाधरपंतही आले सर्वांनी मिळुन आनंदात जेवण उरकवले
लक्षावधींना सौख्य देण्यार्या रामदासा मुळे एका अश्राप जीवाला कायमचे लग्नाच्या बेडीतुन सोडुन पळुन गेल्याने जन्माचे दुःखी करुन कायमची वेदना तीला दिली, हेही त्या परमेश्वराचे लीला नाटकच! रामचद्रा तुझा हा खेळ ज्याला उमजला तो सुटला, नाही कळला तो अडकला भवचक्रात……
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.
श्री समर्थ रामदास
भाग – २४.
भोजनोत्तर जेष्ठ बंधुला आतांपर्यंतच्या सर्व घटना विदित करुन समर्थ म्हणाले, देवांनी, देशकार्य, धर्मध्वजा स्थापना करायच्या दिशा सांगीतल्या. आत्मज्ञानासाठी मला संसाराकडे पाठ फिरवावी लागली.कधी अडलो तर, आपण अधिकारी, श्रेष्ठत्व असल्याने आपल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.
दुसर्या दिवसापासुन आईच्या डोळ्यावर ऊपचार सुरु केला. आणि त्यांच्या उपचाराला फळ आले. राणुबाई ना दिसुं लागले. आईला स्वठीकाणी कोंदडधारी राममुर्तीचे दर्शन घडविले. नंतर त्यांनी सर्व स्वकीयांचा निरोप घेऊन त्यांच्या शोकदुःखाला, आग्रहाला मनापर्यत पोहचु न देता विहित कर्तव्याला समोर जाण्यासाठी जांबची वेस ओलांडली. गांवोगावी किर्तन, निरुपन, देशकालपरिस्थीतीचं निरिक्षण करीत कोणत्याही गांवात न रमतां समर्थ कृष्णातीरी झपाट्याने निघाले.
भ्रमणामधे अखंड चिंतन करत, गाणगापुर, अमरजा, भीमेचा संगम, मैंदगी, अक्कलकोट, सोलापुर या मुसलमान प्रांतातुन उजवीकडे आदिमाया तुळजाभवानीच्या मंदिरात पोहोचले. देवीचे दर्शन घेत कळवळुन तीला विनवीत म्हणाले, “दुष्ट संहारीले मागे। ऐसे उदंड ऐकतो। परंतु रोकडे कांही। मूळ सामर्थ्य दाखवी।। क्षमावे तुजळामाते।इच्छा पुर्णचि ते करी। तूझा तू वाढवी राजा। शीघ्र आम्हाचि देखता।।” समर्थ कार्तिक द्वादशीला चंद्रभागेतीरी पंढरपुरला आले….. पुंडलीकाच्या राऊळापुढे देहूचे पुर्ण आत्मज्ञानी तुकाराम महाराजांचे किर्तन सुरु होते. किर्तन संपल्यावर दोघांनीही एकमेकांना प्रेमालिंगन दिले. एकादशी ला दोन महापुरुषांची भेट झाली. एक भक्तीमार्गाने पूर्णांनंदाकडे जाणारा… एक शक्तीमार्गाने पुर्णानंदाकडं जाणारा..!”
याच वेळी शिवबांनी तोरणा जिंकुन स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली. समर्थांच्या समाधिस्त मनाच्या तटावर एक भगवी धर्मध्वजा डौलानं फडकु लागली. समर्थ शिखर-शिंगणापुरचा निरोप घेऊन माहुली क्षेत्री आले. सह्यांद्रीच्या सार्याच कन्यापुढे माणूसधर्माच्या विकासासाठी भिक्षेची झोळी पसरुन
सज्जनसंरक्षणासाठी, दुरीतांचा निःपात करण्यासाठी, हे! आदीमाया! एकेक तेजस्वी स्फुल्लिंग फुलु दे। महाबळेश्वरा चं सह्याद्रितील उंच पठार समर्थांना भावलं! त्यांना आपल्या कार्याची मुहुर्तमेढ रोवायला, धर्मध्वजा उंचवायला सुयोग्य जागा सांपडली. त्यांनी मारोतीरायाच्या भुभुःकाराप्रमाणे गर्जना केली. “मराठा तितुका मेळावा। महाराष्र्टधर्म वाढवावा।। जयजय रघुवीर समर्थ! ही अभिनव गर्जना महाबळेश्वराच्या देवळात रुद्राभिषेक करणार्या दिवाकार देशपांडेच्या काना वर पडल्यावर त्यांनी समोर बघीतले तर प्रत्यक्ष हनुमंतच दिसले. त्यांनी समर्था च्या चरणावर मस्तक ठेवले, व आशिर्वाद देत इथे येण्याचे प्रयोजन सांगू लागले……
शिवबा भोसलेंनी पिता शहाजी राजांचे स्वत्न पुरं करण्यासाठी तत्पर असलेल्या त्यांच्या स्वप्नपूर्तीमागं विचारां ची बैठक देण्याचे कार्य करणेसाठी या क्षेत्री आलो आहे. शिवबा सारख्या धडाडीच्या तरुण युवकाच्या चळवळी ला लोकाभिमूख करण्यासाठी बलभीमा ची स्थापना करुन सार्या खोर्यातील तरुणांना एकत्र करुन बलोपसना, शस्रास्र, अधर्मापुढे ठामपणे उभे राहण्यासाठी बलशाली करायचे कार्य हाती घ्यायचे आहे. हा तरुणराजा शिवशंकराचा अवतार आहे. भारावून दिवाकर म्हणाले, आपल्या या महान कार्यात स्वतःला झोकुन देईन. समर्थांनी दिवाकरला दीक्षित केले समर्थशिष्य दिवाकर गोसावी तिथे नव्याने स्थापना केलेला मठपती झाला.समर्थांनी त्याला संथा दिली.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.
श्री समर्थ रामदास
भाग -२५ .
समर्थांनी दिवाकर गोसावीचा निरोप घेतला. वेलंग गांव ओलांडुन जीथे धौम्यत्रृषीचे वास्तव्य होते त्या धौम्यक्षेत्री आले. धोमेश्वराच्या मंदिरात रात्र काढून समर्थ भोगाव, मेणवती या लहान खेड्यांमधुन वाईक्षेत्री आले. एका उंच कडेवर पुरातन शिवमंदिर! रामडोह, भीमकुंड नांवाने प्रसिध्द असलेले कृष्णा माईचे घाट, त्यावर उंच होत गेलेली वस्ती! संस्कृती आणि विद्या यांच माहेर घर म्हणून या क्षेत्राची दूरवर पसरलेली ख्याती! इथली तरुणपीढी ऊत्साही, कांही अभिनव मिळालं की झपाटुन जाणारी व्यक्तीगत मतभेद विसरुन खांद्याला खांदा लावून काम करणारी, निर्मळ मन, अशा तरुणांना समर्थांनी हेरले. त्यांच्या कानी आपल्या विचारांची फुंकर घालुन बलभीमाची स्थापना केली गुप्तपणे हे विचार समाजात रुजवुन बलोपसना करुन शरीरसंपदा वाढवावी असा ऊपदेश करतांना समर्थांनी बलभीमाचं रोकडा असं नामकरण केले.
या क्षेत्राचं, रोकडोबाचं आणि दक्षिण गंगा कृष्णाबाईचं पावित्र्य आबिधित राखण्याचं कार्य तरुणांवर सोपवलं. धर्माच्या प्रसाराचे एक केंद्र रोकडोबाच्या रुपाने, अधर्माच्या आड येऊ घातलेल्या एका विक्राळ लाटेला थोपवायला, समर्थ विचारांचा एक लहानसा घाट तयार झाला राजगडाच्या उत्तरेला असलेला कोंढाणा शिवबांनी किल्लेदारांशी गोडगोड बोलुन अगदी सहज मिळवला. खांद्यावर धर्मध्वजा घेऊन निघाला राष्र्टगुरु गावोगावची तरुण मन चेतवीत, देशधारणेसाठी अर्पन करणारी तरुण मनं हवी होती. समर्थ म्हणत, नुसती देवदेव करुन भागत नाही. निःपात करण्यासाठी आतां राघवाच्या रुपानं शिवबा अवतरले आहे. या तरुण रामावताराच्या मागे वानरसेनेसारखं उभं राहायला हवय!
जरंड्यावर जयरामस्वामी, रंगनाथ स्वामी, देहुचे तुकोबांचीही भेटी घडल्या. माहुलीला लोकजागृतीची मशाल चेतवुन हा देवाचा भुत्या मसुरीच्या राम उत्सवासाठी निघाले. समर्थांच्या किर्तन निरुपणानं मसुरीचा ऊत्साह द्विगुणीत होत समर्थांची किर्तने रंगु लागलीत. शिष्यसंप्रदाय वाढू लागला. मसुरीहुन कर्हाड, कोल्हापुर अगदी पंचगंगे पलीकडे पर्यत रामगजरानं दुमदुमला. जिथे जिथे प्रतिसाद मिळेल तिथे तिथे मारुतीची स्थापनि होऊन मन व शरीर सुदृढ होऊ लागली. कृष्णमाईचा हा सारा परिसरच हनुमानाच्या शक्ती स्थापनांचा एक समूहच झाला.
शहापुर, मसूर, उंब्रज, पारगांव, शिराळा, मनपाडळ, माजगांव, बहे या आठ गांवातील तरुण या अभिनव संप्रदायाकडे वळली. अजुन तीन मारुती ची स्थापना करायची होती. त्यासाठी योग्य स्थळाच्या शोधात होते. याचबरोबर मुख्य केंद्र स्थापुन रामचंद्रा ची प्रतीष्ठापना करुन रामकार्य शिव कार्याला जोडायचे होते. या परिसरांत उध्वव, राजकारण चतुर दिवाकार, उत्तम हस्ताक्षर आणि हत्तीचं बळ असलेला अंबाजी उर्फ कल्याण, शिरगांवचा दत्तात्रय, ऊत्तम पुराण सांगणारा भैरव, वादविवादपटु व वेदां तावर अधिकार असणारा गणेश, आज्ञाधारक निरंजन, मुरारी, त्रिंबक, माधव, बुटका वामण, निःस्पृह चक्रपाणी, बाळकाराम, मिरजेचा वेणू, कराडची चिमणा उर्फ आक्का, राशि वड्याची अंबिका, शहापुरची सतीबाई ही सारी कृष्णाबाईच्या परिक्रमेत सांपडलेल्या रत्नांची रत्नमालाच समर्थांनी तयार करुन एका सुत्रात बांधले. कुणाचं लक्ष जाणार नाही असं प्रमूख केंद्र स्थापायचय!
क्रमशः संकलन-मिनाक्षी देशमुख.


