श्री समर्थ रामदास भाग ४, (१६ ते २०)

"तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।" असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇


संतवाड्ःमयाच्या अभ्यासकाला समर्थ वाड्ःमय टाळुन पुढे जाताच येत नाही. इतर संतापेक्षा अगदी वेगळी वाट चोखळलेला हा शस्रधारी संत! स्वान्तुसुखाय अध्यात्ममार्गाच्या बरोबरी नं पुरुषार्थ घडणार भक्कम समाजरचनेची आलोचना करणारा हा संत! माणुस-माणुस अंतर्बाह्य पारखुन शिवकारणासाठी जोडण्याचा प्रचंड अभियान आयोजणारा हा द्रष्टा धर्मगुरु!

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!श्री समर्थ रामदास !!

!!!  श्री समर्थ रामदास !!!

भाग  –  १६

यदा यदाहि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत।

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।।” जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा धर्माचा समूळ नायनाट करुन पुन्हा धर्मसंस्थापना करण्यासाठी देवा ला कटीबध्द व्हावे लागते. या रामचंद्रां च्या रुपानं हेच तर घडणार नाही ना? धर्मसंस्थाने बेचीराख होत आहे, पवित्र मूर्तीवर घण पडताहेत, कुलीन स्रीयांची विटंबना होत आहे, सामान्यजण अन्ना ला महाग झालेत, शुल्लक कारणांवरुन डोकी मारली जात आहे. हे सर्व थांबवाव म्हणुन खरा पौरुषधर्म, खरा राष्र्टधर्म हा राजयोगी नसलेला, उपभोग वर्ज्य असलेला तेजस्वी व्रतस्थ, क्षेत्रस्थ विरागी गोसावी आपल्या विचारमंथनातु न जो समोर येईल त्याला ओळख करुन देत होता. सार्‍या परिसराने रामदासांना एक बिरुद बहाल केले…. स्वामी! स्वामी रामदास! नंदिनीच्या घाटावर जिकडे तिकडे रामनामाच्या ध्वनींची शब्दकळा जागृत झाली.

      दूरवरुन राम शब्द कानी आल्याने सहजच त्या दिशेने बघीतले असतां नदीकाठी दहनासाठी एक प्रेत आणल्या जात होते. त्याचवेळी प्रेतयात्रेच्या मागुन सकल सौभाग्यलेण्यांनीयुक्त एक सुहासिनी येत असतां तीला रामदास दिसल्याने त्या सुवासिनीने त्यांना वाकुन नमस्कार केल्यावर अभावितपणे”अष्ट पुत्रा सौभाग्यवती भव्ः । असा उद्गार निघाल्यावर ती रामदासांना म्हणाली, हा अशिर्वाद पुढच्या जन्मासाठी सांगाती घेऊन जाते…! त्यावर रामदास म्हणाले, आजपर्यत प्रत्येक शब्द राम प्रेरणेनंच उच्चारला. तो सर्वज्ञ! वृथा आशिर्वादा ची प्रेरणा कधीच देणार नाही. 

         रामदास चित्तेवर ठेवलेल्या प्रेताजवळ आलेत. त्यांनी प्रेताचे दोन्ही तळपाय विशिष्ट पध्दतीने चोळले, ह्रदयाच्या स्पंदनावर दाब दिला. जवळच् च्या तुंब्यातील पाण्याचे सपकारे त्याच्या मुखावर मारलेत. आजपर्यंतच्या अभ्यासात आयुर्वेदाबरोबर शरीरशास्रा ची ही माहिती मिळवली होती. अतीव अशक्तपणामुळे रुग्णाची मृतवत अवस्था होते. प्रेताचा श्वासोस्वास सुरु झाला व कण्हत कण्हत लडखडत्या पायाने गिरिधरपंत चित्तेवरुन उतरुन धापा टाकत एका शिळेला टेकुन बसले. सती निघालेल्या अन्नपुर्णाबाईंनी रामदासांच्या पायावर अक्षरशः लोळण घेतले.त्याचवेळी गिरिधरपंताचा थोरला भाऊ डगर चढून दूर पळून गेला. बंधु मृत घोषीत केला, भावजय सती गेली की, वारसाहक्कानं सारं पदरी पडेल या विचाराने जिवंत भावाला मृत घोषीत केले होते. रामदासांनी कांही मुळ्या व चाटण दिले. प्रभूरामाच्या प्रेरणेने दिले ला आशीर्वाद खरा ठरला. अन्नपुर्णेसह गिरिधरपंत दशपंचक गावाकडे आणी रामदास आपल्या मठीकडे परतले!

        सती जाणार्‍या अन्नपुर्णाचा पती सदेह परत मिळाला व त्याचा असाध्य रोगही पुर्णपणे बरा झाल्याची वार्ता नाशकप्रांतात सगळीकडे पसररल्यामुळे  रामदांच्या दर्शन आणि आशिर्वादासाठी लोकांच्या झुंडीच्या झुंडी टाकळीत लोटल्या. या गलबल्याने रामदासांना नकोसं झालं. त्यांची एकाग्रता व तेरा अक्षरी जपाला व्यत्यय येऊ लागला.या लोकगंगेच्या महापुरातुन पैलथडी गाठण्यासाठी त्यांची अवस्था भ्रमिष्टा सारखी होऊ लागली. पण हळूहळु मना वर ताबा ठेवुन कर्तव्याच्या जाणीवेने मन स्थिर केले. मुक्ताबाईच्या अभंगा तील चरण आठवला.” विश्व रागे झाले वन्ही, संतीसुखे व्हावे पाणी। शब्दशस्रे झाल क्लेश, संती मानावा उपदेश।। या चरणाचा अर्थ प्रत्यक्षात आचरणांत आणण्यासाठी अंतरीच्या क्रोधावर ब्रम्हदोर्‍यात विणलेल्या विश्वपटाची फुंकर घालायला हवी ही जाणीव झाली

                  क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.

श्री  समर्थ  रामदास  !!!

भाग  –  १७.

          अखंड चिंतनान रामदासांच मन स्थिर झाल्यावर दुसर्‍या दिवशीपासुन दिनक्रम पुर्ववत सुरु झाला.पहाटे स्नानसंध्या, सुर्यनमस्कार, पुरश्चरण आणि मध्यान्हीला माधुकरीची फेरी, मनाने रचलेला एखादा श्र्लोक विष्णुशास्रांच्या अंगणांत मुक्तकंठाने म्हणत झोळी पुढे करावी. ” अविद्यागुणे मानवा उमजेना। भ्रमी चुकले हीत ते आकलेना। परीक्षेविणे बांधले दृढ नाणे। परी सत्य मिथ्या असे कोण जाणे।। जय जय रघुवीर समर्थ….. आज नवीन श्लोक वाटतं? म्हणत बाहेर येत विष्णुपंत म्हणाले, तू खराच साधक! तुझे श्र्लोक भविष्यकाळाचे वेद होऊन गांजलेल्या लोकांच्या व्यथेवर फुंकर घालतील. तू हे सर्व श्र्लोक लिहुन काढ! अक्षर वाडःमयात अमर होतील. मनाने मनानेच केलेला बोध! मनोबोध! मनाचे श्र्लोक…..

     विष्णुशास्रांनी सांगीतलेल्या चालना मुळे रामदासांनी दिनक्रमामधे साधने पाठोपाठ एकांतवासाला द्वितिय स्थान दिलं. सवंत्सर उलटलं. रामदास जास्तीत जास्त वेळ ध्यानगुंफेत आठव तील तसे व कांही नवीन मनाचे श्र्लोक

  लिहुन काढु लागले. सकाळी तरुण मुलांना जमवुन त्यांना ५०० पर्यंत सुर्यनमस्कार, संध्याकाळी भालाफेक, कुस्ती, करेला, तलवारीचे हात,लुटुपुटु च्या लढाया, घोडदौड असे अनेक प्रकार चे शिक्षण देऊन तरुणांचे आत्मबल व शरीरबल वाढवुन सुराज्यासाठी सैनिक घडवु लागले. ऐन तारुण्यांत रामदास निर्लेप झाले. आंतर्विश्वात दंग झाले.

     आणखी एक सवंत्सर सरलं… दशपंचक गावच्या अन्नपुर्णा व गिरिधधरपंत आशिर्वादाने मिळालेले पहिले मुल घेऊन टाकळीला रामदासां च्या मठीत येऊन म्हणाले, तुमच्या आदेशाप्रमाणे हे पहिलं फुल तुमच्या चरणी अर्पण करायला आणलं, आतां  

 तुम्हीच त्याचे मायबाप! रामदास म्हणाले, मी संन्यासी,माधुकरी मागुन एकभुक्त राहुन अन्नग्रहण करणारा, शिवाय अजुन माझी तपःसाधना ७-८ वर्षे चालणार! सध्या मुल फारच लहान आहे. त्याची योग्य वाढ  होण्यासाठी सध्या त्याला मातेची आवश्यकता आहे, माझी ठेव म्हणुन ८ वर्षेपर्यत तुम्ही घडवा.नंतर मी माझ्या कल्यनेनुसार घडवीन. त्याचे उपनयन संस्कार झाले की, माझ्याकडे सोपवा.पण तो गृहस्थाश्रमात प्रवेश न करतां माझ्या सारखाच ब्रम्हचारी राहील. त्याचं नांव उध्दव ठेवा. रामदासांची आज्ञा प्रमाण मानुन गिरिधरपंत पत्नीसह दशपंचक गांवाकडे आनंदाने व समाधाने परतले.

       रामदासांचा जास्तीत जास्त वेळ मनन चिंतनांत जाऊ लागला. ते अधिक च अंतर्मुख झालेत. एकांत गुफेत २१ समासांचा ओवीबध्द अभिनवग्रंथरचना साकार होत होती. याच सुमारास शहाजीराजांनी निजामपक्ष सोडुन दिल्लीच्या मोगलांची मनसबदारी पत्करली. दसर्‍याच्या सीमोल्लंघनानंतर शहाजीराजे मुलुखगिरीला बाहेर पडत आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला नाशकाला चार महिण्यासाठी छावणी टाकत, जहागिरीची व्यवस्था, कज्जे खटले निकाली काढणे, रयतेच्या दर्शन देऊन त्यांच्या समस्या सोडवणे,श्रावणा  त त्र्यंबकेश्वरी ब्राम्हणाकरवी अनुष्ठान, दानधर्म, समावर्तन करणे अशा विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात ते हिरीरीने सहभागी होत असल्यामुळे सहाजिकच टाकळीच्या या तरुण रामदासांची लोकप्रियता त्यांच्या कानावर गेली. २०-२१ वर्षाचा कठोर तपःश्चर्या करीत असलेला हा तरुण इतर तरुणांना बलोपसेनेचे, शस्रविद्येचे,अश्व रोहणाचे पाठ देतो, त्यांना प्रभुद्रांचा वरदहस्त आहे, मृताला संजीवनी मंत्रांनी जिंवत केले हे सर्व ऐकुन त्यांना रामदासांना भेटण्याची आकर्षण निर्माण झाल्याने रामदासांना आदरपुर्वक नाशकाला आणण्यासाठी टाकळीच्या बजाबा पाटलाकडे स्वार धाडला, पण स्वार हात हलवत परत आला, स्वामी सध्या एकांतस्थळी ग्रंथरचना करीत असल्यामुळे सांप्रत कुणासही भेट घेऊ शकत नाही!

              क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.

श्रीसमर्थ रामदास

भाग – १८

          शहजीराजांकडुन २-३ वेळा स्वार पाठवुनही रामदास वेगवेगळे कारणे सांगुन त्यांच्या भेटी टाळतात याचे शहाजीराजांना मोठे नवल वाटले,

कारण त्यांच्या आजपर्यंतचा अनुभव होता की, कुणालाही निरोप जाण्याचा अवकाश.., गोसावी,सन्यासी समस्या सह त्यांच्याकडे धावत यायचेत, शेवटी  शहाजीराजांनी स्वतःच भेटायचे ठरविले

        बजाज पाटलांच्या आग्रहावरुन मारुतीरायासमोर रामदासांचे निरुपण ऐकायला व पंचक्रोशीतील लोक जमा  झालेत. राम, कृष्ण, विठोबा  हे वेगळे नसुन एकच आहे ही भावना,कल्पना बहुजनांची दूर केली एखाद्या धबधब्या प्रमाणे रामदासांच्या मुखातुन बाहेर पडलेलं निरुपन पटांगणापासुन थोडं लांब उमे असलेले पंत आश्चर्यचकीत होऊन ऐकत होते, कोणाचही त्यांचेकडे लक्ष नव्हते. निरुपण संपल्यावर रामदास सुरेल आवाजांत गाऊ लागले..

“राघवाचे घरी सदा निरुपण। श्रवणं मनन नीज ध्यास।नीजध्यासे सत्य प्रचीती बाणली। साक्षात्कारे जाली सामुज्यता। सायुज्यता मुक्ती विवेके पहावी। अंतरी राहावी विचारणा।। विचारणा सासासार थोर आहे। अनुभवे  पाहे साधकारे।। साधका रे साध्य तूंची तूं आहेसी। रामी रामदासी समाधाना।।सर्व श्रोते तल्लीन, मंत्रमुग्ध झाले होते. तेवढ्यात पंत आल्याचे कळल्यावर, राम दासांनी त्यांना आदरपुर्वक मठीत बसविले, आणि म्हणाले, नंदिनीकाठी एक तपस्वी गेल्या दहा वर्षापासुन वाट बघत आहे.त्यांच्याशी कांही हितगुज करण्यासाठी एकांतात भेटायचेय!

        सार्‍या शह्यांना आपल्या जरबेत ठेवणारा मुगल साम्राज्याचा सरलष्कर टाकळीच्या दिशेने दौडत येत होते.गांव सीमेवर आल्यावर पांच सुहासिनींनी राजाला ओळाळले. त्यांच्या समोर २०-२१ वर्षाचा तेजस्वी साधक त्यांच्या समोर ताठ उभा होता. शहाजी राजे त्यांच्या दृष्टीस दृष्टी मिळवु शकले नाही, कारण त्या नजरेत एक धगधगतं अग्निकुंड पेटले असल्याचा राजांना भास झाला. राजांच्या इच्छेनुसार रामदास खणखणीत आवाजात म्हणु लागले…..”ज्याच्या घरी रोज मिष्टान्न आहे। तरी तोचि कां परान्नास साहे।। स्वतःच्या कृतीने कृतांतास जाळी। तया येर कां कोणी गोठ्यात पाळी।। जया आपले सत्व कांही कळेना। जया  शौर्य सामर्थ्र कांही कळेना।। असा संभ्रमी काय सम्राट होई। जगी जन्म घेई मरोनीच जाई।। राजांच्या कपाळावर धर्मबिंदु चमकु लागले. तसेच वळुन एकटेच घोड्यावर स्वार होऊन नाशकाकडे निघुन गेले.

       क्षणभर काय झालं कुणालाच कळेना. सर्वजन गडबडले. वळुनही न पाहतां रामदास आपल्या ध्यानगुंफेत जाऊन शांतपणे श्र्लोक लिहु लागले… मना सर्वथा सत्य सोडू नको रे। मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे।। मना सत्य ते सत्य वाचे वदावे। मना मिथ्य ते मिथ्य सोडोनि द्यावें।। सात दिवस रामदासांनी मौन पाळले. माधुकरीलाही गेले नाही. सातव्या दिवशी ते माधुकरीला गेले असतां बजाबा पाटलांनी सांगीतले की, शहाजी राजे सडेच भेटीला येत आहे. रामदास प्रसन्नपणे हसले. टाकळीकरां नी सुटकेचा निःश्वास सोडला.

      गेल्या सप्ताहभर शहाजीराजे अतिशय अस्वस्थ होते. त्यांनी सर्व कारभार, भेटी गाठी, कलावंतीणीचा जलसा, राणीवशा सर्वांना दार बंद करुन एकटेच महालात कोंडून घेतले.या तरुण सन्यासाने आपलं स्वरुप उघडं केलं!सर्व पराक्रम परकियांसाठीच, आपलं राज्य, रयत, ध्वज, नाणं, सारं असुन आपलं कांहीच नाही. जन्माला आलो, मरुण गेलो येवढीच आयुष्याच्या बखारीतील नोंद!

                     क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.

श्री समर्थ  रामदास

भाग – १९.

            शहाजीराजे अस्वस्थपणे महालांत येरझार्‍या घालत विचारांत मग्न होते. त्यांनीही मराठी अस्मितेसाठी प्रयत्न केला, पण स्वकीयांनी साथ न दिल्या मुळ्या मनांतील हलाहल उरांतच दडुन होतं, ते या समर्थ योग्यासमोर एकांतात उघड करण्याचे ठरविले. त्यांनी ध्यान गुंफेत रामदासांची उरभेट घेतली. रामदासांनी कळकळीने तळमळुन देशकालपरिस्थीतीचं चित्र राजांपुढे उभं केल…” पदार्थमात्र तितुका गेला। नुसता देहची उरला। जन बुडाले बुडाले पोटेविण गेले। कष्ट कष्टले कितीयेक मेले।। माणसा खावया अन्न नाही। अंथरुण पांघरुण तेही नाही।। कित्येक अनाचारी पडिले। कित्येक यतिभ्रष्ट जाली।। कित्येक ते आक्रंदली मुले,बाळे कित्येक जीवे घेतली। कित्येक जळी बुडाली। जालिली ना पुरिली। किती येक।।”

      शहाजीराजे आवाक होऊन ऐकत होते. रामदास तळमळुन सांगत होते.  “रडावे बोंबलवेना। लाथा बुक्या परोपरी।। उदंड तारणे होती। दुःख शोक विटंबना।। आधार पाहता नाही। कैवारी तो असेचि ना। देह त्याग बरा वाटे। दुःख ब्रम्हांड जाहले।। शहाजीराजांनी विचार ले, यावर काय उपाय? रामदास म्हणाले, “अवघे जन मेळवावे। धर्मकार्यासि लावावे। मर्‍हाट धर्माचे स्थापावे। प्रतिष्ठा स्वराज्य।” शहाजी राजांचेच विचार रामदासांनी त्यांच्या शब्दात व्यक्त केले. अंतरीची तार जुळली. दोघांचाही हेतू एकच असल्या मुळे राजांनी सार्‍या भावना रामदासांसमोर व्यक्त करुन पुण्याला येण्याची विनंती केली, रामदास म्हणाले, अनुभवसिध्द होण्यासाठी आधी देशाटन करुन देशकालपरिस्थिती,माणसं पारखा यला हवीत. सत्-असत् , धर्म-अधर्म याचं स्मरण करुन सैनिक निर्माण करणार्‍या मर्‍हाट धर्माच्या राजसिंहास नावर बसणारा शककर्ता तयार करण्याची आपली सर्वांची, मर्‍हाटदेशा चीच गरज आहे. पंथप्रसार झाल्या शिवाय झोपलेला देश जागा होणार नाही. दोन समविचारांची भेट झाली. शहाजीराजे एका चैतन्याची अंतरी झळाळी घेऊन शांतमनाने ध्यानगुंफे बाहेर येऊन ते नाशकाकडे परतले.

        पाऊस काळ संपला, घटस्थापना झाली. शहाजीराजांनी दसर्‍याचे सीमोल्लंघन करुन नाशकचा पावसाळी मुक्काम संपवून घोडदळ, पायदळ, तोफखाना घेऊन तलवार ऊंचावत शहाजीराजे उत्तरेच्या मोहिमेवर निघाले गजबजलेलं नाशक शहर शांत शांत झाले.

     दशपंचक गावातील गिरिधरपंतांनी उध्दवाचा आठव्या वर्षी मौजीबंधन सोहळा मोठ्या थाटांत पार पाडला.या  सोहळ्यासाठी आज प्रथमच रामदास गावात आले होते.उपनयन संस्कार संपल्यावर गिरिधरपंतानी उध्दवाला स्वामींच्या स्वाधीन केले. रामदास उध्दवासह टाकळी गांवाकडे निघालेत. देशाटनला जाण्याआधी शिष्यासाठी मठ तयार करणे, मठात गोमयाच्या मारुतीची स्थापना करणे, बारा वर्षानंतर ऊध्दव आपली प्रतीकृती होण्यासाठी त्याचेवर योग्य संस्कार करुन शिक्षण देणे, असे विचार रात्रभर रामदासांच्या मनांत सुरु होते.

     बजावा पाटील व गांवकर्‍यानी मठाशेजारी नवी इमारत उभारली. लता पल्लवांनी शृंगारलेल्या मठात उध्दवासह रामदासांनी प्रवेश करत म्हणाले, संप्रदायाच्या या पहिल्या मठीचे मठपती उध्दवस्वामी असतील. अध्ययन कसं करावं याविषयी उध्दवाला सांगतांना रामदास म्हणाले, ” ल्याहावे शुध्द वाचावे। जाणावे तदनंतरे। जाणता कळता बिंबे। बिंबता स्फुर्ती होतसे।।टाकळीच्या मठात रामजन्माचा नऊ दिवसांचा उत्साह धडाक्यात पार पडला

               क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.

श्री समर्थ  रामदास.

भाग – २०.

          संध्याकाळपासुन टाकळी मठात रामदास आपल्या ओजस्वी भाषेत रामकथा सांगु लागले. सात दिवसांत उध्दवाने  सात अभंगरचना लिहुन काढल्यात. आठव्या दिवशी रामदासांनी रामकथा संपवली. तिर्थाटनाला जाण्या चा मनोदय व्यक्त केल्यावर गेली ८-१० वर्षे या स्वामीवर माया जडल्याने सर्वांना च वाईट वाटले. समारोपाच्या निरुपणा त उपनिषदातील एक वचन सांगीतले “धर्मो रक्षती रक्षितः।”

          दुसर्‍या दिवशी रामजन्म किर्तन चोवीस वर्षाच्या रामदासांनी केले. बारा वर्षाची कठोर तपश्चर्या करुन सर्वार्थाने, सर्वांगाने ते समर्थ झालेत. संध्याकाळी उध्ववाने स्वामींच्या चरणा वर डोके ठेवले असतां सद्गुरुं ठीकाणी त्याला कोंदडधारी अयोध्या पती प्रभूरामचंद्राच्या स्वगुणरुपाचे दर्शन झाले. आत्मारामाची खरी ओळख पटली. एकादशीला समर्थ उध्दवांसह पंचवटीत आले. त्यांना निरोप देण्या  साठी सारा गांव लोटला, त्यांनी तीथे शेवटचे किर्तन करुन, म्हणाले, उध्वाला जपावे, व तेराक्षरीमंत्राचा जप करावा, राम राम….।”

        अवधकडे जाण्यासाठी रामदास विंध्याद्री पर्वताच्या निबिड अरण्यातुन नर्मदा नदी ओलांडुन उत्तरेच्या दिशेने झपाट्याने निघाले. अवघा परिसर न्याहाळीत, येणार्‍या संकटावर मात करत ओंकारमाधांताला पोहोचले. उत्तर तीरावर अमलेश्वर, दक्षिण तीरावर ओंकारेश्वर! अमलेश्वराचा भाग विष्णूपुरी, ओंकारेश्वराचा भाग सदाशिव पुरी! समर्थांनी नर्मदास्नान, संध्या, गायत्रीचं पुरश्चरण उरकवुन तीन कोसां ची ओंकारेश्वराच्या प्रदक्षिणेला निघाले.प्रदक्षिणा  झाल्यावर त्यांनी ओंकारेश्वराचे दर्शन घेतले. तेवढ्यात चरणदास नांवाच्या भाविकाने त्यांच्या पुढे मिष्टान्नाची थाळी ठेवली, पण स्वामी परान्न घेत नसल्याने गुळ आणि सातु आणयला सांगीतले.

       चरणदास धर्मग्लानीमुळे मनोमनी तळमळत होता. कांहीतरी करण्यासाठी समर्थाच्या रुपाने त्याला दिशा मिळाली, गुरुची खुण शिष्याला पटली. मार्केडेय त्रृषींच्या आश्रमापलीकडे असलेल्या एकांत गुफेत समर्थांनी तीन दिवस,तीन रात्र चरणदासाला उपदेश दिला. संप्रदायाची दीक्षा दिली. त्याच गुफेत मठस्थापना करुन मठाचा महंत रामदासी झाला.

        दसर्‍याला समर्थ क्षिप्रेकाठी उज्जनला आले. ही राजा भर्तुहरीची ध्यानभूमी, कृष्णाची अध्ययनभूमी, सादीपनी त्रृषींचा आश्रम, अनेक सिध्द पुरुषांनी ज्या वटवृक्षाखाली बसुन तपश्चर्या केली तो ज्ञानदाता  सिध्दवरही इथेच! चरणदासाबरोबर सारं निरखतां निरखतां एका  मंदिरांत एक रघुनाथाभक्त  लोकजीवनांतील अनेक दाखले देत तुलसी रामायणावर निरुपन करीत होता. चरणदासाने समर्थांची महती सांगीतल्यावर रघुनाथनेही समर्थांच शिष्यत्व पत्करलं. समर्थांनी त्यालाही संप्रदायाची दिक्षा दाखवुन, पुरुषार्थ चेतवुन धर्म जागरण करण्याचा गुरुमंत्र, साधना, बलोपसना याची महती,तेरा अक्षरी मंत्रजप दिला. त्याच मंदिरात उज्जैनचा रामदासी मठाचा मठापती झाला.

       चरणदासाला ओंकारेश्वराला पाठवून समर्थांनी इंदुरची वाट धरली. इंदुरला शिवरामनं समर्थांच्या उपदेशा नुसार भिक्षाव्रत अवलंबुन संप्रदाय दीक्षा घेतली. समर्थ उत्तरकडे निघाले. उदंड लोकसंग्रह गांवोगावी भिक्षेच्या निमित्या ने जमा झाले. मठाच्या माळेत एक एक मणी गुंफु लागले. धर्मकारण राजकारणाला जोडलं पण धर्माचं राजकारण मात्र होऊ दिलं नाही. सार्‍या मठांची एक गुप्तहेर संघटना निर्माण करायचे ठरविले. एका शिष्याने दुसरा, दुसर्‍याने तीसरा, ज्योतीने ज्योत पेटवावी आणि ती मशाल हाती घेऊन प्रांतोप्रांती पसरलेला अंधार दूर करावा!

        क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.

                         

श्री समर्थ रामदास संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading