
महारथी कर्णः ही चरित्र लेखमाला मीनाक्षी देशमुख संकलित संपूर्ण चरित्र अर्थात (कादंबरीरुपात) या लेखमालेचे एकूण 18 भाग असून येथे वाचण्यासाठी सोपे व्हावे म्हणून मूळच्या 4 भागाचा १ भाग बनविला आहे. याची नोंद घ्यावी.
Part:-1 Pitamah Bhishmacharya: Complete Biography (Novel Form), Pitamah Bhishma Complete Biography
महारथी कर्णः- संपूर्ण चरित्र
मिनाक्षीताई देशमुख या सेवानिवृत्त. सरकारी अधिकारी असून. त्यांनी सेवानिवृत्तीच्या नंतर. भारतातील. महत्त्वाच्या व्यक्तिरेखांचे. चरित्र लिखाण केले सोशल मीडियावर केलेले असून आतापर्यंत. 95 व्यक्तिरेखांचे. चरित्र त्यांनी रेखाटले आहे. आणि अजूनही त्यांचे हे काम अव्याहतपणे चालू आहे. महाराष्ट्रातील. ज्यांना वाचनाची. आवड आहे. अशा लोकांना, विद्यार्थी, शिक्षक. समीक्षक या सर्वांना. कीर्तनकार, धार्मिक लोकांना या लिखाणाचा अतिशय उपयोगा आहे. त्यांच्या संपूर्ण व्यक्तिरेखांचं. संग्रह आम्ही 96 कुळी मराठा. डॉटकॉम https://96kulimaratha.com/ या वेबसाइटवर करत आहोत. शेकडो पानांचा हा त्यांचा संग्रह आम्ही विस्तृत वर्गीकरण करून. या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यातलीच एक व्यक्तिरेखा म्हणजे. महारथी कर्ण. यांचे चरित्र.
*कर्णः-*
*कर्णः-भागः१६.*
आज युध्दाचा *१८ वा दिवस.* परंतु हाच१८वा दिवस अंतिम आणि निर्णायक असेल हे कुणालाही ठावूक नव्हते.
कर्णाने वृषालीचे दुःखी मनाने सांत्वन केले व स्वतःलाही सावरले. तीला कर्णाने सांगीतले की, उद्या निर्णायक युध्द होईल. *उद्या एक तर कर्ण तरी राहील किंवा अर्जुन*. उद्याचा सूर्यास्त कुणीतरी एकजणच पाहील. दुसरा साक्षात सुर्याच्या तेजात मिसळुन जाईल.
नुसत्या योध्याच्या कौशल्यावर युध्द जिंकलं जात नाही. सारथ्य सुध्दा योग्य असावं लागतं. दुबळ्यांनाही वज्रबल मिळवुन देणारा सारथी तो कृष्ण कुठे? अन् आपल्या निंदेने सुर्यालाही झाकाळु पाहणारा शल्य कुठे?
निर्णायक युध्द! केव्हा आणि कुठे घडणार! शस्रस्पर्धेच्या वेळी अर्जुनाला दिलेल आव्हान! त्या अपमानातुन उद्भवलेली इर्षा….
अर्जुन वधाचं अखंड चिंतन! कवच कुंडल दान केल्यावर कळले की, अर्जुनाला कृष्णाचे सख्य प्राप्त झाले, तेव्हाही प्रतिज्ञापुर्तीत खंड पडेल असं वाटलं नाही. परंतु जन्मरहस्य कळलं आणि वज्रघात झाला. कृष्णाला, भीष्म, विदुरांना माहीत असुन त्यांनी आधी कां सांगीतले नाही? जन्मरहस्य कळले नसते तर अखंड धगधगत राहीलेली सुडाची आग विझली नसती. आता फक्त राहीली पराजयाची जाणीव! दैवाने असा जीवघेणा खेळ माझ्याच सोबत कां खेळावा?
एकाच मातेच्या उदरी जन्मलेले भाऊ उद्या प्राणघातक शस्र हाती घेऊन समोरासमोर उभे राहणार ! शेवट ठरलेलाच आहे.किती संयम पाळावा याला काही मर्यादा आहेतच ना! अशाच विचारांच्या आवर्तनात हरवला कर्ण.अपमानाचा सुड, निर्मळ जीवनाची इच्छा, पराभवाचं दुःख हेच का पाप! कुणी तरी आपलं असावं, कुणाला तरी आपलं मन कळावं. कुणाच्या तरी मायेच्या हातांनी, डोळ्यातल्या अश्रुंनी जगण्याचं बळ लाभावं असं वाटणं स्वार्थ आहे का?
अशाच विमनस्क मनस्थितीमध्ये कर्ण कौरव शिबीरात आला. नियतीनंच रथ सिध्द केला. लाभलेल्या दोन उमद्या जातीवंत शापाचे अश्व जीवनरथाला जोडलेले. दैवचक्राच्या कण्या केव्हाच खेचुन घेण्यात आल्यात. ज्याला परमेश्वरी अंश मानले, त्यानेच एक कणी व एक जन्म दात्या आईने एक कणी खेचुन घेतली. आणि दिल्या वचनाचा दुबळा आसुड हाती आला. कोणत्याही क्षणी दैवचक्र फसेल आणी कलंडलेल्या रथाखाली किती काळ फरफटत जावे लागणार हेच आता शिल्लक राहिले. असा सर्व रथ सिध्द झाला.
शल्याच्या आवाजाने कर्ण भानावर आला. शल्याने कर्णाला डिवचल्यावर कर्ण म्हणाला, अर्जुनाला विजय मिळावा हेच ज्याचं उदिष्टं, असा सारथी कुठे? अन् माझे पराजयाचे स्वप्न पाहणारे शल्य कुठे? परंतु कोणी कितीही तेजोभंग केला तरी सूर्यपुत्राचा तेजोभंग कधीच होत नसतो.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.
*कर्णः-*
*भागः-१७.*
पृथ्वीवर सूर्यबिंब प्रगटले. युध्दाला सुरुवात झाली. घनघोर युध्द सुरु झाले. कर्णाचा पराक्रम पाहुन शल्य प्रभावित झाला. पण शल्यस्तुतीने कर्ण सुखावला नाही. कर्णाने अर्जुनाचा रथ गाठायला सांगीतले. आज अर्जुनाचा वध करुन या संहारयज्ञाची समाप्ती करायची आहे. कर्ण रणसंग्राम न्याहळीत असतां अर्जुन रथ दृष्टीस पडला. कर्णाने शल्याला रथ तिकडे घेण्यास सांगीतले. कर्णाचा रथ जात असतांनाच रथाचे डाव चक्र भूमीत रुतलं. जीवनाचे बंध तोडता येतात पण नियतीचे नाही. ऐन रणांगणावर रथाचे चक्र पृथ्वी ग्रासिल हा दिलेला शाप खरा ठरला. शल्यराजाने त्याला मदत न करता रथाचे घोडे घेऊन निघुन गेला.
धर्मचक्राला काय अर्थ आहे? आयुष्यभर धर्माचे पालन केले, असत्याची कास धरली नाही, दातृत्वात कधीही मागे हटला नाही, सर्वांचा रोष पत्करुन मित्रद्रोह केला नाही, चारित्र्य संपन्न जीवन कंठलं ते याच विदारक क्षणांसाठीच कां?
तेवढ्यात अर्जुनाचा रथ समोर आला. कर्णाने अर्जुनाला म्हटले, मी निःशस्र आहो, रथचक्र जमीनीत फसलयं, थोडा थांब. अर्जुनाला पण निःशस्र कर्णावर शरसंधान करणे योग्य वाटत नव्हते. परंतु कृष्ण त्याला अपमानीत करीतच होता. त्यावेळी कर्णाच्या मनांत अनेक तरंग उठत होते. संपन्न कुलात जन्म घेऊनही दैवगतीने पोरकं जीवन कंठणार्या या कर्णाच्या मुलांनी रणांगणांवर समर्पण केलं ते कुणालाच दिसलं नाही पण अभिमन्यु मात्र अनुकंपेला पात्र ! असं कां? कृष्णाने तरी असे खोटे आरोप करायला नको होतं.
कृष्णाच्या एका विनंतीचा स्वीकार केला असता तर *जेष्ठ पांडव* म्हणुन सर्व अधिकार मिळाले असते. जीवन रक्षण करायचेच असते तर या क्षणीही अर्जुनाला जन्म रहस्य सांगुन करतां आले असते. पण जगण्याचीच इच्छाच राहिली नाही. फक्त वीराला साजेसा मृत्यु यावा ही इच्छा धरली तर काय चुकले.
परंतु कृष्णाच्या वाक् बाणाने कर्णाला घायाळ करुन अर्जुनाला आज्ञा केली,”या पाप्याचा वध करुन विजयी हो!”
*पापी* शब्द ऐकला मात्र आणि सूर्यपुत्र संतापाने पेटुन उठला. कर्णाचे व अर्जुनाचे घनघोर युध्द सुरु झाले. कर्णाचा एक तीक्ष्ण बाण अर्जुनाच्या छातीत घुसला व तो रथात पडला असतां कृष्णाने अर्जुनाच्या कमरेचा शेला काढुन त्याला वारा घालु लागला. तो शेला पाहीला मात्र, जो कर्णाने कुंतीला दिला होता, अन क्षणांत कर्णाच्या हातुन शस्र गळुन पडले. सारेबळ संपले. *ब्रम्हास्राचा विसर पडावा* असाच तो क्षण होता.
कर्णाचा सारा त्वेष नाहीसा झाला. गलीतात्र झाला तो.
क्रमशः
संकलन- मिनाक्षी देशमुख.
*कर्णः-*
*भागः-१८.*
*(अंतिम भाग)*
कर्णाला, “तुझे पांच पुत्र, पांच पांडव जीवंत राहतील” या कुंतिला दिलेल्या वचनाची आठवण झाली. *सहावा पांडव पहिला असुनही पांचवा होऊ शकला नाही.*
कर्ण रथाखाली उतरला आणि रुतलेले रथचक्र काढण्याचा प्रयत्न करीत असतांनाच कृष्णाने अर्जुनाने सांगीतले, “हीच वेळ आहे कर्णाचा वध करण्याची. जर का रथ काढण्यात यशस्वी झाला तर आपल्या दोघांचाही भरवसा देणं कठीण होईल.”
अर्जुनाने एका तीक्ष्ण बाणाने कर्णाच्या छातीचा वेध घेतला. भयंकर वेदनेचा आगडोंब उसळला कर्णाच्या मानेतुन. दुर्योधनाला कळल्याबरोबर तो कर्णाकडे धावला. त्याचा आक्रोश पाहवला जात नव्हता. कर्णाने हळूच डोळे उघडले. तो मोठ्या मुश्कीलीने बोलला. “गेल्या सतरा दिवसांत मोठेमोठे रथी- महारथी या युध्दात कामी आलेत. आता तू *शल्यराजा ऐवजी अश्वत्थामाला सेनापती करावं*. ” व पुनः त्याला ग्लानी आली.
तेवढ्यात एका वृध्द व निर्धन ब्राम्हणाचा आक्रोश कर्णाच्या कानावर आला. त्याच्या युध्दात कामी आलेल्या पुत्राचा अंत्यविधी करण्यास धन नसल्यामुळे तो सर्वांपुढे हात पसरत होता. कर्णाजवळ गर्दी पाहून तो ब्राम्हण तिथे आला. आणि आर्तपणे म्हणाला, “कोणी दानवीर दाता आहे कां या पृथ्वीवर ?”
त्याचे कातर बोल कर्णाच्या कानात शिरताच ” *दानवीर* ” या शब्दाशी निगडीत असलेला त्याचा दिव्यात्मा जागृत झाला. कर्णाने त्या वृध्दास जवळ बोलावण्यास चित्रसेनला सांगितले. वृध्दाने कर्णाजवळ आपली व्यथा कथन केली. कर्णाने चित्रसेनला पाषाण आणायची सेनापती या नात्याने आज्ञा केली. आपल्या तोंडातील सोनेरी दात पाडायला सांगितले. चित्रसेन उभ्या जागी थरथरला. कारण त्याचे त्याच्या पित्यावर नितान्त प्रेम होते. परंतु सेनापतीची आज्ञा तो मोडु शकत नव्हता.त्याने दोन घाव घालुन कर्णाचे दात पाडले. पित्याला अश्रू दिसू नये म्हणुन तिथुन निघुन गेला, *शक्तीपात झाल्यासारखा*.
कर्णाचे दात त्याचेच तोंडात पडले. मोठ्या कष्टाने ते हाती घेतले पण, ‘स्वतःच्याच रक्ताने माखलेले *अपवित्र सोनेरी दात* दान कसं करणार?’ हातातील दात कसे स्वच्छ करावे या विचाराने असह्य झालेल्या त्याच्या निलवर्णी डोळ्यातुन अश्रूंची संतत धार पाझरु लागली. आणि टेकडीकडे कलत असलेल्या आपल्या पित्याकडे (सूर्यबिंबाकडे) क्षणभर मोठ्या आशेने बघितले. जीवनभर जे जे अतर्क्य होतं ते ते असाच तो सूर्य नारायणाकडे बघून मुक संमती मिळवून करीत आला होता. शेवटी स्वतःच्याच डोळ्यातून अविरत पाझरणार्या अश्रूंनी दात धुतले. मनगटातील अर्धवट तुटलेल्या निशिगंधाच्या माळेतील एक फुल उपटुन दातावर ठेवले. आणि सर्व विधिनिशी पवित्र झालेल दान त्या वृध्दाला केले. “कदाचित वृध्दाच्या रुपात *सूर्यदेव तर नसेल ना?*” हा विचार कर्णाच्या मनात तरळून गेला, त्याने त्या परीस्थितीतही त्या वृद्धाला नमन करण्याचा प्रयत्न केला.
जगात अनेकांनी दान केले असेल पण… *मरणाच्या दारातील इतकं चित्तथरारक, उतुंग, एकनिष्ठ, अजोड दान कर्णच करु जाणे.*
दुर्योधनाला उद्देशुन त्याने म्हटले की, “माझ्या मृत्युबरोबरच हे विनाशी युध्द थांबव”, पण ते दुर्योधनाला पटले नाही. कृष्णाला वाटले तो कर्णाला त्याची *अंतिम इच्छा* विचारेल पण त्याने न विचारल्यामुळे कृष्णानेच त्याच्या तुटलेल्या कानाच्या पाळीजवळ मुख नेले व अंतिम इच्छा विचारली.
तेव्हा कर्णाने सांगितले की, “तू …. होय, *मधुसुधना,….तूच माझा अंत्यसंस्कार करावास.* आणि तो सुद्धा एका…. एका *कुमारी भूमीवर करावा*. ज्या भूमीवर कधीच तृणांकुर उगवले नसतील, उगवणार नाहीत. माझी दुःख पुनः या मर्त्य भूमीवर कधीच कोणत्याच रुपात उगवू नयेत.”
किती महान विचार…..!!!!!*
शेवटी गायत्री मंत्राचा जप पुटपुटत त्याची हालचाल थांबली.
*पहिला पांडव ! जेष्ठ कौंतेय, सुपुत्र !! अजोड दानवीर. अशा या *मृत्युंजय महावीराचं महानिर्वाण झालं* !!!
!!! समाप्त!!!
संकलन- मिनाक्षी देशमुख.
***** *समाप्त* ****


