
महारथी कर्णः ही चरित्र लेखमाला मीनाक्षी देशमुख संकलित संपूर्ण चरित्र अर्थात (कादंबरीरुपात) या लेखमालेचे एकूण 18 भाग असून येथे वाचण्यासाठी सोपे व्हावे म्हणून मूळच्या 4 भागाचा १ भाग बनविला आहे. याची नोंद घ्यावी.
Part:-1 Pitamah Bhishmacharya: Complete Biography (Novel Form), Pitamah Bhishma Complete Biography
महारथी कर्णः- संपूर्ण चरित्र
मिनाक्षीताई देशमुख या सेवानिवृत्त. सरकारी अधिकारी असून. त्यांनी सेवानिवृत्तीच्या नंतर. भारतातील. महत्त्वाच्या व्यक्तिरेखांचे. चरित्र लिखाण केले सोशल मीडियावर केलेले असून आतापर्यंत. 95 व्यक्तिरेखांचे. चरित्र त्यांनी रेखाटले आहे. आणि अजूनही त्यांचे हे काम अव्याहतपणे चालू आहे. महाराष्ट्रातील. ज्यांना वाचनाची. आवड आहे. अशा लोकांना, विद्यार्थी, शिक्षक. समीक्षक या सर्वांना. कीर्तनकार, धार्मिक लोकांना या लिखाणाचा अतिशय उपयोगा आहे. त्यांच्या संपूर्ण व्यक्तिरेखांचं. संग्रह आम्ही 96 कुळी मराठा. डॉटकॉम https://96kulimaratha.com/ या वेबसाइटवर करत आहोत. शेकडो पानांचा हा त्यांचा संग्रह आम्ही विस्तृत वर्गीकरण करून. या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यातलीच एक व्यक्तिरेखा म्हणजे. महारथी कर्ण. यांचे चरित्र.
*कर्णः-*
*भागः-१३*
निष्ठा ही स्नेहाने एकदाच बांधली जाते. या निष्ठेमुळेच पांडवांना कृष्ण साथ देतो. या युध्दामुळे किर्ती किंवा अपकिर्ती हे फक्त कृष्ण व कर्ण या दोघाच्या माथी येईल. कर्ण दुर्योधनासह द्रोणाचार्यांना भेटायला त्यांच्या शिबीरात गेले असतां त्यांनी प्रतीज्ञा घेऊन सांगीतले की, आज युधिष्ठीराला जिवंत पकडुन देण्यासाठी वचनबध्द आहो. त्यासाठी *चक्रव्युहाची* रचना केली. हा चक्रव्युह *अर्जुनाशिवाय* कोणीच भेदु शकत नाही. व्युहाच्या मध्यभागी कर्णाने राहावे.
द्रोणाचार्यांनी रचलेला व्युह खरोखरच अलौकीक होता. तुंबळ युध्द सुरु झाले पण व्युहभेद होत नव्हता. एवढ्यात *अर्जुनपुत्र अभिमन्युने* व्युहात प्रवेश केला. त्या कोवळ्या मुलाने पराक्रमाची शर्थ केली. पण एवढ्या रथी महारथींसमोर तो हतबल झाला. तरीही तो शर्थीने लढत होता. पण एका बेसावध क्षणी *दौःशासनाने* अभिमन्युच्या डोक्यावर गदेचा प्रहार केला. आणि अभिमन्यु धारातिर्थी पडला. कर्णाला ते पहायचे बळ नव्हते. सुरुवातीला ज्या कौतुकाने त्याचे युध्द कौशल्य पाहत होता तो कर्ण अभिमन्यूला लाथ मारण्याइतका नीच खचितच नव्हता. त्याच्या बद्दल निव्वळ *अफवा* पसरवल्या गेल्यात.
पुत्रशोकाने अर्जुन बेभान झाला. आणि *प्रतिज्ञा* केली की, ” *उद्या सुर्यास्तापर्यत जयद्रथाचा वध करीन किंवा स्वतः अग्निकाष्ट भक्षण करीन”* . ही प्रतिज्ञा ऐकुन संतापलेल्या दुर्योधनाने रात्रंदिवस युध्द सुरु ठेवण्याची आज्ञा दिली. कर्ण आवेगाने शत्रुंशी लढत असता, पांडववीर *घटोत्कचाने* रणांगणात धुमाकुळ माजवला.दुर्योधनाने पाहीले की, हे संकट कर्णाशिवाय दुसर कोणीच निवारण करु शकत नाही. तेव्हा त्याने कर्णाला *वासवी शक्तीने* जी इंद्राकडुन प्राप्त झाली होती त्या द्वारे घटोत्कचाचा वध करण्यास भाग पाडलें.
झालं! शेवटची *अमोध शक्ती* जी फक्त एकवेळाच वापरता येते तीच्या द्वारे घटोत्कचाचा वध झाला. *कर्ण पुर्णतः रिकामा झाला.*
पंधराव्या दिवशी द्रोणाचार्यांनी पराक्रमाची शर्थ करुन विराट आणी द्रुपदचा वध केला. त्यामुळे द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न पेटुन उठला. त्याने घणघोर युध्द केले पण द्रोणाचार्य त्याच्या आटोक्याबाहेर होते. नंतर अश्वथामा मारल्या गेल्याची अफवा (बातमी) ऐकल्यामुळे त्यांनी शस्रत्याग केला. जेव्हा की अश्वथामा चिरंजीवी आहे हे माहीत असुनही ते भ्रमीत झालेत. हीच संधी साधुन धृष्टद्युम्न ने निशस्र द्रोणाचार्यांचा वध केला.
हा अधर्म नव्हता का? भीष्म, द्रोणाचार्य यासासखी लोक फक्त किर्तीरुप मरण शोधीत असतात. जयासाठीही युध्द खेळत असतांना सुध्दा अहंकार शमत नाही तर त्याची धार अधिक तीव्र होते.
द्रोणाचार्याच्या वधाचे अतिशय दुःखपदरी घेऊन कर्ण विषण्ण मनाने शिबीरात परतला. त्याच्या मनात अंधकार दाटला.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.
*कर्णः-*
*भागः-१४.*
युध्दाचा *सोळावा दिवस*. दूर्योधनाने व अश्वत्थामा या दोघांनी *कर्णाला कुरु सेनेचा सेनापती बनवला.* जीवनातल्या नव्या रुपाला सिध्द व्हायचे होते. नवं रुप? कसलं?
सूतपुत्र राधेयाचा अंगराज कर्ण, कर्णाचा कौंतेय, आणि तोच कौंतेय उद्या कुरुचा सेनापती. एका जीवाची कोण ही स्थित्यंतरं? कोणतं आधिपत्य सांभाळणार? स्वतःला सुरक्षित ठेवुन जे जगुं इच्छितात, त्यांना मृत्युच्या दरीत लोटुन द्यायचं ? ते साधलं तर विजय सेनापतीचा. नाहीतर तो दोष सेनेचा. उद्या *पाचही भाऊ* युध्दासाठी समोर येतील. माहीत झालेल रक्ताचं नातं, त्यांना जीवदान देण्यासाठी वचनबध्द झालेलं त्यावेळी कर्णाच्या निष्ठेचे रुप कोणते असेल? *अर्जुन* समोर येईल पण शुक्ल काष्ठालाही स्वतःच्या फुंकरीने धुंदावणारा *कृष्ण त्याला वाचणार*.
*कशासाठी हे युध्द?*
*कोणाचा विजय होणार ?*
*जय पराजय!*
*हर्ष, खेद!*
*जीवन मृत्यु!*
अंतर केवढं थोडं! केवढा लहानपल्ला!
जीवन? गर्भातुन येताच अहंकाराचा आक्रोश करणारा याचा जीव, वाढत्या वयाबरोबरच आत्मश्र्लाघा,आत्मरुप, दातृत्व, पुरुषार्थ अशा अनेक काल्पनिक भावनांची पुटं असणार्या या जीवाचा मृत्युने होणारा त्याचा शेवट!
याची जाणीव झाली असती तर ही वळवळ कधीच थांबली असती. अशाच विचारांची आवर्तने कर्णाच्या मनात सुरु होती. अशातच दिवस उजाडला.
दुर्योधनाने आज कर्णाचा आज सेनापतीसाठी यथासांग अभिषेक केला. त्यांतर कर्णाचा रथ सैन्याच्या अग्रभागी आला. दोन्ही बाजुंनी शंखनाद झाला. व तुंबळयुध्दाला सुरुवात झाली.
मध्यान्हं टळत आली तरी युध्दाचा निर्णय लागत नव्हता. येवढ्यात *नकुलचा* रथ समोर आला.त्याच्या बरोबर घनघोर युध्द झाले. कर्णाने शेवटी त्याला जीवदान दिले.कारण तो *मातेला वचनबध्द* होता.
युध्दात अपरिमित हानी पाहुन दुर्योधन कर्णाला म्हणाला, “कर्णा असं काही तरी कर करायला हव जेणे करुन विजय आपला होईल.”
कर्ण म्हणाला, “शरीरबल, मानसबल आणि अस्रकौशल्य या गुणांत अर्जुन माझ्या तुल्यबळ नाही. अर्जुनाच्या गांडीव धनुष्यापेक्षाही श्रेष्ठ असं परशुरामांनी आशिर्वाद दिलेलं धनुष्य माझेजवळ आहे. पण *कृष्णासारखा सर्वश्रेष्ठ सारथी* माझ्याकडे नाही.
” *मद्रराज शल्य* तुझा सारथी होईल.” दुर्योधन उत्तरला.
कर्णाची व शल्याची भेट झालेवर शल्याने सुध्दा कर्णाचा तेजोभंग व मानहानी करण्याची एकही संधी सोडली नाही. कारण शल्याने अटच घातली होती की, *माझे प्रिय बोलणे सतत एकावे लागेल.* कर्णाने सर्व अपमान गिळून त्याचे दुषणं भुषणावह मान्य करण्याचे कबुल केले. *किती मानसीक विटंबना?*
क्रमशः
संकलन- मिनाक्षी देशमुख.
कर्णः-*
*भागः-१५.*
कर्णाचा सारथी म्हणुन शल्यराजाची नियुक्ती झाली. दोघेही रथारुढ झालेवर शल्याकडुन कर्णाचे खच्चीकरण करणे सुरु झाले.
शल्याने *कावळा आणि हंसाची कथा* सांगुन कर्णाचे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न केला. युधीष्ठीराचा रथ कर्णाच्या रथा समोर आला. दोघांमधे तुंबळ युध्द झालं. शेवटी कर्णाने युधीष्ठीराला जीवदान देऊन सोडले. शल्याने कारण विचारले असता. कर्णाने उत्तर दिले,”मी कावळा नाही राजहंस आहे.”
नंतर भीमाचा रथ समोर आला. भीमाचे दर्शन म्हणजे साक्षात पुरुषार्थाचे दर्शन वाटले कर्णाला. दोघांचे घणघोर युध्द सुरु असतांना चक्रधर येत असलेला दिसल्यामुळे शल्याला रथ वळवायला सांगीतला. चक्रधरने सांगीतले की, भीमाने दुःशासानाचा भीषण वध केला. आणि वस्रहरणाच्या वेळी केलेली प्रतिज्ञा पुर्ण केली. कर्णाला चक्रधराच्या पाठीत उभी कुर्हाड रुतलेली दिसली. कर्णाने विचारल्यावर त्याने सांगीतले की, हा वार मागुन केला. हे रणांगण खरं नाही. इथे धर्माला, नितीला अवसर नाही. धर्माची वल्गना फक्त चालते. कृती मात्र अधर्माचीच. भीष्म, द्रोण तेही तसेच. “कर्णा… तुला यश नाही, सावध रहा.”
चक्रधराच्या मृत्युमुळे कर्ण विमनस्क मनःस्थितीत शिबीरात परतला. तोच त्याला दुर्योधन भेटायला आला. त्याने कर्णाला विचारले की, नकुल, भीम, युधिष्ठीर यांना जिवंत कां सोडले? दुर्योधन त्याला म्हणाला तुझ्या हातुन विजय मिळेल असे वाटत नाही. काय वाटले असेल कर्णाला? ज्याचेसाठी सर्वांचा रोष पत्करुन अधर्माचा मार्ग पत्करला त्याने असे म्हणावे?
कर्ण दुर्योधनाला म्हणाला, “तुम्हाला जर माझे निष्ठेवर भरोसा नसेल तर सेनापती पद दुसर्याला द्यावे. पितामहांसारखा क्षत्रिय थोडाच आहे की, अपमान वाटेल? शेवटी सूतपुत्रच ना!”
दुर्योधनाने त्याची समजुत काढली.
थोड्या वेळातच कर्ण रणभुमीवर प्रविष्टला. तिथे त्याला कळले की, कर्णपुत्र वृषसेन बरोबर अर्जुनाचे युध्द सुरु आहे. कर्णाचा रथ तिथे पोहचला असता त्याला वृषसेन रथाखाली पडलेला दिसला, कर्ण काही करायच्या आतच त्याचे समोर अर्जुधनाने निशस्र वृषसेनवर बाण सोडुन त्याचा कंठभेद केला. आणि सुड घेतल्याचा आनंद कर्णाजवळ व्यक्त केला.
वृषसेनचे शिरस्राण घेऊन कर्ण शिबीरात परतला. काही माणसं परनिंदेसाठी, फक्त दुःख सोसण्यासाठीच जन्माला आलेली असतात. कर्णाच्या हाती तेव्हढच आहे. तेव्हढच…..!
कर्ण आपल्या दुःखाला आवर घालण्याचा प्रयत्न करीत होता. मुलगा हा वारस असतो. आपल्या नंतर त्याच्या रुपाने बापाच जीवन अखंड चालु असते. परंतु वृषसेनच्या मृत्युने कर्णाचा जीवनप्रवाह खंडीत झाला. ही वेदना भयानक होती. अशाच दुःखी अंतःकरणाने तो वृषाली (पत्नी ) कडे निघाला. परंतु उद्याचं युध्द निर्णायक होऊन ते संपविण्याच्या दृढ भावनेनेच.
क्रमशः
संकलन- मिनाक्षी देशमुख.
*कर्णः-*


