भाग २ :- महारथी “कर्ण” संपूर्ण चरित्र (कादंबरीरुपात)

 कर्णाचे सौज्यन्यशीलता बघा केवढा आहे, ज्या द्रौपदीने त्याचा एवढा अपमान केला, तीचे पांच पांडवाशी लग्न झाले हे समजल्यावर त्याला अतिशय दुःख झाले, "याज्ञसेनेचे असे व्हायला नको होते" असे वाटले.
 कर्णासारख्या दातृत्वशील राजाच्या अधिपत्याखाली चंपानगरीतील नागरीक तृप्त होते. पण कर्णाच्या नशीबी शांती,सुख कुठचं असणार?

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

महारथी कर्णः ही चरित्र लेखमाला मीनाक्षी देशमुख संकलित संपूर्ण चरित्र अर्थात (कादंबरीरुपात) या लेखमालेचे एकूण 18 भाग असून येथे वाचण्यासाठी सोपे व्हावे म्हणून मूळच्या 4 भागाचा १ भाग बनविला आहे. याची नोंद घ्यावी.
Part:-1 Pitamah Bhishmacharya: Complete Biography (Novel Form), Pitamah Bhishma Complete Biography

महारथी कर्णः- संपूर्ण चरित्र

*भागः-५*

 कर्णाचे सौज्यन्यशीलता बघा केवढा आहे, ज्या द्रौपदीने त्याचा एवढा अपमान केला, तीचे पांच पांडवाशी लग्न झाले हे समजल्यावर त्याला अतिशय दुःख झाले, “याज्ञसेनेचे असे व्हायला नको होते” असे वाटले.

 कर्णासारख्या दातृत्वशील राजाच्या अधिपत्याखाली चंपानगरीतील नागरीक तृप्त होते. पण कर्णाच्या नशीबी शांती,सुख कुठचं असणार?

 पांडव अंगराज्यावर चालुन येत असल्याची वार्ता आली. रणांगणावर पाहतो तो काय? भीमाच्या नेतृत्वाखाली चतुरंग अफाट सैन्य समोर.

 दोघेही वीर एकमेकांना भिडले, कोणीच कमी नव्हते, सूर्यास्त झाल्यामुळे त्या दिवसाचे युध्द थांबले.

 थोड्या वेळाने दूत बनुृन अश्वत्थामा आला व त्याला निरोप दिला की, कौरवांशी एकनिष्ठ असलेल्या राजांनी पांडवांना विरोध करु नये. राजसूय यज्ञाच्या दिग्विजयासाठी पांडवांना करभार द्यावा, सख्य राखावे.

 इथेही त्याला मानहानीला सामोरे जावे लागले. दुसर्‍या दिवशी भीमाला करभार देऊन पराजय स्विकारावा लागला. ज्या जरासंधाने त्याला चंपानगरी बहाल केली.  तो मिञ जरासंध त्याच्या वधाची वार्ता तेव्हाच सांगण्यात आली. केवढा दुःखाचा पहाड त्याच्यावर पडला.

 नेहप्रमाणे त्याची सूर्यउपासना आटोपल्यावर नेहमीप्रमाणे ” *कोणी याचक आहे का?* ” असे विचारले असता एक कोमल आवाज त्याच्या कानी आला. आणि त्या आवाजाने

“कालच्या युध्दात कामी आलेला माझा पुञ मला परत आणुन द्या.” अशी याचना केली.

कर्ण म्हणाला,”माते, ढळलेली मनःशांती,हरवलेलं स्वप्न आणि गेलेला जीव प्रयत्नसाध्य नसतो.

 पण तीचा हट्ट कायम असल्यामुळे त्याने दोन दिवसाचा अवधी राज्याची व्यवस्था लावण्यासाठी मागीतला. आणि “तुझा पुञ म्हणुन तुझ्या घरी येऊन पुञ कर्तव्य पुर्ण करण्याचे वचन दिले.” याला म्हणतात औदार्य.

 तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसुन त्याचा परम मिञ चक्रधर व अवंतीचा पुत्र, *कौस्तुभ* होता. केवढं असहनीय दुःख!

 त्याला दुःख, अपमान, वंचना, मानहानी, पराभव या सर्वांना सोबत घेऊनच जीवनाचा मार्ग चलायचं आहे.

      क्रमशः

संकलन- मिनाक्षी देशमुख.

*कर्ण*

*भाग -६*

 कर्णाने जर अधर्माची कास धरली नसती तर त्याला देवत्व नक्कीच बहाल झाले असते. दुर्योधनाने संधीचा फायदा घेऊन स्वार्थांध होऊन कपटीपणाने मिञत्वाचे आवरण घालुन कर्णाची मैञी संपादन केली. म्हणतात ना! *”ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला”*  नेमकं *हेच* कर्णाच्या बाबतीत झाले. असं नसतं तर पांडव लाक्षागृहात जळुन मेल्याचा त्याला आनंद झाला असता, पण त्याला दुःखच झाले. कर्णाच्या मते *पराक्रमाने शञु जिंकावा घाताने नव्हे.*

 इच्छा नसतांनाही कौरवसभेच्या आदेशानुसार त्याला *राजसूय यज्ञाला* जावं लागलं. यज्ञाच्या शेवटच्या दिवशी सर्व नृपांच्या पंगतीत द्रौपदी पंगतीमध्ये वाढत असतांना पदर तीचा ढळला. कर्णाच्या पानात काही वाढल्या न गेल्यामुळे त्याने सहज वर बघितले तर तीने *अनर्थ लावुन* म्हणाली *”याचकाने दात्याकडे पाहु नये”.* अपमानित करण्याची संधी दवडली नाही.

शकुनी जेव्हा मयसभेचे वर्णन  करतो, तेव्हा तो (कर्ण ) म्हणतो, “मामा मयसभा कशाला हवी? जीवन ही सुध्दा मयसभाच आहे. स्नेहाचा ओलावा शोधावा तर कटुता मिळते,ज्याच्यावर मिञ म्हणुन विश्वास ठेवावा तोच विश्वासघातकी ठरतो, वरामिळण्यासाठी तपश्चर्या करावी तर शाप मिळतो. *हे जीवन म्हणजेच मयसभा.* “

 राजसूय यज्ञ झाला. इंद्रप्रस्थ नगरीचे वैभव पाहुन दुर्योधनाचाही जळफळाट झाला. त्याने व शकुनीने जेव्हा द्युताव्दारे पांडवांना हरविण्याचा बेत आखला तेव्हा कर्ण उद्गीन्न झाला. त्याने बराच विरोध केला पण कोण ऐकणार त्याचे? तो द्युत खेळण्याचा सल्ला कधीच देणार नाही हे विदूराला सुध्दा विश्वास होता.

 द्युतात पांडव द्रौपदीसह हरलेत,व तीला राजसभेत रजस्वला स्थितीत युधिष्ठीराने आणायला सांगीतले तेव्हा कर्णाला त्याची घृणा आली. त्याला अपेक्षा होती की, इतरांप्रमाणे या संकटप्रसंगी तरी त्याच्याकडे तरी दयेची याचना करेल पण त्याचेकडे ढुंकुनही न पाहता पुढे निघुन गेली. त्याचा संताप उफाळुन आला व अपशब्द तोंडातुन बाहेर पडणे सहाजिक नव्हते का?

 द्रौपदीच्या पदराला जेव्हा हात घातला तेव्हा माञ त्याच्या अंगाला कंप सुटला, नकळत त्याचे डोळे मिटल्या गेले. कृष्णाने येऊन द्रौपदीचे लज्जारक्षण केले तेव्हा सर्व सभा स्तब्ध झाली.

धृतराष्टाच्या दोन वराने  द्रौपदीसह पांडव मुक्त झाले. तीला *तीसरा वर* मागायला सांगीतल्यावर तीने *स्पष्ट नकार दिला.*


अश्या दयनीय स्थितीतही तीचा आवेश,निष्ठा पाहुन कर्णाला राहवले नाही, तो म्हणाला *”द्रौपदी तु धन्य आहेस तुझ क्षाञतेज  अलौकीक आहे. या विपत्सागरात नौकाहीन बुडत असलेल्या पांडवाना तारणारी तू नौका आहेस. धन्य खरोखरीच धन्य.*”

 वरील उद् गार  काढणारा कर्णच होता. तो वृशालीला (त्याच्या पत्निला) वृतांत  सांगतांना  म्हणतो की जर वस्ञहरण झाले असते तर तुला वैधव्य आले असते.
  क्रमशः

संकलन- मिनाक्षी देशमुख.

*कर्ण*

*भागः-७*

 दुसर्‍यांदा द्युतामधे हरल्यावर द्रौपदीसह पांडव *१२वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास* भोगायला निघालेत ही गोष्ट कर्णाला माहीत सुध्दा नव्हती. त्याच्या अपरोक्ष शकुनि व दर्योधनाने पुन्हा द्युत खेळून युधीष्ठीराला हरवले. कर्ण *विरोध करेल म्हणुन त्याला अंधारात ठेवले.*

कर्णाने दर्योधनाची कानउघाडणी केली तेव्हा दुर्योधनाने पुन्हा फाशांना हात लावणार नाही अशी प्रतिज्ञा केली. कर्णाला दवडुन चालणार नव्हते ना….

 पुढे काही दिवसांनंतर मनस्वास्थासाठी  मृगया खेळायला जीथे पांडवांचे वास्तव्य होते त्या द्वैतवनात गेलेत. तिथे गंधर्वाकडुन पराभव पत्करुन परतले. पांडवांनी सर्वांची सुटका केली.

त्यावरुन राजसभेत कर्णाचा अपमान झाला. त्यावर त्याने सांगीतले  की, *”मी एकटा दिग्विजय करुन करुन कौरवांचे भाडार समृध्द करीन”* व त्याप्रमाणे सर्व देश जिंकुन हस्तीनापुरात परतला. राजसभेने त्याचा यथोत्चित सत्कार केला. त्यानंतर *राजसूय यज्ञाशी स्पर्धा करणारा वैष्णवयज्ञ करण्याचे ठरविले.*

सर्व राजांबरोबर पांडवांनाही आमंञीत केले. पण १३वर्ष पुर्ण झाल्याशिवाय येता येणार नाही असा निरोप पाठवला.

भीमाने रणयज्ञात सर्व कौरवांची  आहुती देण्याचा संदेश पाठवला.

कौरवराज्य सुरक्षित राहण्यासाठी कर्ण प्रतिज्ञा करतो की, जोवर मी अर्जुनाचा वध करणार नाही तोवर

 *पादक्षालण करुन घेणार नाही.*

*मद्य, मांस वर्ज्य*



*कोणाही याचकाला इष्ट वस्तु देण्याचे व्रत अखंड चालवीन*

 कर्ण अंगदेशी परतला. एका राञी सूर्याने त्याला दर्शन दिले व सांगीतले की, *इंद्र  याचक म्हणुन तुझ्याकडे कवच कुंडल मागायला येतील.* कवच कुंडल दान केलेस तर फक्त किर्ती उरेल जीवन राहणार नाहीस.

 *केवढे हे औदार्य!*

 याचकाला दान देणच माझे हाती आहे. समजावुनही कर्ण ऐकत नाही असे पाहुन सुर्यदेव त्याला म्हणाले कवच कुंडल तु देशीलच पण *इंद्राकडुन अमोघ शक्ती मागुन घे.* ही माझी आज्ञा समज.

 दुसरे दिवशी सुर्योपासना झाल्यावर याचक म्हणुन प्रत्यक्ष इंद्रदेवाने त्याची कवच कुंडल मागीतली. व *क्षणाचाही विलंब न करता त्याने दिलीत.*

असे औदार्य फक्त *कर्णच* करु जाणे.

इंद्राने प्रसन्न होऊन त्याला *वासवीशक्ती* प्रदान केली जी फक्त *एकदाच* वापरता येत होती.

इंद्राने सुध्दा त्याच्या *दातृत्वाची,औदार्याची* प्रशंसा केली.

 कर्णाने  कोणत्याही याचकाला विन्मुख पाठवले नाही. देवांना सुध्दा आपल्या अधिकाराचा, शक्तिचा अहंकार असतोच. जी देवाजवळ नाही ती शक्ती मानवाजवळ असेल तर कसं सहन होणार ?

 *शूराने आपल्या बाहुबलावर  पराक्रम सिध्द करावा.* दैवी कवच कुंडल गेल्याची त्याला खंत काय वाटणार?

         क्रमशः

संकलन- मिनाक्षी देशमुख.

*कर्ण*

*भाग -८*

 कर्णाने *कवच कुंडल दान केल्याचे* पाहुन दुर्यौधन हतबध्द, हतोत्साहीत झाला. त्यामुळेच त्याने कर्णाला *ब्रम्हास्ञ* मिळविण्यासाठी प्रेरीत केले.

 विराट घरी किचकाचा निर्घुण वध झाल्याचे कळल्यावर हे काम निश्चितच *भीमाचे* असावे असा कयास कर्णाने दुर्यौधनाला बोलुन दाखवला.

 वेळ न दवडता

विराट नगरीवर  स्वारी केली. तिथे पांडव प्रगट झालेले पाहुन कर्णाच्या सल्याने ते माघारी फिरले.

 पांडवांनी मागीतलेला *अर्धी वाटणी* दुयौधन व  कर्णाने फेटाळुन लावली.

कृष्ण *शिष्टाई* करण्यास आला. *कृष्णशिष्टाई* पटली नाही तर कृष्णाला पकडण्याचा बेत दुर्यौधनाने आखला. कर्णाला हे माञ पटलं नाही.

*पुढील विनाश टळावा* या दृष्टीने पांडवांचा अधिकार द्यावा असे कृष्णाने म्हटल्यावर दुर्यौधन म्हणाला,” ते कौंतेय असतील, पांडव नाहीत ते एका बापाचेही नाहीत, ते वारस कसे ठरु शकतील? त्यांच्या अधिकाराचा प्रश्नच उद् भवत नाही.”

कमीत कमी *पाच गावं दायाद* (वारसा) म्हणुन दे.

तर, *सुईच्या अग्रावर मावेल एवढी मातीही देणार नाही* असे दुर्योधनाने सांगीतले.

कृष्णाला पकडण्याचा बेत केला पण निष्फळ ठरला. कर्ण त्याला शांत करायला गेला तर तो म्हणाला, राधेया,ज्याला नितीचे बंधन पाळता येत नाही त्यांनी दुसर्‍याला शिकवु नये. आता *युध्द अटळ* आहेचा निरोप पाठवला.

 कृष्ण निघाला तेव्हा कर्णाला आपल्या रथात घेतले. कर्णा युध्द तर आता निश्चित झाले. त्यापुर्वी तुझ्याशी बोलायचे आहे. तू कोण? कर्ण म्हणाला जन्मतःच मातेने जरी मला टाकलं असल तरी कवच कुंडल माझ्या कुळाची साक्ष आहे. माधवा, ज्या शंकेने माझ जीवन व्यापलं, त्याचे उत्तर तूच सांगु शकतोस. सांग कृष्णा! *कोण मी?* कोणत्या अपराधास्तव मातेन माझा त्याग केला?

 तेव्हा कृष्ण त्याला सांगतो की, “तू कुंतीला कौमार्यावस्थेत  मिळालेलं *सूर्याच वरदान* आहेस. हे ऐकुन कर्ण गलिताञ झाला.

 तू *राधेय* नाहीस…..

 *सूतपुञ* नव्हे….


*वसुषेन* नव्हे…..

तर *कर्ण*….

*कौंतेय*…

*पांडुपुञ*….म्हणुन कर्णा तु पांडव पक्षाकडे जा. जो *धर्माचा व न्यायाचा पक्ष आहे.* कर्णा तु निव्वळ योध्दाच नाही तर वेदविद्येतही पारंगत आहेस. सनातन व सुक्ष्म धर्मशास्ञावर तुझी निष्ठा आहे.

त्यावर कर्ण उत्तरला,

 “नाही कृष्णा! ज्याच जीवन सुतकुळानं डागाळलं, ज्याचा पराक्रम, पुरुषार्थ याच कारणान सदैव बंदिस्त राहिलं किर्तीसाठी दातृत्वाचा आधार शोधला तयश्चर्येद्वारा ब्रम्हास्ञाची इच्छा केली तो आता काय स्वार्थ साधणार?”

           क्रमशः

संकलन-मिनाक्षी देशमुख.

सूर्यवंशी शूरवीर चरित्र

महारथी कर्णः- चरित्र सर्व भाग


✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading