नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२४६७
म्हणवितों दास न करितां सेवा । लंडपणें देवा पोट भरीं ॥१॥
खोटें कोठें सरे तुझे पायांपाशीं । अंतर जाणसी पांडुरंगा॥ध्रु.॥
आचरण खोटें आपणासी ठावें । लटिकें बोलावें दुसरें तें ॥२॥
तुका म्हणे ऐसा आहें अपराधी । असो कृपानिधी तुम्हां ठावा ॥३॥
अर्थ
देवा मी स्वतःला तुझा दास म्हणून घेतो परंतु तुझी सेवा काहीच करत नाही आणि तुझ्या नावावर मी माझे पोट भरवतो.हे पांडुरंगा तुझ्या पायापाशी खोटे कसे चालेल तु तर सर्वांचे अंतकरण जाणतोस. माझे आचरण खोटे आहे हे मला माहीतच आहे परंतु तरीही मी दुसऱ्यांना सांगतो की माझे आचरण शुद्ध आहे हे दुसरे खोटे मी बोलतो. तुकाराम महाराज म्हणतात हे कृपानिधी मी तर अपराधी आहे हे तुम्हाला माहीतच आहे.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
