नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२७५९
इच्छेपाशीं आलों फिरोनि मागुता । स्वामी सेवकता आवडीचे ॥१॥
द्यावें लवकरी मागितलें दान । मुळींचें जतन करूनि असें ॥ध्रु.॥
उपाय हे करीं एकाचि वचना । दावूनियां खुणा ठाया येतों ॥२॥
तुका म्हणे गांठी किती तुजपाशीं । जगाच्या तोडिसी चिंतनानें ॥३॥
अर्थ
देवा मला कसलीही इच्छा राहिली नाही असे मी म्हणलो परंतू मला स्वामी आणि सेवक ही आवड आहे व मी परत फिरुन त्याच्याजवळच आलो आहे. त्यामुळे हे देवा मी जे तुम्हाला स्वामी सेवकाचे दान मागितले आहे ते मला लवकर दया मूळीचे जे अव्दैत आहे ते तर मी जतनच करुन ठेवले आहे. भक्त जे मागेल ते मी भक्ताला देत असतो हे तुमचेच वचन आहे आणि तुम्ही दिलेल्या खुणा याचा आधार घेऊनच मी तुमच्याजवळ येत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुम्ही नाम चिंतनाच्या व्दारा जगाच्या सर्व संशयरुपी गाठी तोडून टाकता येतात परंतू तुमच्याजवळच कितीतरी गाठी आहेत.”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
