नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२८३९
उचिताचा काळ । साधावया युक्तिबळ । आपलें सकळ । ते प्रसंगीं पाहिजे ॥१॥
नेम नाहीं लाभ हानि । अवचित घडती दोनी । विचारूनि मनीं । पाहिजे तें प्रयोजावें ॥ध्रु.॥
जाळ जाळा काळें । करपों नेदावें आगळें । जेवितां वेगळें । ज्याचें त्याचें तेथें शोभे ॥२॥
पाळी नांगर पाभारीं । तन निवडूनि सोंकरी । तुका म्हणे घरी । सेज जमा शेवटीं ॥३॥
अर्थ
योग्य वेळ आल्यानंतर आपले हित साध्य करण्यासाठी बुध्दीच्या बळाचा वापर करुन, प्रसंगानुरुप त्या बुध्दीबळाचा वापर केला पाहिजे. लाभ आणि हानी केव्हा घडेल याचा नेम नाही अचानक दोन्हीपैकी एक काहीतरी घडते. त्यामुळे आपला लाभ कशात होईल याविषयी मनाशीच विचार करावा आणि योग्य त्या कार्याचे प्रयोजन म्हणजे त्याची युक्ती करावी. अन्न शिजवताना अग्नी तर लागतोच परंतू काही वेळेस अग्नी लागतो तर काही वेळेस लागत नाही त्यामुळे अन्न शिजवणाऱ्याने अन्न करपले नाही पाहिजे याची खात्री घेतली पाहिजे. त्याप्रमाणे अन्नग्रहण करताना आपण जेवताना आपल्या स्थितीप्रमाणे आपल्या अधिकाराप्रमाणे योग्य ठिकाणी बसून अन्नग्रहण करावे जेवायला जो तो ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे ज्याच्या त्याच्या ठिकाणी बसला तरच ते शोभत असते. तुकाराम महाराज म्हणतात, “शेती करताना प्रथम पाळी नंतर शेत नांगरणी त्यानंतर पेरणी करावी लागते आणि पेरणी केल्यानंतर तण काढून शेतमालाचे रक्षण करावे लागते. आणि मग शेवटी एकदा की शेतमाल आला की त्याचे खळे करुन मग घरी घेऊन यावे.”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA