नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२४६४
देव झाले अवघें जन । गुण दोष हारपले ॥१॥
बरवें झालें बरवें झालें । चित्त धाले महालाभें ॥ध्रु.॥
दर्पणीचें दुसरें भासे । परि तें असे एक तें ॥२॥
तुका म्हणे सिंधुभेटी । उदका तुटी वोहोंळासी ॥३॥
अर्थ
सर्व लोकंच मला आता देव स्वरूप झाले आहेत त्यामुळे आता त्यांच्यातील गुणदोषच हरपले असून मला त्यांच्यात काहीच दोष दिसत नाही. सर्वत्र मला देवच दिसत आहे त्यामुळे मला हा फार मोठा लाभ झाला आहे आणि त्यामुळे माझे चित्त तृप्त झाले आहे हे खूप चांगले झाले खूपच चांगले झाले. दर्पणात आपला चेहरा दिसला आपले मुख दिसते तरी ते वेगळे आहे असे भासते परंतु ते तसे वेगळे नसून एकच असते त्याप्रमाणे जगातील सर्व लोक आपल्याला वेगवेगळे दिसत असले तरी सर्वांमध्ये एकच देव आहे. तुकाराम महाराज म्हणतात ओढ्याची आणि समुद्राची एकदा भेट झाली की मग ओढा समुद्रा पेक्षा वेगळा रहात नाही त्याप्रमाणे सर्वत्र देवच आपण पाहिला तर आपणही देव रूपच व्हायला वेळ लागणार नाही.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
