नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२४५९
घालिती पव्हया । वाटे अनाथाच्या दया ॥१॥
तैसें कां हें नये करूं । पांडुरंगा आम्हां तारूं ॥ध्रु.॥
रोगियासी काढा । देउनि वारितील पीडा ॥२॥
बुडत्यासाठीं उडी । घालितील कां हे जोडी ॥३॥
झाडिताती कांटे । पुढें मागिलांचे वाटे ॥४॥
तुका म्हणे भार । घेती भागल्यांचा फार ॥५॥
अर्थ
काही मनुष्यांना अनाथांची दया वाटते त्यामुळे ते रस्त्या मध्ये पाणपोई घालतात आणि त्यांची तुष्णा भागवतात.तसेच तुम्ही का करत नाही पांडुरंगा तुम्हाला माझी दया येऊन तुम्ही मला या भवसागरातून तारत का नाही? काही दयाळू वैद्य असे आहेत की जे रोगी मनुष्याला औषधे देऊन त्यांचे दुःख नाहीसे करतात.काही दयाळू माणसे असे आहेत की बुडत असलेल्या मनुष्यासाठी स्वतः पाण्यात उडी घेतात आणि त्या मनुष्याचे प्राण वाचवतात त्यांना त्यापासून काय फायदा असतो?काही पुढे चालणारे मनुष्य इतके दयाळू असतात की त्यांना काटे दिसले तर मागच्याला ते काटे टोचू नये याकरता ते झाडतात व काटे बाजूला काढून टाकतात. तुकाराम महाराज महाराज काही दयाळू मनुष्य असे असतात की प्रवास करताना थकलेल्या मनुष्याच्या डोक्यावरचे ओझे आपल्या डोक्यावर घेऊन चालतात व त्यांना मदत करतात त्यांचे दुःख नाहीसे करतात त्याप्रमाणे देवा तु आम्हाला या भवसागरातून तरून जाण्यासाठी मदत का नाही करत ते सांगा.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
