नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. २३३६
नव्हो आता जीवी कपट वसती । मग काकुळती कोणा यावे ॥१॥
सत्याचिये मापे गाठी नये नाड । आदि अंत गोड नारायण ॥धृपद॥
चोखटिया नाही विटाळाचा आघात । साच ते साचांत सांच पडे ॥२॥
विचारिली वाट उसंत सीतळ । बुद्धीपुढे बळ तृणतुल्य ॥३॥
आहाराच्या घासे पचोनिया जिरे । वासना ही उरे उर्वरीत ॥४॥
तुका म्हणे ताळा घालावा वचनी । तू माझी जननी पांडुरंगे ॥५॥
अर्थ
आता माझ्या अंतःकरणात कपट राहू नये आणि जर कपटच राहिले नाही तर काकुळतीला कोणाला जाण्याची गरज आहे? सत्य कार्यामध्ये कधीही अडचण येत नाही आणि सत्य कार्यात नारायण सुरुवातीपासून शेवटपर्यंत गोड , प्रसन्न असतो. जे सत्य कर्म करत असतात त्यांच्यावर केव्हाही कोणत्याही विटाळाचा आघात होत नाही आणि सत्य कर्म केल्याने सत्यच पदरात पडते व सत्य हळूहळू वाढत चालते. कोणत्याही मार्गाने आपण चाललो असोत आपल्याला जिथे जायचे असेल तो मार्ग आपण विचारून घेऊन त्या मार्गाने गेलो तर आपण योग्य मुक्कामाला पोहचु त्यामुळे आपल्याला सुख आणि समाधान प्राप्त होईल आणि बुद्धीच्या पुढे शारीरिक बळ हे गवताप्रमाणे असते. अन्न सेवन करताना आपण घासा घासाने शांततेने जेवण केले तर ते पचुन व्यवस्थित जिरतेही आणि पुन्हा आपल्याला जेवणाची इच्छा उर्वरित राहते. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगे तु माझी जननी आहे त्यामुळे माझ्या बोलण्यास योग्य मर्यादा घाल
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
