नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२८४७
एके ठायीं अन्नपाणी । ग्रासोग्रासीं चिंतनीं ॥१॥
वेळोवेळां जागवितों । दुजें येईल म्हणु भीतों ॥ध्रु.॥
नाहीं हीं गुंतत उपचारीं । मानदंभाचे वेव्हारीं ॥२॥
तुका झालासे शाहाणा । आड लपे नारायणा ॥३॥
अर्थ
मी एका देवाच्याच ठिकाणी माझे चित्त ठेवून अन्नपाणी सेवन करताना ते त्याला समर्पण करतो व घासाघासाला त्याचे चिंतन करतो. त्यामुळे मी वेळोवेळा देवाचे चिंतन करुन चित्ताला नेहमी जागृत ठेवत असतो देवावाचून दुसरे काहीही चित्तात येईल म्हणून मी खूप भीत आहे. मी देह उपचार करण्याबाबत व मानदंभाच्या व्यवहारामध्ये गुंतत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “मी आता शहाणा झालो आहे आणि या सर्व गोष्टीपासून अलिप्त राहण्यासाठी मी नारायणाच्या आड लपत आहे.”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
