ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.983

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके कुट  अभंग ९८३

सेजे सुता भूमी पालखा । निजतां उसांसया । गगन पासोडा मेरू कानवडा । ते सुख वाड पहुडलया ॥१॥ सहज संभोगु जाणावा । विजया होई मग भोगी राणिवा ॥२॥ कमळणी बाळा गुंफिती माळा । घालिती गळां देव कन्या ॥३॥ तिचिये शेजारी सतरावी सुंदरी । चंद्रसूर्य दोन्ही चवरी ढाळिती ॥४॥ येकु त्यागी दुसरा भोगी । तिसरा योगी राजइंद्र ॥५॥ चौथे द्वारीं अतीत तपें । बैसले गुंफे ज्ञानदेवो ॥६॥

अर्थ:-
भूमीरूपी अंतःकरणाची पालखी करून, गगन म्हणजे हृदयाकाशरूपी पासोडी (कापड ) केली. व मेरू म्हणजे अहंकार कानवडा केला म्हणजे उशाला घेऊन निजला असता अतिशय सुखोपभोग होतो. तो सहज स्वरूपानंदाचा भोग समजावा. तरी तूं असा विजयी हो. मग तूं स्वराज्यसिद्धीचे ऐश्वर्य भोगशील. हे बाळा त्याकरितां तूं शुभेच्छादि फुलांची माळा तयार कर. मग तुला देवसंबंधी असलेली ब्रह्मविद्या माळ घालील वा सत्त्वांपत्यादि फुलांची माळ तयार करून तुला घालतील.आणि तिच्या शेजारी म्हणजे संबंधी जी सतरावी जोवनकला हीच एक सुंदरी तुला प्राप्त होईल. चंद्र सूर्य म्हणजे इडा पिंगळा ह्या चवऱ्या ढाळतील.या स्थितीत प्रारब्ध बलाने एक योगी असतो दुसरा त्यागी असतो. तर तिसरा इंद्रासारखा ऐश्वर्य संपत्र असतो. चवथे द्वारी मी तिघांच्याही पलीकडे असलेले जे मोक्षद्वार त्या गुहेमध्ये तपश्चर्या करीत बसलो आहे. म्हणजे ब्रह्मस्थितीत मी आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading