ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके अंबुला अभंग ९३१
पांचही वहाडी पांचा ठायीं बोळविली । येरा दिधली मिठी देखा ॥१॥ आंबुलियाचे सुख माझें मी भोगी । सेवेशी रिघे अंगोअंगीं ॥२॥ बापरखुमादेविवरु विठ्ठल जोडला । वेव्हारा मुकला बाईये वो ॥३॥
अर्थ:-
एक गौळण म्हणते पंचमहाभूतात्मक दिसणारे हे जगत हेच कोणी एक वऱ्हाड ते मायाकार्य आहे. असे समजून मी त्या वऱ्हाडाला वाटेला लावले आणि श्रीकृष्ण परमात्म्याला जाऊन मिठी मारली. आतां मी त्या श्रीकृष्णरूपी नवऱ्याचा आनंद भोगीन आणि सर्वांगाने त्याची एकनिष्ठ सेवा करीन. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते मला लाभल्यामुळे इतर सर्व व्यवहारापासून मी मुक्त झालो असे माऊली सांगतात.
Previous Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.930
Next Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.932
