👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग ९२
श्रवण त्वचा चक्षु जिव्हा घ्राण । दशहि इंद्रिये जाण हरीच्या ठायी ॥ अवघा हा गोविंदु अवघा हा मुकुंदु । अवघा हा विद्गदुभरला दिसे ॥ पतीतपावन नामें दिनोद्धारण । स्मरलिया आपण वैकुंठ देतु ॥ ज्ञानदेव म्हणे हें पुंडलीक जाणें । अंतकाळी पेणे साधियेलें ॥
अर्थ:-
पंचज्ञानेंद्रिये व पंचकर्मेंद्रिये याची जीवाला प्राप्ती त्याच्यामुळेच होते व त्यांच्या आधारे त्याला प्राप्त करुन घेता येते.तोच अवघा गोविंद, मुकुंद होऊन जगाच्या भार सांभाळत विदगद म्हणजे तापला आहे. तोच पतीताला पावन करणारा दिनांचा उध्दार करणारा असुन भक्ताला तो उदारपणे वैकुंठ ही देतो. पुंडलिकरायांनी हाच शेवटचा मार्ग आहे हे जाणुन त्याची प्राप्ती करुन घेतली असे माऊली सांगतात.
