👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग ९१
कापुरी परिमळु दिसे वो अळुमाळु । हळू हळू सुढाळू पवनपंथे ॥ पवनी न माये पवनही धाये । परतला खाये आपणासी ॥ मुखवात नाही तरतसे बाहीं । नांवे दिशा दाही आप घोषे ॥ ज्ञानदेवा मौन्य नामाचें तारण । दाहक हरिवीण दुजा नाही ॥
अर्थ:-
कापुराचा सुवास जसा हळुवार अनुभवता येतो.तसेच प्राणायाम मार्गाने हळु हळु मार्गावर जाता येते. पवनामध्ये जसा प्राण पवन असतो तसा आत्मज्ञानामुळे तो त्या प्राणालाच आपणच आपण होऊन खाऊन टाकतो. तो आत्मज्ञानामुळे सर्वत्र तोच आहे हा भाव मुखाद्वारे घेऊन त्यासाठी तरसत बसत नाही. व त्याचा भाव त्याला सांगत असतो दाही दिशाना तोच भरुन उरला आहे. मौन होऊन त्या नामात रत झाले की तेच तारक होते व त्या हरिनामाशिवाय तारणारे काहीच नाही असे माऊली सांगतात.
