ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.794

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१० वे, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ७९४

तूं विष्णु म्हणोन हे जगचि केवळ । येर सकळीक मजशीं सहोदर । तेणें कारण गोत्रेंसी ऐकोपजीवीं आम्हां न खंडवे कोडें रया । माहेरावांचुनी आन काही नेणें । माहेर तें उपजवी तरंगाचे जीवन । तोय वरी सामावे वेगळाले असिजेल केवीं रया ॥१॥ उदरी सिनार घरदारी सिनार सिनार दृश्य द्रष्टा । करी त्या मायबापाचेनि उद्वेगें । मी तो सांगोनिया आलों तुझियां पोटा रया ॥२॥ अंगे ब्रह्म झाला तें तुवां वो जाणितलें । परी तो अविद्ये घायतळी सुदला । ते तूं मजलागी नेणसीच माउलिये आपुठे पान्हाये वाडविलें रया ॥३॥ तंवचि मी जालों परी उदर न भेदीत जननीये जोडले ना वाटी । चक्षु पक्ष निघाले मज तुझाचि वाहाणी म्हणोनी सामावलों तुझ्या पोटी रया ॥४॥ ऐशापरी तुम्हां समसरिसा जालों परी तो नामें वोळखीजे । मी तो बाळ की मी तो वृद्ध ऐसें अनन्यपणे लोण कीजे रया ॥५॥ चेवो तरी स्वप्न स्वप्न तरी चेवो माय पुता नेणें ऐसें माझें तुझें । आपुलें आपण म्हणतां लाजिजे नमो नमो तुज व्याली वांझे रया ॥६॥ आयुर्वित्त भव विभव जगी जीवा निढळी लिहिलें । अलक्ष तें मज नेणतया अजंगमा लागुनी पुसोनी घातलें मूळ सानु रया ॥७॥ दृष्टिभेणें रूपा नये काळा भेणें नामाची सोय सांडियेली । तुझ्या रूपी सर्व रूप स्वरूप होऊनियां दिठी उतरिलिया परी रया ॥८॥ आपुलें वित्त आपणा देखतांचि शंकिजे त्या विभागाची केउती परी । बापरखुमादेविवरा विठ्ठला तूं येक सचराचरी रया ॥९॥

अर्थ:-

विष्णु या शब्दाचा अर्थ व्यापनशील असा आहे. म्हणून सगळे जग विणु आहे. ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म’ या अभिप्रायाने माऊली म्हणतात. हे भगवान तू विष्णु आहे. सर्वजग तुझ्या पासुन उत्पन्न झाले आहे. जगातील सर्व जीवमात्र माझे बंधु आहेत. या करीता एका गोत्रात असणे हे आमचे केव्हाही स्वाभाविकच आहे. यांच्याशी द्वैत बुद्धी करुन त्यांना टाकणेणे शक्य नाही. याकरता हे प्रभो आमचे माहेर जे तूं त्या तुझ्यावांचून आम्ही दुसरे काहीच ओळखत नाही माहेर हेच आनंद उत्पत्र होण्याचे स्थान आहे. तेच जीवाचे जीवन आहे. जरी लोकदृष्ट्या पाण्यावरील तरंगाप्रमाणे आम्ही भित्र भिन्न दिसलो तरी पाणीरूपाने वेगळे कसे असू. अशा बोधाने पुन्हा मातेच्या उदरांत, घरात दारात दृश्य दृश्टया ह्या भेदस्थितीपासून मी वेगळा झालो. अनंत जन्माच्या पुण्यसंस्काराने असा निक्षय करून मी तुझ्या पोटी आलो. या बोधाने मी अंगाने ब्रह्मरूप झालो. ते फाक्त तुला ठाऊक आहे. परंतु बाकीच्या जीवाकडे पाहिले तर त्यांना तूं अविद्येच्या वैषयीक सुखाखालीच दडपून टाकले आहेस. मला मात्र तसे केले नाहीस. उलट आपल्या ‘आपुठे’ म्हणजे अखंड प्रेमपान्हाने वाढविलेस. तेव्हाच मी अशा स्थितीला आलो. आणि ज्या प्रेमभक्तिने अशा स्थितीला आलो.त्या प्रेमभक्ति माऊलीचा मी उदर न भेदी म्हणजे तिचा नाश करीत नाही. पक्षी आपण जे अन्न संपादन करतो ते आपल्या पिलांना वाटीत नाही काय ! पुढे त्या पक्षाला डोळे येऊन पंख फुटले म्हणजे स्वाभाविकच ते स्वतंत्र होतात अशा तुझ्या ह्या कृपेच्या प्रवाहांत मला लाभ झाला आहे. म्हणूनच तुझ्या पोटी म्हणजे तुझ्या स्वरूपांत मी सामावलो आहे. याप्रमाणे तुझ्या स्वरूपाशी माझे ऐक्य झाले खरे तरी पण शरीरपातापर्यंत व्यवहारांत मी बाळ, तरूण, वृद्ध अशा नावाने ओळखिला जाईन परंतु ऐक्यपणाचा बोध असल्यामुळे त्या व्यवहाराचे सुद्धा कौतुकच वाटते. लोकदृष्ट्या जागृति असली तरी विचारदृष्ट्या ते स्वप्नच आहे. आणि स्वप्न म्हटले तरी स्वप्नात जो ज्ञानाचा व्यवहार असतो ते ज्ञान म्हणजे जागृति म्हणजे स्वप्नांत ज्या पदार्थाचा व्यवहार होतो. ते पदार्थ व तो व्यवहार मिथ्या असला तरी त्यांचे ज्ञान म्हणून जे असते (प्रकाशक) ते सत्यच असते. अशा बोधाने मातृपुत्रभाव किंवा माझा तुझा असा द्वैतभाव मी जाणत नाही एवढेच काय तर मी आत्मस्वरूप आहे असे म्हणतांना सुद्धा अद्वैतस्थितीत लाज वाटते नमस्कार असो तुझ्या मायेला, अरे ती स्वरूपाने वांझ असता ती तुलाच व्याली तसेच जगत आयुष्य, वित्त, जन्म, ऐश्वर्य हे सर्व जगातील जीवाच्या कपाळी लिहुन ठेवले आहे. परंतु जड, मूर्ख जो मी त्या माझ्या कपाळीचे ते पुसून टाकल्यामुळे मी त्याच्यापासून वेगळा आहे. मुळापासूनच अशी स्थिती आहे. व या स्थितीमुळे काळाच्या दृष्टीभयाने नामरूपाला येण्याची सोय टाकून देऊन सर्वरूप जो तूं त्या तुझ्या रूपाप्रमाणे होऊन या प्रपंचापासून दृष्टी उतरली. असे आपले रूप ऐश्वर्य आपण पाहात असता त्याविषयी जीवांचा निश्चय होत नाही. त्यांना शंका येते. मग त्या आत्मसुखाचा सुखोपभोग घेण्याचा प्रकार जीवाला कसा समजावा? माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठला चराचर जगतामध्ये स्वगत सजातीय विजातीय भेदशून्य असा तूम्ही एक आहात असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading