ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.763

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७६३

सिद्ध सांडूनि निजबोधा गेलें । निजबोधु मुकलें ब्रह्मभुली ॥१॥ आठवेना माझें पूर्वजन्मग्राम । अवघाचि श्रम माझा हिरोनियां नेला ॥२॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलें वेडावलें । आपणासहित मज ब्रह्मीं बुडविलें ॥३॥

अर्थ:-

माझा सर्व प्रपंच सिद्ध असता यथासांग असता तो टाकून मी निजबोधाकडे गेले. त्या ब्रह्मबोधाच्या भुलीने निजबोधही विसरून गेले. त्यामुळे माझा पूर्वीचा देहतादात्म्यरुपी गांव आठवेनासा झाला आणि संसार संबंधी माझे सर्व श्रम नाहीसे होऊन गेले. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्याने मला वेड लावून आपणासह वर्तमान मला ब्रह्मस्वरुपांत बुडविले. टाकून मी असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading