ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.765

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
  प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७६५

देखावयालागी जव अनौतें पहिलें । तव तनु मनु त्रिभुवनीं व्यापिलें गे माये ॥१॥ नवलावो जाले जग हरिच होऊनि ठेलें । आठवू विसरलें काय करूं ॥२॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलें साच केलें । लोह परिसेंसी झगटलें तैसें जालें गे माये ॥३॥

अर्थ:-

हे श्रीकृष्ण अगोदर तुला मी माझ्याहून अनौते म्हणजे भिन्न समजून पहावयाला गेलो. तो शरीरांत मनांत व सर्व त्रिभुवनांत तूंच व्यापिला आहेस असे दिसले.काय चमत्कार झाला. सर्व जग हरिरुपच होऊन गेल्यामुळे जिकडे पाहावे तिकडे हरिच आहे असे झाले. आता तुझा आठव करण्याचे विसरण्याचे असे राहिलेच नाही. लोखंडास परीस लागल्या बरोबर जसे ते सोनेच होते. त्याप्रमाणे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठलाने माझे खरे स्वरुप मला प्राप्त करून दिले असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading