ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.724

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७२४

पदोपदी निजपदा गेलें वो । कर्म संचित सकर्म जालें वो ॥१॥ तेथें आपुले नाठवे कांहीं वो । आपआपणा न पडे ठायीं वो ॥२॥ श्रीगुरुप्रसादें ज्ञान बोधु झाला वो । नव्हें ते ठाउकें पडिलें माय वो ॥३॥

अर्थ:-
क्षणोक्षणी परमात्मचिंतनाचा ध्यास घेतल्यामुळे. मी परमात्मपदाला प्राप्त झाले. व त्या बोधाने माझे बरेवाईट सर्व संचित कर्म सत्कर्मच झाले.त्या परमात्म्याचा यथार्थ बोध झाल्यामुळे माझ्या ठिकाणचा देहात्मभाव नाहीसा होऊन गेला. इतकेच काय देहात्मभाव नष्ट झाला याचीही आठवण मला राहिली नाही.याला कारण श्रीगुरु निवृत्तिरांयाची कृपा त्या कृपेनेच मला ब्रह्मात्मबोध झाला. त्यामुळे आतापर्यंत माहित नसलेला परमात्मा मला कळला. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading