ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.723

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७२३

अनुभव खूण मी बोलें साजणी । निरंजनी अंजन लेइलें अंजनीं ॥१॥ गुरुमुखें साधन जालें पै निवृत्ति । तत्त्वसार आपणचि जाला निवृत्ति ॥२॥ बापरखुमादेविवरा विठ्ठल कृपा चितीं । पुंडलिका साधिलें प्रेम तत्त्वार्थी ॥३॥

अर्थ:-
परमात्मसुखाचा अनुभव मला आला आहे. त्याची खूण मी सांगते. ती अशी निरंजन जो परमात्मा हेच एक अंजन मी आपल्या डोळ्यांत घातले. त्याला श्रीगुरुनिवृत्तिरांयाच्या मुखांतून आलेल्या उपदेशाचे सहाय्य झाले. म्हणजे त्यांच्या उपदेशाने सारभूत परमात्मतत्त्व मीच झाले. व सर्व अनात्म धर्मापासूनही निवृत्त झाले.माझ्याचप्रमाणे माझे पिता व रखुमाईचा पती जे दयाघन श्रीविठ्ठल ते प्रेमामुळे तत्त्वार्थाने पुंडलिकासही प्राप्त झाले असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading