ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.709 हरिभक्त संत झाले हो अनेक, 40 वैष्णव नांवे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

संत ज्ञानेश्वर महाराजांनी चाळीस 40 वैष्णवांची नावे सांगितली आहेत, ही संपूर्ण नावे या अभंगांमध्ये आपणास पाहायला मिळतील अवश्य पहा

संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.709
👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-६ वे, संतपर अभंग ७०९

हरिभक्त संत झाले हो अनेक ।
त्यामाजीं निष्टंक काही ऐक ॥१॥
शुक वामदेव शौनक नारद ।
अजामेळा प्रल्हाद बिभीषण ॥२॥
ध्रुव पराशर व्यास पुंडलीक ।
अर्जुन वाल्मिक अंबरीष ॥३॥


रूक्मांगद भीष्म बगदालभ्यसूत ।
सिध्री हनुमंत परिक्षिती ॥४॥
कश्यपादि अत्रि गौतम वशिष्ठ ।
भारद्वाज श्रेष्ठ मार्कंडेयो ॥५॥
बळी कृपाचार्य इंद्र सूर्य चंद्र ।
ब्रह्मा आदि इंद्र पूर्ण भक्त ॥६॥
सर्वांचा एक आहें मी किंकर ।
म्हणे ज्ञानेश्वर वैष्णवांसी ॥७॥

अर्थ:-
या भारतभूमिमध्ये अनेक भगवत् भक्त झाले. त्यामध्ये प्रमुख भक्तांची नावे अशी.
शुक, वामदेव, शौनक, नारद,
अजामेळ, प्रल्हाद, बिभिषण, ध्रुव
पराशर, व्यास, पुंडलीक, अर्जुन,
वाल्मिकी, अंबरीष,रूक्मांगद, भीष्म,
बकदालभ्यसूत, शबरी, हनुमंत, परिक्षिती,
कश्यप, अत्रि, गौतम, वशिष्ट,
भारद्वाज, मार्कंडेय, बळी, कृपाचार्य,
इंद्र, सूर्य, चंद्र,ब्रह्मदेव,
हे श्रेष्ट भगवद्भक्त होते. मी या सगळ्या वैष्णवांचा दास आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading