ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.707

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-६ वे, संतपर अभंग ७०७

उपजोनी नरदेहीं । जयाशी हरिभक्ति नाही । तोचि भूमिभारू पाहीं । व्यर्थ जन्म त्याचा गेला ॥१॥ पशुप्राणी तया जोडी । नेघेचि हरिनाम कावडी । तो कैसेंनि परथडी । नामेवीण पावेल ॥२॥ जिव्हा बेडुकी चावट । विसरली हरिनाम पाठ । ते चुकले चुकले वाट । वैकुंठीची जाण रया ॥३॥ बाप रखुमादेवि निर्धार । नामे तरले सचराचर । जो रामकृष्णीं निरंतर । जीवें जप करील रया ॥४॥

अर्थ:-
नरदेहांत जन्माला येऊन जो हरि भक्ति करीत नाही. तो भूमिभार असून त्याचा जन्म व्यर्थ होय. तो पशुतुल्य होय, जो हरिनाम उच्चारणार नाही. तो संसार समुद्राच्या पैलतीराला कसा जाईल? हरीनामावांचून इतर भाषण हे बेडूकाच्या ओरडण्यासारखे आहे. हरिनामपाठ जे विसरले ते वैकुंठाचा रस्ता चुकले. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल व रामकृष्ण नामाचा श्रध्देने नेहमी जप करतात ते निःसंशय तरुन जातात कारण रामनाममंत्राने संजीव निर्जीवांचा उध्दार झाला. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading