ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.675

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६७५

पाचांची वाट पाचांसवे गेली । येरासी जाहली देशधडी ॥१॥ अकारावें होतें तें धरुनियां नेलें । बारा तेरा गिळिलें धन माझें ॥२॥ रखुमादेविवरु चुळु मैं घोटिला । निधन जाहला शुद्धपणें ॥३॥

अर्थ:-

पंचमहाभूताचे बनलेले शरीर पंचत्वाला गेल्यावर बाकीच्यांची म्हणजे अन्य विकारांची देशोधडी झाली. दहा इंद्रियांचे चालक जे अकारावे मन होते ते धरुन नेले. बारावे चित्त आणि तेरावी बुद्धि हेच माझे मुख्य धन होते. तेच सर्व गिळून टाकले. रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांनी माझ्या जीवीचा घोट घेतला. त्यामुळे ह्या जीवाचे बुद्ध्यादिकासंह वर्तमान सर्व अविद्यक ऐश्वर्य नाहीसे होऊन शुद्ध परमात्मरुप झालो. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading