ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 67

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-२ रे, हरिपाठ अभंग ६७

त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं नामीं तरी तें व्यर्थ ॥१॥ नामासी विन्मुख तो नर पापिया । हरिवीण धांवया न पावे कोणी ॥२॥ पुराणप्रसिद्ध वोलिले वाल्मीक । नामें तीन्ही लोक उद्धरती ॥३॥ ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचें । परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥४॥

 अर्थ:-

तिन नद्यांचा संगम असलेले क्षेत्र तीर्थ असते अशा तीर्थांचे भ्रमण केले की देव जोडता येतो असे मानतात पण हे करताना चित्तात नाम नसेल तर भ्रमण व्यर्थ ठरते. जो नामाला विन्मुख आहे तो पापी आहे व त्याला सोडवायला धावणारा फक्त देव असतो. पुराण मुळे प्रसिध्द असलेले वाल्मिक सुध्दा सांगतात की नामामुळे तिन्ही लोकातुन उध्दार करता येतो. जो नाम जपेल तो नाही त्याच्या सकट त्याचे संपुर्ण कुळ पावन होते असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading