ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 66

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-२ रे, हरिपाठ अभंग ६६

विष्णुविण जप व्यर्थ त्याचें ज्ञान । रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें ॥१॥ उपजोनी करंटा नेणें अद्वय वाटा । रामकृष्णीं पैठा कैसा होय ॥२॥ द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । तया कैचें कीर्तन घडे नामीं ॥३॥ ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥

 अर्थ:-

 ज्याच्या मनात रामकृष्ण जप नाही ते मन नाही व ज्याला विष्णु स्मरण होत नाही त्याला ज्ञान नाही. हरिपाठ न करणारा जन्माला आलेला करंटा ठरतो त्याच्या तोंडात रामकृष्ण जप कसा करता येईल. द्वैताला झाडायला गुरुकृपा लागते. व द्वैत संपल्या शिवाय हरिकीर्तन घडत नाही. सगुण रुपाचे सतत ध्यान केले व नामपाठ केला तर त्या मौनात प्रपंच विरुन जातो.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading