ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.641

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६४१

मृत्युचेनि मापे जे जे गेले प्राणी । तयाची शिराणी यम करी ॥१॥ यम नेम धर्म आम्हां नाही कर्म । अवघेचि ब्रह्म होऊनी ठेलों ॥२॥ द्वैतभाव ठेला अविनाश संपन्न । आपेआप जनार्दन येईल घरा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे काज सरले संसारी । चारीही मापारी गिळूनि ठेलों ॥४॥

अर्थ:-

जे जे प्राणी मेलें त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे यम त्यांचा बरावाईट शेवट करतो. त्या कर्मधर्माचे किंवा यमाचे भय आम्हास नाही. कारण आम्ही ब्रह्मरुप होऊन राहिलो. त्या अविनाश ब्रह्मरुपाने जो राहिला त्याचा द्वैतभाव जाऊन परमात्मा जनार्दन त्याचे घराला येईल.अशा स्थितीत आमचे संसाराचे सर्व काम आहे. इतकेच नाही तर संसारिक काम संपविण्याला मदत करणारे जे चारी वेद त्यांनाही आम्ही गिळून बसलो आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading