👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ४६
चंचळ चांदिणे सोमविणे भासले । तेज निमालें रविबिंबेविणे ॥ जगत्रजिवनु म्हणे जगाशी कारण । ते अणुप्रमाण तेथें दिसे ॥ बापरखुमादेविवरू अणुप्रमाण भासला । सगुण निर्गुण जाला बाई ये वो ॥
अर्थ:-
त्याच्या रुपाकडे पाहिले की चंचल चांदणे चंद्रासह त्यात लोप पावते तद्वत सुर्य ही तेजासह लोप पावतो. तोच जगताचे कारण असुन तोच जगाचे जीवन आहे तरी ही त्याची व्याप्ती अणु प्रमाणे सुक्ष्म आहे. हे जीवरुपी सखी तो रखुमाईचा पती सुक्ष्म असुन सगुण व निर्गुण तोच झाला आहे. असे माऊली सांगतात.
Previous Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 45
Next Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 47

[…] महाराज सार्थ गाथा अभंग ४५,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ४६,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग […]