ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.424

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४२४

नयनाचे अंगणीं तुर्येचा प्रकाश । उन्मनी उल्हास तयावरी ॥१॥ श्वेत शाम कळा प्रकाश आगळा । स्वयं ज्योती बाळा लक्ष लावीं ॥२॥ ज्ञानदेव म्हणे कैसे हे नयन । चैतन्याची खूण आन नाहीं ॥३

अर्थ:-

योगी लोकांना ‘तुर्या’ नामक चौथी अवस्था प्राप्त झाली म्हणजे त्यांच्या डोळ्यांत एक प्रकारचे तेज येते व पुढील उन्मनी अवस्थेत मन उल्हासीत होते अशा स्थितीत जिच्या ठिकाणी काळा, पांढरा वगैरे रंग आहेत अशी आत्मज्योती दिसते. तिकडे लक्ष ठेवावे. हे च डोळ्यांतील तेज चैतन्याचे असून दुसरे कांही एक नाही हीच त्याची खूण आहे.असे माऊली ज्ञानदेव सांगतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading