ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.425

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४२५

रक्तवर्ण स्थूळ श्वेत हे सूक्ष्म । कारण तें शाम ऐसें देखा ॥१॥ निळावर्ण देह महाकारण साजिरा । ज्योतीचा मोहरा अलक्ष लक्ष्मी ॥२॥ ज्ञानदेव म्हणे सर्व हें चैतन्य । मन हेंचि धन्य धन्याचेनी ॥३॥

अर्थ:-

स्थुल देह ही तांबडी पाकळी, सूक्ष्म देह पांढरी पाकळी, कारण देह काळी पाकळी. व महाकारण देहरूप पाकळीचा रंग निळा असतो.त्यामध्ये बह्मज्योतीरूप लक्ष्मी असते. हे दृश्य पदार्थ चैतन्यरूप आहे. सदगुरू धन्याच्या कृपेने ज्याच्या मनाला हे चैतन्य दिसते तो पुरूष धन्य धन्य होय असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading