ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.319

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग ३१९

स्वप्नाचेनि भ्रमें धरिसी स्थूलाकृति । परी सिध्दी नव्हे सत्य त्याच्या पायी । कारण महाकारण लिंगादि चतुष्ट । हे शाब्दिक उपाय बोलो ठाती ॥ येक नाही तेथे दुजें कायिसे । देहद्वय पाहतां दुजे न दिसे ॥ तेचि ते संकल्प स्थुळ नैश्वर्यांचें भान । त्या म्हणती कारण नवल पाहीं । महाकारण लिंगदेह शाब्दिकी धरिला । तो शास्त्रज्ञी पाहिला अर्थी साही ॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलुचि देहीं । अवस्थातीत पाहीं तोचि एक । निवृत्तीरायें अंजन लेवऊनि पायाळा । निजसदन तें विश्व जाले ॥

अर्थ:-

स्वप्नवत् असलेल्या या स्थूल शरीराचा मी म्हणून तु अभिमान का धरीत आहेस? या तुझ्या देहाभिमानामुळे तुला मोक्षसिद्धी प्राप्त होणार नाही सूक्ष्म,स्थुल कारण व महाकारण या चार शरीरांचे शाब्दिक वर्णन पुष्कळ लोक करतात.पण त्या शब्दावडंबराचा कांही एक उपयोग होणार नाही. परमात्मा एक आहे असे म्हणावे तर त्याच्याशिवाय दुसरा पदार्थ आहे कोठे. काही एक नाही ज्याच्या ठिकाणी एक म्हणणे ही सहन होत नाही त्याठिकाणी द्वितीयत्व कोठुन आणणार.याप्रमाणे स्थूल, सूक्ष्म देहाचा विचार केला असता, या दोघांचे भान जेथे होत नाही. त्या स्वरुपाच्या ठिकाणी स्थूल नेश्वर्याच्या संकल्पाचे भान होते. ते प्रथम भान होते. त्यालाच कारण असे म्हणतात. हा मोठा चमत्कार आहे. चवथा महाकारणदेह आहे. असे म्हणणे हे केवळ शब्दमात्र आहे अशा त-हेचा सिद्धांत सहाशास्त्रांचा अभ्यास करणा-या शास्त्रज्ञांनी करुन ठेवला आहे. रखुमादेवीचे पती व माझे पिता श्रीविठ्ठल, ते या चारी देहाहून वेगळा अवस्थातीत आहेत. अशा तहेच्या बोधांचे अंजन श्रीगुरु निवृत्तीरायांनी पायाळू असे जे मुमुक्षु त्यांच्या डोळ्यांत घालुन आपल्या नीजस्वरुपाचे घर त्याना दाखविले. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading