ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.318

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग ३१८

कापुरा अग्नि स्नेह जाला । मी नाही तेथे काय उरला ॥ मी नाही तेथे कवणिये ठायीं । देखत देखत पाहीं भुललासी ॥ बापरखुमादेविवर विठ्ठली खूण । जाणते जाणती ते अनुभविये ॥

अर्थ:-

कापूर व अग्नि याचा सबंध झाला असता दोघांचाही नाश होऊन जातो त्याप्रमाणे परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी अहंकाराचे ऐक्य भाव झाला असता तेथे अहंभाव किंवा परमात्मभावही उरत नाही त्या परमात्म स्वरुपाच्या ठिकाणी अहंकाराचा कालत्रयी सबंध नाही. असे स्पष्ट असतांना देहाचा अभिमान घेऊन कां भुललास. रखुमादेवीचे पती व माझे पिता श्री विठ्ठल यांची खुण ब्रह्मानुभवी पुरुषच जाणतात असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading