ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.653

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
  प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६५३

वृत्तीचा उच्छेद मनाचा निग्रह । धारणा विग्रह तेज तत्त्वीं ॥१॥ बिंबामाजीं बिंब हरपलें स्वयंभ । मायेचा पै लोभ अरता जाला ॥२॥ नाहीं तेथें छाया मायेचा विलास । घरभरी पैस दीपी रया ॥३॥ बापरखुमादेविवर ज्ञानदेवा धन । वस्तुची विवरण तेजाकारें ॥४॥

अर्थ:-

अनात्मवृत्तीचा उच्छेद म्हणजे नाश आणि मनाचा विषयापासून निग्रह म्हणजे धारणा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर. असे केलें म्हणजे परमात्मरूप बिंबात जीवरुप बिंब लय पावून तूं स्वतःच परमात्मरुप होशील. मग आपोआप मायेचा लोप अरता’ म्हणजे निकृष्ट झालाच असे समज. त्या परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी छायारुप जीव किंवा मायेचा विलास हे काही एक नसुन स्वयंज्योतीरुप जे माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविेठ्ठल असा जो परमात्मा त्याचा सर्व त्रैलोक्य रुपी घरात विस्तार होईल. तसेच घनदाट जो तेजाकार परमात्मा त्या परमात्म वस्तुचा माझे ठिकाणी विस्तार झाला आहे असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading