ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 10

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

 ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग १० ला.

सुंदर सुरेख वोतीले । परब्रम्ह तेज फांकले । तें व्योमी व्योम सामावले । नयनी वो माय ॥कमलनयन सुमन फांकले । त्या परिमळा आथिलें मकरंदी वो माये ॥संकोचला संसार । पारूषला व्यवहार । ब्रह्मानंद अपार । जाहला वो माय ॥मधुर वेदवाणी । न पवे ज्याच्या गुणीं । तैं ठकावलें निर्वाणीं । नेती मुखें वो माय ॥या परतें बोलणें । न बोलणे होणें । ते म्यां आपल्या अंगवणें । केलें वो माय ॥ ऐसी यातें वोती । लागलें तयाचे पाठीं । रखुमादेवीवरा भेटी । विठ्ठलीं वो माय ॥

अर्थ:-

नितांत सुंदर अश्या त्याचे तेज परब्रह्म स्वरुपानी पसरले आहे.ते व्योम म्हणजे आकाशा येवढे आकाशभर व्यापले आहे. कमळा सारखे नेत्र व फुला सारखा सुगंध त्याला आहे. त्याचा तो परिमळ व मध ह्यांचा तो एकत्रीत अविष्कार आहे.त्याच्या ठायी संसार संकोचतो, व्यवहार दुर जातो व त्याच्या जवळ फक्त अपार ब्रह्मानंद मिळतो. मधुर वेदवाणी त्याच्या गुणांचे आकलन करु शकत नाही व नेती म्हणत तेथेच विरामते. या बाबत बोलणे हे न बोलणेच होऊन जाते कारण तो ब्रह्मस्वरुपपणे मीच आहे. हे दोन्ही ओठ त्याचे स्मरण करत त्याच्या जणु काही पाठी लागले आहे. तो रखुमाईचा वर विठ्ठलाची मला भेट व्हावी अशी माऊली इच्छा करतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading