ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.927

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
  प्रकरण :-१४ वे, रूपके अंबुला अभंग ९२७

सुखाचा निधि सुखसागर जोडला । म्हणोनी काळा दादुला मज पाचारी गे माय ॥१॥ प्रेम नव्हाळी मज झाली दिवाळी । काळे वनमाळी आले घरा गे माय ॥२॥ बापरखुमादेविवर पुरोनी उरला । सबाह्यजु भरला माझे हृदयीं गेमाये ॥३॥

अर्थ:-

श्रीकृष्ण परमात्मा हा अगाध सुखाचा सागर आहे म्हणूनच याचा वर्ण काळा आहे. असा हा भ्रतार मला बोलावित आहे. या कृष्ण परमात्म्याच्या बोलावण्याने नवीन प्रेमसुखाची आज मला दिवाळी झाली. कारण असा हा शामतनु वनमाळी आज माझे घराला आला.माझे पिता व रखुमाईचे पति जे श्रीविठ्ठल हे माझ्या हृदयांत अंतरबाह्य भरून उरला आहेत. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading