ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 70

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-२ रे, हरिपाठ अभंग ७०

समाधि हरिची सम सुखेंवीण । न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥१॥ बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें । एका केशवराजें सकळ सिद्धि ॥२॥ ऋद्धि सिद्धि निधी अवघीच उपाधि । जंव त्या परमानंदीं मन नाहीं ॥३॥ ज्ञानदेवी रम्य रमलें समाधान । हरिचें चिंतन सर्वकाळ ॥४॥

अर्थ:-

बुध्दीतील द्वैत गेले की समाधीचे सम व शाश्वत सुख भोगता येते.त्यामुळे जीवाला बुध्दी हे सर्वात मोठे वरदान लाभले आहे व त्या बुध्दीद्वारे तो केशीराज आपलासा करता येतो. ऋध्दी सिध्दी मिळवणे म्हणजे उपाधी मिळवण्यासारखे आहे जो पर्यंत त्या परमानंदात मन रमत नाही तो पर्यंत त्याही काही कामाचा उरत नाहीत. त्या हरिचे चिंतन मी सतत करत असल्याने मला रम्य समाधान लाभले असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading