सारदामाता चरित्र भाग ७, (३१ ते ३५)

रामदास स्वामींच्या शिष्यांना माताजी म्हणाल्या, रामदास स्वामी बद्दल जाणण्याची उत्सुकता आहे  शिष्य म्हणाला, ज्या कार्याचा रामकृष्ण परहंसांनी ध्यास घेतला होता, तेच कार्य माझे स्वामी करीत होते  मीही समाज प्रबोधन करण्यासाठी हिंडतोय  शिष्य निघून गेला  नावेतून माताजी............

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

रामदास स्वामींच्या शिष्यांना माताजी म्हणाल्या, रामदास स्वामी बद्दल जाणण्याची उत्सुकता आहे  शिष्य म्हणाला, ज्या कार्याचा रामकृष्ण परहंसांनी ध्यास घेतला होता, तेच कार्य माझे स्वामी करीत होते  मीही समाज प्रबोधन करण्यासाठी हिंडतोय  शिष्य निघून गेला  नावेतून माताजी…………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!! सारदामाता !!!  

भाग – ३१

                 जन्माष्टमी साठी माताजींना ” काकूर्गाची” हून निमंत्रण आले  लक्ष्मी, नलिनी, राधू आणि गोलप यांना सोबत घेऊन माताजी निघाल्या  तिथल्या कार्यक्रमात कृष्णाची अनेक रूपे साकार केली  सर्व वातावरण कृष्णमय झालं होतं  तिथल्या सुंदर शिस्तबद्ध कार्यक्रम माताजींना खूप आवडला  दुरून दुरून त्यांच्या दर्शनाला लोक येत होते  चार दिवस तिथे थांबवून त्या कलकत्त्याला परत आल्या

       एके दिवशी एक बंगाली स्त्री माताजींना भेटायला आली  ती चांगल्या घरची दिसत होती  माताजींनी येण्याचे प्रयोजन विचारल्यावर, ती स्त्री सांगू लागली    माझे लग्न अगदी लहान वयात झाले  पती मुदती तापाने गेले  चार खोल्यांचा घर होते  त्यातल्या दोन खोल्या भाड्याने दिल्या  काही थोडीफार शेती होती  उत्पन्न येत होते  त्यावर कसं कसं भागत होतं  मुलीचं लग्न करून दिलं  मुलगा शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागला  त्याचेही लग्न करून दिले  नातवंडात रमण्याचे स्वप्न पहात होते  पण नियतीला मान्य नव्हते  स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली  मला न सांगता त्याने आंदोलनात भाग घेतला   बाॅम्ब बणवणे, सरचारी कचेर्‍या लुटणे, इंग्रज अधिकार्‍यांना मारणे इत्यादी कृत्याच्या कटात तो असल्याचे सिद्ध होऊन त्याला फाशीची शिक्षा दिली  त्याच्या नावावर असलेलं घर ,जमीन सरकारने जप्त केलं  त्याची पत्नी कुठे गेली माहित नाही  जावयाने आधीच संबंध तोडले होते  मी अगदी निराधार झाले  तुमची कीर्ती ऐकून आले

          माताजी, मी पडेल ते काम करेन  माझ्यापासून कोणालाही उपद्रव होणार नाही  मला आश्रय द्या  ठीक आहे  पण भूतकाळ कोणाला सांगू नका  तुमची जीवनकथा कर्णोपकरणी होऊन सरकारला कळली तर, तुमच्याबरोबर आम्हालाही त्रास होईल  त्या स्त्रीची सर्वांशी ओळख करून दिली  

             माताजींनी जगन्नाथ पुरीला जाण्याची इच्छा व्यक्त करताच, सारदानंदाने दुसऱ्या वर्गाचे रिझर्वेशन केले  त्यामुळे प्रवासात फारसा त्रास झाला नाही  मंडळी पुरीला आली  माताजी बरोबर असलेल्या स्त्रिया क्षेत्र निवासात आणि पुरुष शशी निकेतन मध्ये उतरले

           माताजींनी समुद्र स्नान करून जगन्नाथाच्या मंदिरात आल्या  त्यांना जगन्नाथांनी आपल्याकडे पाहिल्याचा भास झाला  त्यांनी तिथे बसून बराच वेळ जप केला  मध्येच त्यांना जगन्नाथांच्या मूर्ती मागून बघत असलेले रामकृष्ण दिसले  त्यांनी जप थांबवला

        पूजा जप आणि सकाळ संध्याकाळ जगन्नाथाचे दर्शन यात माताजींचे दिवस जाऊ लागले  एक दिवस त्यांचा पाय दुखू लागला  दोन दिवसानंतर पायावरचा बारीक फोड मोठा झाला  त्यांना चालणे अशक्य झाले  तरीही त्यांनी दर्शनाला जाण्याचा नेम चुकवला नाही  एकदा त्यांना मंदिराच्या पायऱ्यावर चक्कर आली  गोलपने त्यांना घरी आणले  रात्री असह्य वेदनेने त्यांना झोप आली नाही  दुसऱ्या दिवशी प्रेमानंद एका डॉक्टरला घेऊन आले  त्यांनी नमस्काराच्या निमित्ताने वाकून त्यांच्या पायावरचा गळू कापून, कापूस लावला  गोळ्या देऊन निघून गेला  दुसऱ्या दिवशी आल्यावर, नमस्कार करून म्हणाला, माताजी, तुमच्या परवानगी शिवाय मी चाकूचा उपयोग केल्याबद्दल क्षमा करा

          तो डॉक्टर अगदी योगानंद सारखा दिसत होता  त्याच्या चेहऱ्यावरचे आर्जव, बोलण्यातली नम्रता पाहून, त्या म्हणाल्या, बेटा, माफी कसली मागतोस? तू माझ्या वेदना कमी केल्यास  

           त्यांचा पाय बरा झाला  खंडित झालेले समुद्र स्नान पुन्हा सुरू झाले  त्यांच्या मनी आले, आपल्या आईलाही जगन्नाथाचे दर्शन घडवावं  त्यांनी सूचना देऊन एका शिष्याला त्यांना आणायला पाठवले  एक आठवड्यानंतर आई व तिच्याबरोबर कालीचरण, त्याची पत्नी, दोन मुलं, त्याचा सासरा व शेजारचा सिताराम इतकी मंडळी आलेली पाहून माताजी खर्चाचा विचार करून चक्रावल्या  काही दिवसांनी मंडळी जायला निघाल्यावर, माताजींनी आईला थांबवून घेतले  त्यांना जवळपासची बरीचशी तीर्थक्षेत्रे घडवली  आणि मातेसह कलकत्त्याला बाग बाजारच्या आपल्या घरी आल्या

                नील माधवला अस्थमाचा त्रास होताच  कलकत्त्याला आल्यावर जास्त वाढला  त्यांना बिछाण्यावरूनही उठणे अशक्य झाले  माताजी स्वतःकडे दुर्लक्ष करून रात्रंदिवस काकांची सेवा करीत होत्या  

            एके सकाळी पूजा जप वगैरे करून नैवेद्य ठेवल्यावर, त्यांनी सर्वांना जेवायला सांगितले  त्यांनाही आग्रह केल्यामुळे जेऊन घेतले  आचवून त्या खोलीत आल्या तर, सर्वजण खाली माना घालून बसले होते  ते पाहून माताजी समजायचं ते समजल्या  त्यांना दुःख आणि पश्चाताप झाला  करुण स्वरात म्हणाल्या, तुम्ही भोजनाचा आग्रह केल्यामुळे काकांचे अंतिम क्षणी मला येता आले नाही  आणि रडू लागल्या   काशी क्षेत्र घाटावर काकांची दहनविधी आटोपली

            माताजी आपल्या मंडळीसह जयरामटीला आल्या  श्यामसुंदरी खूपच थकली होती  थोडेही श्रम सहन होत नव्हते  एकदा ती पडवी चक्कर येऊन पडली  तिला घरात आणून झोपवले  उपचार केले  थोडेफार बरे वाटताच म्हणाली, सारू, आज कोहळ्याची आमटी करशील? आई, आधी तू बरी हो! मी सगळं करीन  पण संधी मिळाली नाही  त्याच रात्री तिची तब्येत बिघडली  माताजी समजल्या  त्यांनी गंगाजल पाजलं  जप करत तिथेच बसल्या  थोड्या वेळाने श्यामसुंदरी अनंतात विलीन झाली  घर शोक सागरात बुडाले  सर्व तयारी झाल्यावर, अमोदरच्या किनारी दहन केले

         क्रमशः
संकलन व लेखन –  मिनाक्षी देशमुख

!!!  संताजी घोरपडे  !!!

                 भाग – ३२

            रामचंद्र पंतांनी संताजींना महिमानगड कडे जाण्याची व शंकराजींची भेट घेण्याची सूचना केली  पंतांच्या  सूचनेनुसार संताजी महिमानगडाकडे निघाले  जाता जाता आपल्या फौजांना कर्नाटका एवजी महाराष्ट्रात परत फिरण्याचे आदेश धाडले  संताजी जिंजीत असताना पंत आणि संताजी दरम्यान अनेक गैरसमज पसरले होते   त्यात किती सत्य आहे हे पण त्यांना जाणून घ्यायचे होते

 संताजी शंकराजी नारायणांना भेटायला आले त्यावेळी शंकराजी व धनाजी महिमागड व वरुडगडाच्या स्वारीचे बेत रचत होते  संताजी आल्यावर थोडे औचारीक बोलणे झाल्यावर, शंकराजींनी त्यांना उपदेशपर काही बोध दिला व स्वराज्यासाठी आपली एकजूट किती महत्त्वाची आहे हे पटवून दिले  

            त्याच दरम्यान महिमान गडाच्या किल्लेदाराने बादशहास कळवले की, संताजी, धनाजीची फौज मेहमानगड, वरूडगडाला वेढा घालण्यास आली आहे  किल्ल्यांच्या सर्व रस्ते अडवून धरले तरी, त्वरेने कुमक पाठवावी  बादशहाने बक्षी उल्मुल्क मुखालीस खानाची नेमणूक करून त्वरेने कुमक रवाना केली

            याच सुमारास सातारा सीमावर्ती प्रदेशातील अकलूजला मोगल सरदार हिम्मत खानची छावणी होती  मराठ्यांचा जोर वाढलेला पाहून त्याने, बादशहाकडे ज्यादा लष्कर तुकड्यांची मागणी केल्यावर बादशहाने ताबडतोबराव तुकड्या रवाना केल्या  

             संताजी, धनाजीच्या फौजा एकत्र झाल्याने मराठ्यांची ताकद वाढली  शंकराजी नारायणांनी हिंमतखान महिमानगड, अक्कलुज वर एकाच वेळी हल्ला केला  तिन्ही ठिकाणी मोगलांचा पडाव झाला  हिंमत खान कसाबसा जीव वाचवून निसटला  पराभवाच्या बातम्यांनी औरंगजेबची झोप उडाली  त्याच्या डोक्यात संताजीराव खुपत होते  संताजीला मृत किंवा जिवंत पकडून देणाऱ्यास मोठे बक्षीस जाहीर केले  

        बादशहाच्या आदेशानुसार सुभेदार हिम्मतखान सातत्याने संताजीच्या पाठलागावर होता  त्याने विक्रम हळ्ळीला संताजींची फौज अडवली  लढाईची धुमश्चचक्री सुरू झाली  जवळ जवळ ३०० मराठे शिपाई गारद झाल्याचे पाहून, आणखी शिपायांना न गमावता, हिंमतखानला झुकांडी देऊन संताजी  सैन्यासह विक्रमहळ्ळी वरून निसटले  मोगलांच्या दुर्दैवाने तिन्ही खानात भांडणे सुरू झाली  हमीउद्दीनखान व खाजाखान गुलबर्गाकडे निघून गेले  हिंमतखानने मात्र संताजींचा पाठलाग सुरूच ठेवला  संताजीच्या सोबतीला ४००० फौजेनिशी अमृतराव निंबाळकर सरदार होता

              हिंमतखानला चुकवण्याबाबत संताजी व सरदारांबरोबर बराच वेळ खलबत्ते चालू होती  पण  ठोस निर्णय होत नव्हता  पुन्हा रात्री मसलत बसली  महत्त्वाचे निर्णय घेतले गेले  संताजींनी अमृतराव निंबाळकर यांना वर्‍हाडकडे पाठवले  उरलेले सैन्य घेऊन संताजी नारोसहित कर्नाटकातील मालखेडला पोहोचले  बादशहाचे हेर खाते इतके जबरदस्त होते की, संताजीच्या मोहिमेची खबर त्याला पोहोचली

         बादशहाने हमीदऊद्दीनखान व खाजाखानला अमृतरावचा पाठलाग करण्याचा हुकूम दिला  आणि लष्करखान नावाच्या नवीन सरदार संताजींना अटकाव करण्यास धाडला  हिंम्मतखान तर होताच  तो सतत पाळतीवर राहून संताजींना पकडू पाहत होता  हिम्मतखानला हुलकावणी देऊन, संताजी पुन्हा मालखेड जवळ येऊन अकलूजच्या गढीत तळ ठोकला  हिंमतखानने गढीला वेढा दिला

              संताजी पुरता आपल्या खोड्यात अडकला, असे वाटून त्याने भालखेडच्या जमीनदारांकडून खंडणी वसूल करण्यात मशगूल झालेला पाहून, संताजी कधी निसटले त्याला कळलेही नाही  ते तडक गोवळकोंडाला भिडले  तिथे धुमाकुळ माजवून दिला  तोच जिंजीकडे तोफा व रसद घेऊन जात असलेल्या छत्रसाल राठोडची तोफा सहित रसद लुटली  ही लुटालूट चालू असतानाच राठोडला आणखी कुमक मिळाली  संताजीने सरळ महादेवाच्या डोंगराकडे प्रयाण केले

                   धनाजी देखील सातारा भागातच होते  मराठेशाहीला दुहीचा शाप  भोवला  दोघांमध्ये तणाव वाढतच होता  त्याची झळ राजसिंहासनापर्यत पोहोचायला वेळ लागला नाही  सध्या तरी घोरपडे जाधवातील वितुष्ट स्वराज्यासाठी घातक होते  छत्रपतींसह सर्वजण अस्वस्थ होते  संताजी घोरपडेंचा रुसवा काढून त्यांची समजूत घालण्यासाठी व धनाजी संताजींची दिल जमाई करण्यासाठी महाराजांनी आपला खास दूत विठ्ठल निळकंठास महाराष्ट्रात पाठवले  परशुराम त्रिंबकही त्यांचे बरोबर होते

          संताजी म्हणजे धगधगीत अंगार होते  प्रत्यक्ष छत्रपतींनाही बोल लावलेला तो सेनानी होता  त्यांना आवरणे महा कठीण होते  त्यांची मान फक्त एकाच ठिकाणी झुकत होती ते म्हणजे छत्रपतींचे सिंहासन  परशुराम त्रिंबक व निळकंठ यांच्यात मंत्रणा झाली  धनाजीला बोलावणे धाडले  धनाजीचा बोलावता धनी नागोजी माने सध्या तरी कुठे परांगदा होता

            क्रमशः
संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख               
             दि  २३-१०-२०२३

!!!  सारदामाता  !!!

                भाग – ३३

              काही शिष्य व राधूसह माताजी मद्रास मेलने रवाना  झाल्या  स्टेशनवर गाडी थांबली  तेवढ्यात मेसर्स कोलनेर ॲंड कंपनीचा मॅनेजर आला  तो बंगालीत म्हणाला, माताजी, मी रामकृष्णांचा भक्त आहे  आजच्या दिवस माझ्याकडे राहून पुढे जावे  त्याने टांग्याची व्यवस्था केली  टांगा  घराजवळ आला  मंडळी उतरताच त्यांची दोन मुलं पुढे आली  त्यांना द्यायला आपल्याजवळ काहीच नाही असा भाव जाणून केदारच्या मातेने रसगुल्लाचा डबा काढून त्यांच्या हाती दिला  पोरं रसगुल्ले    रसगुल्ले करत पळून गेले  

         माताजींचे स्नान, जप झाल्यावर, दुपारी चवदार जेवण झाले  संध्याकाळी बरेच लोक माताजींच्या दर्शनाला आले  त्यातले बरेच ठाकूरांचे भक्त होते  माताजींना खूप आनंद झाला

        दुसऱ्या दिवशी निरोप घेऊन निघाले  दुपारी विशाखापट्टणमला पोहोचले  निसर्गाच्या सानिध्यात असलेलं आरोग्यधाम त्यांना खूप आवडलं  दुसऱ्या दिवशी मद्रास स्टेशनवर उतरले  रामकृष्णानंद  व काही भक्तांनी पुढे येऊन जयजयकार केला  त्यांच्या समवेत सर्व मंडळी निघाली  रामकृष्ण मठाजवळ घेतलेल्या भाड्याच्या जागेत मंडळींनी प्रवेश केला  एक दिवस विश्रांती घेऊन, कपिलेश्वर, पार्थ सारथी मंदिर, मद्रासचा प्रसिद्ध किनारा आणि प्रेक्षणीय स्थळे पाहिली  एक दिवस आराम करून मंडळी रामेश्वरमला निघाली  सोबत रामकृष्णनंदही होते  मार्गात मदुराईला उतरुन देवीचे दर्शन घेऊन रामेश्वरला जायचं ठरलं

             सर्व मंडळी मदुराईला  आली  तिथल्या नगर पालिकेच्या अध्यक्षांनी त्यांचे स्वागत करून, आपल्या  घरी येण्याची विनंती केली  तलावात स्नान करून, सर्वांनी देवीचे दर्शन घेतले  नमस्कार करून ओटी भरल्यावर मंडळी समुद्र किनारी आली हिंदी महासागर आणि अरबी समुद्राचं मिलन पाहून, सगळ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले  सागरात असलेला काळा  खडक पाहून, सर्वांना आश्चर्य वाटले  माताजींना त्या खडकावर ठाकूर व नरेन उभे दिसले  त्यांनी तेथे जाण्याची इच्छा व्यक्त केल्यावर, उन्ह उतरल्यावर जाण्याचे ठरले  रामकृष्णनंद म्हणाले, माताजी, त्या खडकावर नरेंद्रभाई उभे असल्यासारखे वाटते  दक्षिणेत ठाकुरांच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि रामकृष्ण मठ विवेकानंदामुळे उभारले गेले  गोलप  म्हणाली, म्हणूनच आमच्या नरेन भैय्याचं स्मारक इथे व्हायला हवे  तथाऽस्तु शब्द माताजींच्या कानात शब्द निनादले

               मदुराईतील प्रेक्षणीय स्थळे पाहून मंडळी रामेश्वरमला आली  रात्र बरीच झाली असल्यामुळे मंदिराचा दरवाजा बंद झाला होता  मंडळींनी बाहेरूनच दर्शन घेतले  गंगाराम पुजाऱ्याने त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली  

             दुसऱ्या दिवशी पहाटेच समुद्र स्नान करून, सर्वजण मंदिरात आले  गाभाऱ्यात जाऊन पूजा करण्याचा अधिकार कोणालाच नव्हता  परंतु तिथला राजा रामनाथ कडून आपल्या गुरूंचे गुरु आले  त्यांना गाभाऱ्यात जाऊन पूजा करु द्यावी असा टेलिग्राम आल्यामुळे त्यांना जाता आले  भक्त स्त्रियांनी सुवर्ण बिल्वपत्र वाहिले  रामकृष्णनंदाने दिलेली दहा सुवर्ण बिल्वपत्र माताजींनी वाहिली

              वाळू पासून बनवलेल्या पिंडीकडे सर्वजण एकाग्रतेने पाहत असताना, माताजी पिंडीला स्पर्श करीत स्वतःच म्हणाल्या, मी केली अगदी तशीच ही पिंड राहिली  असे म्हणून नमस्कार करून बाहेर आल्या

              श्रीरामांनी रावणाचा वध केल्यावर इथे या रामेश्वरी शिवलिंगाची स्थापना केली होती  गोलप म्हणाली, माताजी, शिवलिंगाची पूजा करताना त्रेता युगातल्या सीतामाईच माताजींच्या ठायी दिसत होत्या

             माताजी सकाळ संध्याकाळ रामेश्वराचे दर्शन घेत होत्या  एक दिवस तिथला राजा रामनादने आपल्या दिवानाला जवाहरखाना माताजींना दाखवण्याचा आदेश दिला  त्याने अतिशय आग्रहाने रत्न भांडार  दाखवल्यावर निर्वीकार नजरेने पाहत असलेल्या माताजींना राजाच्या सूचनेनुसार एखादा दागिना घ्यायचा आग्रह केला  पण माताजींनी स्पष्ट नकार दिला

          रामेश्वरहून मंडळी मद्रासला  आली  रामकृष्णांच्या जयंतीला माताजी उपस्थित असल्यामुळे भक्तांना खूप आनंद झाला  त्या दिवशी माताजींना सर्वत्र रामकृष्णच दिसत होते

              दोन दिवसानंतर सर्वजण बंगलोरला आले  तिथेही माताजीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली  सर्वांनी जयघोष केला    सारदामाता की जयऽऽ सारदा माता की जयऽऽ!

         आश्रमाच्या मागे एक टेकडी होती  माताजी त्या टेकडीवर चढून निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य भान हरपून पाहत असताना,  रामकृष्णानंद येऊन म्हणाले,  आज आमच्या माताजी पर्वतवासिनी सारख्या दिसतात  त्याने या जगन्मातेच्या चरणावर मस्तक ठेवले  तो माताजींची स्तुती करू लागला   

   ” सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिकेऽ।

     शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तुते।

     सृष्टी स्थिती विनाशानां शक्तीभूते सनातनि।

     गुणाश्रये गुणमये नारायणि नमोऽस्तुते।

     शरणागत दिनार्त परित्रापरायाणे।

     सर्वस्यार्तिहरे देवी नारायणि  नमोऽस्तुते।।

     माताजीऽऽ कृपाऽऽ, कृपाऽऽ  

           माताजींचं ह्रदय  भरून आलं  त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्यांनी आशीर्वाद दिला

              क्रमशः
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख

!!!  सारदामाता  !!!

                   भाग – ३४

                 माताजी बेंगलोरहून पुन्हा मद्रासला आल्या  दोन दिवस राहून कलकत्त्याला आल्या  त्यांच्या दर्शनाला स्वामी ब्रह्मानंद व ब्रह्मचारी आले  माताजींना नमस्कार करुन ब्रह्मानंद म्हणाले, माताजी, तुम्ही बेलूरला यावं अशी आमची इच्छा आहे राखालचे म्हणणे त्या डावलू शकल्या नाही  माताजी आपल्या लवाजम्यासह बेलूर मठात आल्या  भक्तांनी त्यांच्या दर्शनाला गर्दी केली  

         त्या इमारतीत कीर्तन सुरू होते  ऐकता ऐकता ब्रह्मानंद समाधीष्ट झाले  कीर्तन संपले तरी, ब्रह्मानंद समाधीतच असल्याचे जेव्हा माताजींना सांगितले तेव्हा त्यांनी  एका संन्याशाला मंत्र सांगून तो मंत्र राखालच्या कानात उच्चाराला सांगितले  त्याने ब्रह्मानंदाच्या कानात मंत्र उच्चारताच ते समाधीतून बाहेर आले  सर्वांना दर्शन देऊन माताजी बाग बाजारातल्या घराकडे निघाल्या

         माताजींच्या लाडक्या राघूचा विवाह निश्चित झाल्यावर, त्यांना जयरामवाटीला जाऊन तयारी करणे आवश्यक होते  त्या जयरामवाटीला आल्यावर, प्रसन्नावर तयारीची सर्व व्यवस्था सोपवली  वाजंत्र्याच्या गजरात राधूने मन्ममनाथाच्या गळ्यात वरमाला घातली  गाव जेवण झाले  इतरही कार्यक्रम संपन्न झाले  राधू सासरी निघताना, माताजींना मिठी मारून हमसा हमसी रडू लागली   माताजीही व्याकुळ झाल्या

              त्या घरात आल्यावर, एका भक्ताने त्यांच्या अनुमतीने शंका विचारली, माताजी, तुमचा प्रवास जप, तप,स्मरण करत झाला  मग राधू सासरी जाताना तुम्ही इतक्या व्याकूळ का झाल्या? निर्वीकार का नाही राहिलात?

           बेटा सर्वात विशुद्ध प्रेम म्हणजेच मातृप्रेम! ठाकूर माझ्याकडून त्या प्रेमाचा वर्षाव करवितात त्यामुळे आत्म्यीयता वाढते  केवळ राधूसाठीच नव्हे तर सर्वांसाठी प्रेम आहे माझे

        राधूला सासरी पाठवून, अभयच्या अंतिम समयी दिलेले वचन पूर्ण झाल्याचे त्यांना समाधान झाले  त्या जयरामवाटीलाच थांबल्या

         एक दिवस कलकत्त्याहून एक ब्रह्मचारीने येऊन निरोप दिला, “माताजी, रामकृष्णानंद फार आजारी आहेत  त्यांनी तुमच्या भेटीचा ध्यास घेतला आहे  सध्या उद्बोधन मध्ये ठेवले आहे “

माताजी म्हणाल्या, “जागा लहान आहे  मी तिथे आले तर त्यांना गर्दीचा त्रास होईल  मी त्यांच्या निकट आहे असे सांगा “

 ब्रम्हचारी गेल्यावर, योगिनने विचारले, “माताजी, तुमचे शशीवर इतके प्रेम आहे  तो मृत्यू शैयेवर असताना तुम्ही का नाही जात? योगिन, मला पुत्राचा मृत्यू बघवणार नाही  मला सोडून किती जण जाणार कुणास ठाऊक?”

            त्या ध्यानात असतांना, समोर ठाकूर दिसले   म्हणाल्या,  “योगेन, नरेंद्रला घेऊन गेलात  आता माझ्या लाडक्या शशीलाही नेत आहात  तुम्ही दक्षिणेश्वराला असताना आव्हान केले असता, देशाच्या काना कोपऱ्यातून मुलं आपल्या माता पितांना सोडून धावत आलीत आणि आता घेऊन जात आहात  त्यांच्या मातेचा जीव किती तडफडेल याचा विचारही तुम्हाला स्पर्शला नाही का?”

 बराच वेळ त्या त्याच अवस्थेत होत्या  रात्री त्यांना स्वस्त झोपही आली नाही

            दुसऱ्या दिवशी त्यांनी नित्य कर्म केली पण बेचैनी कमी झाली नाही  तोच एक ब्रह्मचारी निरोप घेऊन आला, “माताजी, ठाकूर समोर उभे आहेत    असे म्हणत स्वामी रामानंदांनी प्राण सोडला “

               “गेला माझा शशी  माझा कणाच मोडला  नरेंद्रच्या सुचनेनुसार त्याने दक्षिणेत जाऊन प्रचार कार्य केले  तिथली व्यवस्था मार्गी लावली  फार कष्टाळू होता माझा शशी ” त्यांनी स्वतःला सावरून दुःख गिळले

                  माताजी सासरी कामारपुकुरला आल्या  त्यांच्या दर्शनाला एक व्यक्ती येऊन म्हणाला, माताजी, मला दीक्षा द्या  इथे राहून मी सर्व तुमच्या इच्छेनुसार करेन  माताजीनी डोळे मिटले  क्षणभराने म्हणाल्या, बेटा, तू एक महिन्याने ये  आता कुठेच न थांबता ताबडतोब घरी जा  त्याने बराच प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही  तो निराश मनाने, जड अंतःकरणाने घरी आला  पाहतो तर काय ,वडील मृत्यूशयेवर   माताजींच्या बोलण्याचं रहस्य समजले

          त्या दिवशी माताजी फार अस्वस्थ होत्या  जपातही मन लागले नाही  दुपारचे जेवणही घेतलं नाही  रात्री झोपही आली नाही  दुसऱ्या दिवशी योगिन म्हणाली, “माताजी, एक दुःखद समाचार आहे “

 “होय! मला माहित आहे   माझी लली गेली हेच ना? काल ती माझ्याकडे आली होती   प्रणाम करून गेली ” अंतिम क्षणी माताजी आणि स्वामीजी म्हणतच गेली  

              माताजी म्हणाल्या, “योगिन, निवेदिता कलकत्ता साडीत किती सुंदर दिसत होती? माझी निवेदिता पूर्व आणि पश्चिम  संस्कृतीचा संगम होती  ती जणू आपला देह हिंदुस्थानात ठेवण्यासाठीच आली होती ”  

             जगध्दात्रीची पूजा झाल्यावर, सारदानंदाने माताजीला आणायला ब्रह्मचारी पाठवला   त्याच्या सोबत त्या निघाल्या  मार्गात कोआडपाडला मुक्काम केला  चहूकडे स्वदेशी आंदोलन सुरू होते  त्या मठातही चरखे, सुत कताई चालू होती  माताजी अध्यक्षांना म्हणाल्या, “केदार बाबू, ठाकूरांचे मंदिर बांधले  छान काम केले  इथे पूजा, आरती, नैवेद्य नियमित ठेवा  कर्ता करविता ठाकूरच! जे काय करायचं ते ठाकुरांचा आधार घेऊन करा    “

         क्रमशः
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख

!!!   सारदामाता  !!!

                  भाग – ३५

                अध्यक्ष केदारबाबू म्हणाले, माताजी, स्वामी विवेकानंदांच्या सूचनेनुसार हातमाग, चरखे आणले  त्यांनी निष्काम कर्म आचरण्याची प्रेरणा दिली  आज ते असते तर     ?

            अश्रू भरल्या डोळ्यांनी माताजी म्हणाल्या, निवेदिताचे उदाहरण समोर ठेवा    तिने शिक्षण क्षेत्रात फार मोठे कार्य केले आहे

             इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या तरुणांना इंग्रज कैदेत टाकून त्यांचे हाल हाल करू लागले  त्यात स्त्रिया ही होत्या  माताजींना कळल्यावर त्या व्यथित स्वरात म्हणाल्या, राणी विक्टोरिया एक स्त्री असूनही, स्त्रियावर होणारा अत्याचार कशी पाहू शकते? हे असंच चालू राहिलं तर लवकरच तिला जावं लागेल

            तेवढ्यात पोलीस आले  उपस्थित मंडळी घाबरली  परंतु माताजी निर्भीडपणे स्थिर उभ्या होत्या  त्या म्हणाल्या, आमच्याजवळ फक्त श्रद्धा, प्रेम आणि सात्विकता आहे  तुम्हाला काय शोधायच, पाहायचं ते पहा  फक्त ठाकुरांच्या प्रतिमेला स्पर्श करू नका  पोलिसांनी सर्वत्र शोध घेतला  पण काहीच सापडले नाही  नमस्कार करून निघून गेले

             यावर्षी बेलूर मठात दशभुजा देवीची पूजा करायचे ठरवले  माताजी येणार म्हणून सगळ्या मठवासीयांना फार आनंद झाला  

      तीन दिवस सोहळा सुरू होता  शेकडो भक्तांनी या प्रगट देवीचे दर्शन घेतले  काहींना दीक्षा मिळाली  विजया  दशमीच्या दिवशी बनवलेल्या देवीचे विसर्जन करण्यात आले  सर्वांना आशीर्वाद देऊन माताजी बाग बाजाराच्या घरी आल्या

            माताजींनी काशीविश्वेश्वराला जाण्याची इच्छा व्यक्त केली  सारदानंदांनी प्रवासाची व्यवस्था केली  माताजी परिवारसह बनारसला आल्या  दुसऱ्या दिवशी विश्वेश्वर आणि अन्नपूर्णा देवीचे दर्शन घेतलं  संध्याकाळी त्या रामकृष्ण सेवा आश्रममध्ये आल्या  तिथला सर्व कारभार ठाकुरांच्या इच्छेनुसार चालत असलेला पाहून, माताजींनी समाधान व्यक्त केले  आरती झाल्यावर मंदिरा बाहेर येताना म्हणाल्या, हा केदार आणि हिमालयातील केदारनाथ एकच आहे  येथे भक्ती भावाने केलेला नमस्कार हिमालयाला पोहोचतो

       दुसऱ्या दिवशी सारनाथला सर्वजण गेले  एक आठवड्यानंतर त्या कलकत्त्याला कांही दिवस थांबून जयरामवाटीला गेल्या

         भक्तांच्या, शिष्यांच्या आग्रहाने माताजींना कलकत्त्यात यावे लागले  त्यांनी खूप विचार केला व केदारला ( केशवानंद) ला पत्र पाठवले  तुम्ही जर कोआळपाड्याला घर बांधून दिले तर, तिथेच राहिन  जयरामवाटीला माझ्या भावाचा परिवार वाढल्यामुळे, तिथे राहणे मला योग्य वाटत नाही  पत्र हाती पडताच  केशवानंदाना खूप आनंद झाला  आणि लगेच ते कामाला लागले

             जगध्दात्रीची पूजा पंधरा दिवसावर आल्याने त्या जयरामवाटीला आल्या  त्यांच्या सूचनेनुसार पूजेची तयारी झाली  पण मुख्य पुजारी आजारी पडल्यामुळे त्याला पूजेला येणे शक्य नव्हते, म्हणून कोओलपाड्याला कळविले  एक ब्रह्मचारी आनंदाने तयार झाला  

           माताजींना कलकत्त्याला नेण्यासाठी सारदानंद जयरामवाटीला आले असता, माताजींना खूप आनंद झाला  म्हणाल्या,  माझ्या मनात शरत् जगध्दात्री आणि दुर्गा पूजा करता कोओलपाड्याला नवे घर उभारण्यासाठी जमीन विकत घ्यावी असे आहे  देवीच्या नावे ट्रस्ट करून त्यावर बेलूर मठाचा अधिकार दाखवा  ठीक आहे  दोन दिवसात हे काम उरकतो  पण तुम्ही कलकत्त्याला यायला पाहिजे    चालेल  

             क्रमशः संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख

       

सारदामाता चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading