
रामदास स्वामींच्या शिष्यांना माताजी म्हणाल्या, रामदास स्वामी बद्दल जाणण्याची उत्सुकता आहे शिष्य म्हणाला, ज्या कार्याचा रामकृष्ण परहंसांनी ध्यास घेतला होता, तेच कार्य माझे स्वामी करीत होते मीही समाज प्रबोधन करण्यासाठी हिंडतोय शिष्य निघून गेला नावेतून माताजी…………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! सारदामाता !!!
भाग – २६
स्वामी विवेकानंदाचे न बोललेले पुढचे शब्द माताजींना कळले त्यांचे हृदय भरून आलं म्हणाल्या, नरेन, हे काय बोलतोस? मातेसमोर असं बोलतांना तुला काहीच वाटले नाही? माताजी, वाईट वाटून घेऊ नका तुमचा आशीर्वाद मला नक्की परत आणेल माताजींनी जाणले ठाकुरांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार परदेशात व्हावा या उद्देशाने नरेन निघाला आहे त्यांनी “तुझे मनोगत पूर्ण होतील ” असा आशीर्वाद दिला
वराह नगरातील जागेत कसलीच सोय नव्हती पैशाअभावी खाण्याचे हाल सुरू होते भिक्षा मिळणेही दुरापास्त झाले नेमके त्याचवेळी माताजींच्या पोटात दुखू लागले त्यांना आवेचा त्रास सुरू झाला शिष्यांनी त्यांना बलराम बाबूच्या घरात ठेवले संन्याशी शिष्य तीन दिवस तहानभूक विसरून साधना करीत होते ती मुलं तरुण होती चौथ्या दिवशी त्यांची भूक इतकी वाढली की साधनेत एकाग्रता होत नव्हती आपापसात चिडचिड करू लागले निरांजन म्हणाले, आज भिक्षेसाठी बाहेर जायचे नाही ठाकुरांचे नाव घेत पडून राहिलो तर, बघूया भूक भागते का?
सर्वांना पटले सर्वजण डोळे मिटून साधना करू लागले काहीच वेळात दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला योगानंदाने दरवाजा उघडला तर, समोर गोपाल मंदिरातून आलेला मनुष्य हातात प्रसादाचे ताट घेऊन उभा होता योगानंदाजवळ ताट देऊन तो मनुष्य निघून गेला सर्वांनी त्या रात्री तीन दिवसांचा ‘उपवास’ प्रसाद ग्रहण करून सोडला त्या सर्वांनी रामकृष्णांना नमस्कार करून, मनात आलेल्या किल्मीषाबद्दल क्षमा मागितली गार वाऱ्याची झुळूक त्यांना स्पर्शून जाताच त्यांचे समाधान झाले
बाबुरामच्या घरी माताजींना आणल्यावर, डॉक्टर उपायांनीही त्यांना बरे वाटेना गोलप म्हणाली, माताजी, तुम्ही जयरामवाटीला जावं तिथली मोकळी हवा आणि आईच्या प्रेमाने तुमची तब्येत सुधारेल
माताजी बैलगाडीने जयरामवाटीला आल्या खाण्यापिण्याचे पथ्य, आईचे प्रेम माताजींची प्रकृती सुधारली जगध्दात्री देवीची पूजा एक महिन्यावर आल्यामुळे त्या पूजाच्या तयारीला लागल्या अलीकडे शामसुंदरीची तब्येत साथ देत नव्हती एके दिवशी सारदानंद आले माताजींना खूप आनंद झाला म्हणाल्या भूक लागली असेल पाय धुऊन थोडसं खाऊन घे मातेचे ओतप्रोत प्रेमाने भरलेले शब्द ऐकून, त्याचं मन भरून आल या केवळ माता नसून, जगन्माता आहेत, ते मनोमन म्हणाले
जगध्दात्रीची पूजा संपन्न झाली एके दिवशी एक स्त्री आली म्हणाली, मी संसार तापाने अतिशय त्रस्त आहे जप करताना मन एकाग्र होत नाही या परिस्थितीतून माताजीच मुक्त करतील या आशेने आले जेवण झाल्यावर ती स्त्री सांगू लागली
माताजी, दिवस रात्र जिभेवर रामनाम असतं पूजा करण्यात बराच वेळ घालवते पण दुःख कमी होत नाही माताजी प्रेमाने तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाल्या, “बेटी, परमेश्वराची भक्ती केल्याने दुःख दूर होते असं सर्वांनाच वाटते परंतु दुःख ही सुद्धा त्याचीच कृपा असते बेटी, आपण आपलं दुःख उगाळत बसतो पण या जगात असा कोण आहे ज्याला दुःख भोगावे लागले नाही देवादिकांनाही सुटले नाही बेटी, दुःखाचा पहाड न बनवता निग्रहाने उभी रहा ” त्यांच्या प्रेमळ, दृढ शब्दांनी तिचं तडफणारं मन शांत झालं दोन दिवस राहून ती स्री निघून गेली
भक्तांच्या आग्रहामुळे त्यांना कलकत्त्यात यावे लागले त्यांच्या राहण्याची व्यवस्था बेलूरच्या उद्यान भवनात केली गेली त्याच रात्री त्यांना पंचतप करण्याबद्दल दृष्टांत झाला त्यांनी योगिनला सांगितल्यावर, ती म्हणाली, मी पण करेन
गच्चीवर त्रिगुतीनंदाने सर्व तयारी करून दिली हे सात दिवसाचे अनुष्ठान आपल्याकडून पूर्ण होईल का? त्यांचे मन धास्तावले त्यांनी ठाकूरांचे नामस्मरण केलं तेव्हा मन शांत झालं मध्यभागी दोघीही उभ्या राहिल्या दोघींनी प्रार्थना करून जप सुरू केला सूर्यदेव माथ्यावर आला दाहकता वाढली गंगेवरून येणारा गरम वारा भर घालत होता सूर्यास्त होईपर्यंत त्या चक्रातून बाहेर येता येत नसे असा सात दिवस त्यांचा हा कार्यक्रम चालू होता दोघींचाही रंग करपून काळा झाला पण मन अपूर्व अशा तेजाने उजळून निघाले एका शिष्याने उत्सुकतेने विचारले, “माताजी, तुम्ही ठाकुरां इतक्याच श्रेष्ठ असताना, जप, तप, पंचतप कां करता?”
“बेटा जनकल्याणासाठी दुसरा कोणताही हेतू नाही ” त्या शिष्याने त्यांना भक्ती भावाने नमस्कार केला
त्या दिवशी एकादशी होती माताजी पूजा, जपजाप्य आटोपून आरामशीर बसल्या होत्या तेवढ्यात सेविकेने खबर दिली, कोणी नागमहाशय पायरीवर डोके आपटून आईऽऽ आईऽऽ म्हणत आहेत त्याचे कपाळ रक्ताने भरून गेले माताजींनी आंतरज्ञानाने सर्व जाणले त्यांना इथे घेऊन ये काहीच वेळात योगानंद बरोबर तो गृहस्थ येऊन उभा राहिला भावनावश झाल्यामुळे, थरथरत होता ते ठाकुरांचे परमभक्त होते माताजींनी त्यांचे अश्रू पुसले स्वतःच्या हाताने त्या नाग महाशयांना भरवले त्यांचे खाणे झाल्यावर, आईऽऽ, आईऽऽ म्हणत माताजींचे पाय धरले माताजींनी त्यांच्या मस्तकाला स्पर्श करून पाठीवरून प्रेमाने हात फिरवला त्याच्या कानात ठाकुरांच्या नावाचा जप सुरू केला ते शुद्धीवर आले म्हणाले, पित्यापेक्षा माताच प्रेमळ असते आणि माताजींनीही त्यांच्यावर स्वतःच्या अपत्त्याप्रमाणे प्रेम केले
क्रमशः
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख
!!! सारदामाता !!!
भाग – २७
श्यामसुंदरी आजारी असल्याचे समजताच, माताजी अक्षय कुमार सेनसह जयरामवाटीला आल्या त्यांच्यावर योग्य उपचार होताच, तब्येत सुधारू लागली शामसुंदरी एक दोन वेळा म्हणाली, “सारुबेटी, एकदा सर्व तीर्थयात्रा करायची फार इच्छा आहे पण “
माताजी म्हणाल्या, “मी करीन तुझी इच्छा पूर्ण अगऽ! पण माझ्याकडून दोन पावलेही टाकल्या जात नाही तू ठीक झाल्यावर नक्की जाऊ “
श्याम सुंदरीची तब्येत ठीक झाल्यावर, माताजी बेलूरला आल्या तिथे गोलप, योगिन, शारदानंद होते एके दिवशी दुपारी त्या पावसाची मजा पाहत उभ्या असताना योगिन म्हणाली, “माताजी, बऱ्याच वर्षानंतर मातंगीनी दुर्गादेवी पुजा त्यांच्या गावी अंटापुरला करणार आहे प्रेमानंद तुम्हाला बोलावण्याचा निरोप घेऊन आलेत “
“बेटी, दुर्गापूजा माझ्या हातून व्हावी अशी मातेची इच्छा असेल तर गेलेच पाहिजे “
दुर्गा पूजाच्या दोन दिवस आधी बैलगाडीने माताजी आपल्या शिष्यांबरोबर निघाल्या बाहेरचे निसर्ग सौंदर्य बघून हरकलेली योगिन म्हणाली, “माताजी, या निसर्गाने आपल्याला किती दिले? पण आम्ही मानव त्याचेवर अत्याचार करतो “
माताजी म्हणाल्या, “बेटी, औदार्य, सहशीलता, सहिष्णुता आणि समानता आपल्याला निसर्ग शिकवतो पण मनुष्य त्याकडे दुर्लक्ष करतो म्हणूनच स्वार्थ, द्वेष, व्यभिचार, लोभ, पापाचरण असे दुर्गुन शिरजोर झाले ते दूर करण्यासाठीच ठाकुरांनी त्यागी संघाची स्थापना केली योगानंद, शारदानंद, विवेकानंद, प्रेमानंद तेच काम करणार आहे गोलप, योगिनी तुमच्यावर सुद्धा जबाबदारी आहे त्यासाठी शारदा मठाची स्थापना होणे आवश्यक आहे त्यासाठी प्रयत्न करायला हवेत ” अशाच गप्पा गोष्टीत गाडी अंटापुरच्या घरासमोर येऊन उभी राहीली
माताजी खाली उतरताच, मातंगीनी व कृष्ण भवानी पुढे आल्या माय लेकीने त्यांचे स्वागत करून आत नेले एवढ्या थकल्या असून देखील, माताजी स्नान करून नामस्मरणाकरिता देवघरात गेल्या पलिकडच्या खोलीत नुकतीच तयार केलेली मूर्ती दाखवण्यासाठी कृष्णाभवानीने गोलप आणि योगिनला घेऊन त्या खोलीत नेले ती दुर्गेची मूर्ती माताजींची प्रतिमा असल्याचे पाहून गोलपने आश्चर्य व्यक्त केले ती म्हणाली, त्या कारागीराने माताजींना कधीच पाहिले नसताना, माताजींना दुर्गादेवीच्या रूपात साकार करणं म्हणजे दैवी चमत्कारच होता खरं आहे ठाकूर नेहमी सांगत असत, त्या सामान्य स्त्री नसून शारदा, सीता, राधा, काली मातेच्या रूपात तुमच्यासमोर आहेत त्या तुम्हा सर्वांची प्रेरणामयी माता आहे म्हणूनच त्या दुर्गा मातेच्या मूर्तीत दिसत आहे माताजींची पूजा आटोपल्यावर दोघींनी सर्व सांगितल्यावर, माताजींनी नुसते स्मित केले
दुसऱ्या दिवशी देवीला सुंदर वस्त्र अलंकारांनी सुशोभीत केले माताजींनी देवीची षौडोपचारे पूजा करून सर्वांना स्वहस्ते प्रसाद दिला देवी आणि माताजींच्या दर्शनाकरता खूप गर्दी झाली होती त्या सर्वांचा नमस्कार सुस्मित मुद्रेने स्वीकारित होत्या
माताजी दोन दिवस राहून कलकत्त्याला परत आल्या आठ-दहा दिवसांनी आईला तीर्थयात्राला न्यायचे म्हणून त्या जयरामवाटीला आल्या यात्रेची सर्व तयारी झाली त्या प्रथम बनारसकडे निघाल्या थंडीचे दिवस असल्यामुळे, आईसाठी त्यांनी गरम कपडे घेतले होते काशी विश्वेश्वराचे दर्शन झाल्यावर इतरही मंदिरात त्यांनी आईला नेले त्यानंतर श्रीकृष्णाच्या वृंदावनात आल्या तिथे जप करीत असताना त्या भावलीन झाल्यात त्या अवस्थेत त्यांना श्रीकृष्णाचे दर्शन झाले तिथे काही दिवस थांबून आईसह त्या बेलूर, दक्षिणेश्वर कालीघाटला नेऊन कालीमातेचे दर्शन घडवून मातेसह जयरामवाटीला परतल्या
माताजींनी पितळेची एक सुंदर, लोभस बाळकृष्णाची मूर्ती घेऊन ती पेटीत ठेवली होती या सर्व गडबडीत त्या पार विसरून गेल्या एके रात्री त्या झोपल्या असता, एक लहान बाळ त्यांच्या खाटे जवळ येऊन बोबड्या शब्दात म्हणू लागले, तू मला खायला देत नाहीस, पूजा करीत नाहीस, परत तसंच ठेवलं तर मी बोलणारच नाही तूच जर माझी पूजा केली नाहीस तर कोणीच करणार नाही माताजी चटकन उठल्या त्यांनी पेटीतली गोपाळाची मूर्ती काढली त्या मूर्तीची रामकृष्णाच्या फोटो जवळ स्थापना केली फुले वाहिले, म्हणाल्या, गोपाळा, माझ्यावर रुसू नकोस रोज पूजा करून नैवेद्यही देईल परत असं कधीच होणार नाही त्यानंतर पूजा करायला त्या कधीच विसरल्या नाही
भारत भ्रमण झाल्यावर, अमेरिकेत शिकागोला होणाऱ्या सर्व धर्म परिषदेत सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विवेकानंदांना जावं लागलं त्यांचं अतिशय तेजस्वी व्यक्तिमत्व, अफाट ज्ञान, प्रभावी वक्तृत्वाने सर्वांना मोहित केलं रामकृष्णाच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार, धर्माची सत्यता आणि श्रेष्ठता त्यांनी सर्वत्र प्रस्थापित केली त्यांच्या अमोघ भाषणांनं आणि तत्त्वज्ञानाने प्रभावित होऊन मार्गारेट एलिझाबेथ, साराबुल, जोसेफ ह्या तिघी भारतात आल्या विवेकानंदांनी त्यांचा परिचय माताजीशी करून दिला परधर्मी, परक्या देशातील या तरुण मुलींशी माताजी कशा वागतात या उत्सुकतेने विवेकानंद बाजूला उभे होते प्रथम मार्गारेटने पुढे होऊन माताजींना नमस्कार केला दुसऱ्या दोघींनीही तिचे अनुकरण केले माताजींनी त्यांचे स्वागत करून आनंद व्यक्त केला व आपल्याजवळ तिघींनाही बसवून घेतले हे पाहून विवेकानंदांना खूप आनंद झाला
ते परदेशात होते तरीही त्यांना रामकृष्णमठ उभारायचे ध्येय समोर होते त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले होते
क्रमशः
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख
!!! सारदामाता !!!
भाग – २८
एका रात्री नरेंद्र झोपले असता, त्यांचे समोर रामकृष्ण उभे राहिले त्यांच्या मस्तकावर प्रेमाने हात ठेवून म्हणाले, “नोरेन, बेलूरला निश्चिंत मनाने मठाचे काम सुरू कर ” तो स्पर्श, परिचित आवाज ऐकून त्यांनी डोळे उघडून पाहिले तर आसपास कोणी नव्हते भारतात परतल्यावर त्यांनी माताजींना सर्व हकिकत सांगीतली, त्या म्हणाल्या, “नरेन, ठाकूर तुझ्या कडून करवून घेणारच ” बेलूरला रामकृष्ण मठासाठी जागा मिळाली चैत्र प्रतिपदेला बांधकामाला सुरुवात झाली देखरेखीच महत्त्वाचं काम स्वामी विवेकानंदांनी विजयानंद व ब्रह्मचारी कृष्णलालवर सोपवले पैशाचा ओघ येत असल्यामुळे इमारत लवकर तयार झाली माताजी स्वतःशीच बोलल्या, इकडे तिकडे भटकणारी माझी मुलं इथे एकत्रित राहतील त्यांच्या खाण्यापिण्याची सोय होईल
विवेकानंद म्हणाले, माताजी, ठाकूरांच्या देहभस्माचा कलश आत्माराम पात्र, निलांबर बाबूंच्या घरच्या मठात आहे तो इथे आणायचा आहे ठीक आहे घेऊन ये शुभ मुहूर्तावर विवेकानंदाने आत्माराम पात्र खांद्यावर घेऊन बेलूर मठात आले स्वामी रामकृष्णाऽऽ की जयऽऽ, रामकृष्ण की जयऽ ऽ स्वामी रामकृष्ण की जयऽऽ घोषात आपल्या गुरुची मठस्थापना केली
विश्व धर्माच्या उन्नतीसाठी “महानयुग” उद्घोषित झाले विवेकानंद रामकृष्णांच्या तत्त्वज्ञानाचे प्रचारक झाले त्यांनी रामकृष्णांची मूर्ती बनवून घेतली होती काली मातेच्या पूजनाच्या दिवशी प्रतिमा आणून संकल्पित स्थानी प्रतिष्ठापना केली विवेकानंद माताजींना मठात घेऊन आले त्यांच्या आगमनाने मठाचे वातावरण आनंदमय झाले रामकृष्ण आणि माताजींच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी उसळली
दुर्गा माता की जयऽऽ, स्वामी रामकृष्ण की जयऽऽ अशा जयघोषांनी वातावरण दुमदूमून गेले गोलप माताजी जवळ घेऊन म्हणाली, माताजी, इथं शारदा मठ व्हायला हवा
विवेकानंद माताजींना नमस्कार करून म्हणाले, माताजी, शिक्षण विभागाची जबाबदारी मार्गारेट घ्यायला तयार आहे तिला ब्रह्मचर्याची दीक्षा द्यायला हवी माताजींनी शंका काढल्यावर, ते म्हणाले, माताजी, मार्गारेट जीव ओतून काम करणारी तर आहेच परंतु तिच्यात त्याग आणि निष्ठा आहे आणि कन्या शाळेसाठी जागा पण मिळाली छाऽन! विवेकानंद निघून गेले
माताजींनी मार्गारेटला मंत्रोच्चार करून दीक्षा दिली मार्गारेट ने आपले जीवन कालीमातेला अर्पण केले काली मातेला समर्पित झालेल्या मार्गारेटचे नाव बदलून भगिनी निवेदिता ठेवण्यात आले मार्गारिटला आपले बदललेले नाव खूप आवडलं
कन्या शाळेचे काम सुरू झाले निवेदिता स्त्री शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगू लागली मुलींची संख्याही वाढू लागली कित्येक वेळा मुलींचे केसही तिला विंचरावे लागत मुलींचे तिच्यावर फार प्रेम होते मधून मधून निवेदिता माताजी जवळ येऊन राही त्यांच्यात आपली आई पहात
कधी कधी माताजींना आत्मस्वरूपी लीन होण्याची तीव्र इच्छा होई हे जाणून रामकृष्ण म्हणाले, हीच योगमाया आहे हिच्या आधाराने जगून योगकर्माची पूर्ती करा असे बोलून ते लुप्त झाले माताजी स्वतःशीच पुटपुटल्या ठाकूर म्हणतात म्हणून मला उभे राहायला हवं!
क्रमशः
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख
!!! सारदामाता !!!
भाग – २९
राधा राणीला घेऊन जयरामवाटीत राहण्याचा माताजींनी निश्चय केला माताजी राधामय झाल्या होत्या
माताजी जयरामवाटीत होत्या तरी, भक्त, संन्यासी त्यांच्या दर्शनाला येतच होते
पावसाळा संपताच, शिष्यांच्या आग्रहाने माताजी कलकत्त्यात आल्या भगिनी निवेदिताने आधी तिथेच शाळा सुरू केली होती पण विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे जवळच भाड्याने शाळेकरता घर घेतले होते माताजी सोबत काका नील माधव ,भानूआत्या, सुरबाला व राधाराणी होत्या सूरबालाचे वेड तसेच होते
एक दिवस भानुआत्या म्हणाली, सारू, सुरबालेला सांभाळताना तुझी खूप दमछाक होते तिला माहेरी पाठवून दे तिला मदत म्हणून प्रत्येक भावाने वाटा उचलण्यास सांग आत्या ते सर्व स्वार्थी आहेत अभयच्या अंतिम इच्छेनुसार तिची जबाबदारी मलाच उचलणे भाग आहे पण सारु, संन्याशांचे जेवण खाणं, दीक्षा देणे, जप,साधना हे सगळं सांभाळताना
आत्या, भोग कोणाला सुटले? माझ्या देहात असलेले ठाकूरच मला मार्ग दाखवतील
माताजी कामात इतक्या व्यग्र झाल्या की, दुर्गा पुजा जवळ आल्याचेही त्यांच्या लक्षात राहिले नाही विवेकानंदांनी बेलूर मठात दुर्गा पूजा करण्याचे निश्चित केले सर्वांची अनुमती प्राप्त झाल्यावर, एकाने म्हटले, माताजींनाही दुर्गापूजा करायची इच्छा असल्याने, त्यांना कधी आणायचे? सारदानंदवर माताजींना आणायची जबाबदारी सोपवून, बाकीचे तयारीला लागले
विवेकानंद कामाची रुपरेषा सांगत होते कोणी कोणते काम करायचे ठरवून देत होते
नवरात्र सुरू झाला सगळीकडे उत्साहाचे वातावरण होतं दुर्गादेवीचे आगमन झालं दुर्गादेवीची मूर्ती माताजींची प्रतिकृती होती पूजा सुरू झाली माताजी स्वतःच्या राहिल्याच नाही पूजा पूर्ण झाली चार दिवस तिथे राहून त्या पुन्हा कलकत्याला आल्या
सुरबालाचं वेडाचे प्रमाण वाढल्यामुळे, बाकीच्या बाया आपापसात म्हणाल्या, माताजीने या मायलेकीला गावी पाठवावे देखरेखीसाठी बाई ठेवावी तो खर्च माताजींनी उचलावा माताजी ते बोलणे ऐकून अस्वस्थ झाल्या त्यांनी योगिन, गोलपला बोलावून म्हणाल्या, मी अभयला वचन दिल्यामुळे या दोघींना सोडून, मला कलकत्त्यात राहता येणार नाही
माताजी सुरबाला, राधू, निलमाधवसह जयरामवाटीला आल्या जगध्दात्रीच्या पूजेसाठी शामसुंदरी लेकीची वाट पाहतच होती ती फार थकल्या मुळे कष्ट होत नव्हते माताजींनी आईला आश्वस्त केले
इकडे स्वामी विवेकानंद भर पावसात अमरनाथ, श्रीनगरची यात्रा करून परत आले ते फार थकल्यासारखे वाटत होते सारदानंदाने चौकशी केल्यावर म्हणाले, प्रवासाच्या दगदगीने असेल थोडा आराम केल्यावर बरे वाटेल त्यांची झोप झाल्यावर नेहमीच्याच वेळेवर उठले स्नान करून काली मातेची पूजा केली जप झाल्यावर दालनात आले सर्व संन्यासी बसले होते आज त्यांच्या मुखावर वेगळेच तेज दिसत होते सर्वांनी नमस्कार केल्यावर, त्यांनी उपदेश पर भाषण केले ठाकूरांच्या प्रतिमेला नमस्कार करून उठले त्यांनी सारदानंदांना विचारले, आज तिथी कोणती आहे? चतुर्थी चार जुलै १९०२
क्रमशः
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख
!!! सारदामाता !!!
भाग – ३०
संध्याकाळी विवेकानंद नेहमीप्रमाणे प्रेमानंद, सारदानंद यांच्याबरोबर फिरून आले संध्या आरती नंतर कोणाशीच न बोलता सरळ आपल्या खोलीत गेले त्यांचा जप चालू असताना, त्यांना कसंतरी होऊ लागलं, म्हणून बिछान्यावर पडून डोळे मिटले ते कायमचेच जपमाला त्यांच्या छातीवर विसावली होती
सकाळी नेहमीप्रमाणे विवेकानंद बागेत न दिसल्यामुळे सारदानंदाने त्यांच्या खोलीत डोकावले आणि एकदम दचकले क्षणात काय झाले हे त्यांच्या लक्षात आले त्यांनी मोठ्याने आवाज दिल्याबरोबर, सर्वजण जमा झाले सर्वांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या
विवेकानंद अमर है। स्वामी विवेकानंद की जयऽऽ अशा घोषणेत शवयात्रा निघाली त्यांचं बिल्व वृक्षाचे आकर्षण जाणून, त्यांचे शव तिथे आणलं शवाला अग्नी दिला व्यथित मनाने सारे परतले त्या दिवशी कोणीच जेवले नाही
माताजींना नरेनच्या वियोगाने दुखाःच्या खाईत लोटले त्या स्तब्ध झाल्या, पण क्षणभरच! त्यांनी स्वतःला सावरले म्हणाल्या, “नरेंद्रचे माझ्यावर खूप प्रेम होतं ठाकूरांच्या हृदयात स्थान प्राप्त केले होते ठाकूरांचे विचार परदेशात पसरवले त्याच्या ऐवजी मला “
त्यांच्या बोलण्याचा आशय जाणून सारदानंद म्हणाले, “नाही नाही माताजी, असं मनातही आणू नका ठाकूर नेहमीच म्हणत, मी काहीच केलेले नाही सर्व ती ( माताजी) करणार आहे माताजी, आमच्या कडून ठाकुरांचे कार्य करवून घ्या “
दुसऱ्या दिवशी सारदानंद, योगिन आणि घरच्या मंडळी सह माताजी कलकत्त्याला आल्या बाकीच्यांना कलकत्त्यात ठेवून, माताजी बेलूरला आल्या विवेकानंदाचा रक्षाकलश आणून योग्य ठिकाणी स्थापित केला गुरु- शिष्य एकत्र आले रात्री ठाकूर नरेंद्रचा हात धरून मठात येत असल्याचे माताजींना दिसले
जयरामवाटीला महातीर्थाचे रूप आले भक्तांची संख्या वाढू लागली दूर दूरची मंडळी दर्शनाला येऊ लागली भक्त माताजींना “महाशक्ती रुपिनी” समजू लागले माताजी सर्वांची दुःख, संकटे शांतपणे ऐकून त्यांना दिलासा देत म्हणत नैराश्य टाकून घट्ट मनाने उभे राहिलात की, तुम्हाला आपोआप मार्ग दिसेल खरोखरच त्यांच्या आशीर्वादात बळ होते भक्तांची दुःख दूर होऊ लागली देवत्व आणि मातृत्व याचा अपूर्व संगम असल्यामुळे भक्तांना त्यांच्यात जगत् तारिणींचे दर्शन घडत असे
माताजी भक्तांशी अतिशय प्रेमाने बोलत प्रत्येकाला आवडणारा पदार्थ त्या आवर्जून करत आपला आवडता पदार्थ पानात बघून, समोरचा आश्चर्यचकित होत
पौषातली कलकत्त्यातील हवा चांगली असल्या मुळे माताजींना तेथे आणायचे ठरले त्यासाठी सारदानंदांनी बागबाजार येथे भाड्याने घर घेतले साफसफाई केली आणि जयरामवाटीहून माताजींना आणण्यासाठी सारदानंद विरजानंद व योगिनसह निघाले दुसऱ्या दिवशी माताजी नील माधव, सुरबाला व राधूला घेऊन बाग बाजारातल्या घरी आल्या त्यांच्या मदतीसाठी सारदानंद थांबले मधून मधून साराबुल व निवेदिताही येत असत त्यांच्या तब्येतीच्या दृष्टीने फळं, सुकामेवा आणला की त्या स्वतः न खाता निलमाधव व राधूला देत
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख


