याज्ञसेना द्रौपदी संपूर्ण भाग २, (६ ते १०)

ज्याला मुक्तीची चाड आहे त्याने नवविधा भक्तीचा अवलंब केल्यास इह लोकीचे सुखोपभोग व मृत्युनंतर परलोकी मुक्ती निश्चित मिळते. नवविधा भक्ती म्हणजे श्री दत्तप्रभुंचे स्मरण,वंदन सख्य(मैत्री) सेवन, अर्चना पुजन, दास्य, श्रवण, कीर्तन आणि सर्व( आत्म) निवेदन हे भक्तींचे नऊ प्रकार आहेत.या नवविधा भक्ती करुन महामुनी अत्री देवांना प्रिय होऊन देवपिता झालेत.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

ज्याला मुक्तीची चाड आहे त्याने नवविधा भक्तीचा अवलंब केल्यास इह लोकीचे सुखोपभोग व मृत्युनंतर परलोकी मुक्ती निश्चित मिळते. नवविधा भक्ती म्हणजे श्री दत्तप्रभुंचे स्मरण,वंदन सख्य(मैत्री) सेवन, अर्चना पुजन, दास्य, श्रवण, कीर्तन आणि सर्व( आत्म) निवेदन हे भक्तींचे नऊ प्रकार आहेत.या नवविधा भक्ती करुन महामुनी अत्री देवांना प्रिय होऊन देवपिता झालेत.

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

याज्ञसेना द्रौपदी

*द्रौपदी*

 *भागः-६*

एकदा श्रीकृष्ण सत्यभामेसह पांडवांना भेटायला वनात आले. सत्यभामेने बोलता बोलता द्रौपदीला विचारले, ‘तुझे शूर वीर पती *तुझ्या इतके अधिन कशाने आहेत?* तु कांही जादू -टोणा, कांही मंत्रसिध्दी वगैरे जाणतेस की काय? की एखाद्या विद्येन त्यांना वश केले आहेस? असा काही उपाय असेल तर मलाही सांग ना! जेणेकरुन मी माझ्या *श्यामसुंदरला* ताब्यात ठेवु शकेन. ‘

त्यावर द्रौपदी तीला म्हणाली, ‘आपण पट्टराणी, प्रियत्तमा असुनही आपण असे का विचारता?’

 द्रौपदी तीला म्हणाली, “सती साध्वी स्री ह्या असल्या कोणत्याच गोष्टींचा उपयोग करीत नाही.”

 द्रौपदीने आपल्या पतींना कसे प्रसन्न ठेवते ते सांगीतले. ती म्हणाली, “मी अहंकार, काम, क्रोधाला जवळही फटकु देत नाही. सावधपणे पांडवांची  व त्यांच्या स्रियांची सेवा करते. इर्षा न करतां मनावर ताबा ठेवुन केवळ सेवा करण्याच्या भावनेने पतींची मनं सांभाळते. कटु भाषण, असभ्य आचरण, वाईट गोष्टी टाळते. आचरण शुध्द ठेवुन त्यांच्या मनाप्रमाणे, इशार्‍यानुसार वागते.”

 “मनुष्य, गंधर्व, तरुण, धनवान, रुपवान, कसाही पुरुष असला तरी माझे मन पांडवांशिवाय दुसर्‍या कोणाकडेही आकर्षित होत नाही. पती जेवल्या शिवाय जेवत नाही. त्यांना ज्यामुळे आनंद, प्रसन्नता वाटेल असे वातावरण ठेवीत असते. ते जेव्हा बाहेर असतात तेव्हा श्रृंगार करीत नाही. नियम व व्रताचे पालन करते.त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी या देहाला यथाप्राप्त वस्रालंकाराने सुशोभीत ठेवते. त्यांचे प्रिय करण्यास नेहमीच तत्पर असते.”

 अशा प्रकारे *जी स्रीआचरण ठेवले की पती आपोआपच वश होतात.*

            क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

 *भागः-७*

 द्रौपदी पतींसोबत कशी वागते हे सत्यभामेला सांगत असतांना पुढे सांगते की, “सासुबाईंनी कुटुंबाविषयी जो जो धर्म सांगितला, घराण्याची जी माहीती दिली त्याचे काटेकोरपणे पालण करते.”

 “भिक्षा, पुजन, श्राध्द, सणवार करणे, मोठ्यांचा मान, त्यांचा आदर राखणे, जे जे धर्मविहित आहे ते सर्व सावधानतेने दिवस- रात्र करत असते.”

“नेहमी विनयाने राहुन निति-नियमांचे पालन करते.”

 “पतींच्या वरचढ कधीच होत नाही.”

“त्यांचेहून चांगले अन्न वस्रांचा उपभोग घेत नाही.”

 “सासुशी कधीही वादविवाद न करतां संयमाने राहते.”

 “सर्वांच्या आधी उठते. वडीलधार्‍यांची सेवा करते.”

“माझ्या अश्या वागण्याने सर्वजण  खुश आणि प्रसन्न राहतात.”

 द्रौपदी पुढे म्हणते, “आधी युधिष्ठीर महारांजाच्या दहा हजार दासी होत्या.”

 “त्यांची सर्व माहीती त्यांच्या नांवा रुप, वस्रासहित होती. एवढेच नव्हे तर कोण काय काम करते व ते केलं की नाही ही पण माहीती ठेवत असे. ज्यावेळी इंद्रप्रस्थात महाराज युधिष्ठीर जेव्हा राज्य करीत होते तेव्हा त्यांचे बरोबर एक लाख घोडे, व तेवढेच हत्ती होते. त्यांची देखभाल मोजदाद ठेवीत असे. अंतःपुरातील दास दासी सेवकांवर  लक्ष, त्यांची देखभाल करीत असे.”

 “युधिष्ठीर महाराजांची जमाखर्चाचा हिशोब आणि त्याचे विवरण ठेवीत असे. खजिना सांभाळणे ज्याची माहिती फक्त मला एकटीलाच होती. घरी येणार्‍यांचे अतिथ्य, स्वागत आनंदाने करीत असे. तहान भुक विसरुन रात्रंदिवस त्यांच्या सेवेत मग्न  राहत असे.”

द्रौपदी सत्यभामाला म्हणाली, “शास्रात स्रियांसाठी ज्या ज्या गोष्टी सांगीतल्या आहेत त्या सर्वांचे पालन करते. नेहमी आळस दूर ठेवुन पतींच्या अनूकुल राहते. नेहमी सत्य बोलते आणि पती सेवेत तत्पर राहते.”

“देवी सत्यभामे… अशाप्रकारे मी माझ्या पतींना वश ठेवते.”

 *आदर्श पत्नीने कसे वागावे हे द्रौपदीच्या जीवनावरुन शिकावयास मिळते.*

            क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.

*द्रौपदीः*

 *भागः-८*

 द्रौपदीमधे *क्षात्रियोचीत तेज* आणि *भक्तोचित क्षमा* या दोहींचा *संंगम* होता. ती अतिशय *बुध्दीमान विदुषी* असुन तीचा त्यागही अद् भूत होता. तीचे *पतीव्रत्य त्रिभुवनात सर्वश्रृत* होते.

 ज्यावेळी तीला भरसभेत आणले तेव्हा तीने तेथील सर्व उपस्थितांना प्रश्न केला, पांच पाडवांची पत्नी असल्यावर एकट्या युधीष्ठीराला डावावर लावण्याचा अधिकारच नाही, शिवाय स्वतः हरल्यावर द्रौपदीला डावावर लावणे म्हणजे अनाधिकार कृत्य होय. अशाप्रकारे ती अपमानित झाल्यावरही *तीचा नैतिक विजयच झाला* होता. तीची बुध्दी सर्वश्रेष्ठच ठरली होती. }कोणीही तिच्या बोलण्याचे खंडण करु शकले नव्हते.

 द्युताचे फासे पांडवांच्या विरुध्द पडले.त्याचबरोबर द्रौपदीच्या जीवनाचे फासेही उलटे पडले. *नशीबच फिरलं तीचं!*

 द्रौपदी संतापीही तेवढीच होती.ज्यावेळी पांच पतींबरोबर वनात जायला निघाली त्यावेळी  कुत्सितपणे दुर्योधन मागुन तीला म्हणाला कश्याला त्या भिकार्‍यांबरोबर जातेस? तू माझ्याजवळ राहीलीस तर तुला पर्‍याच्या गादीवर लोळविन. त्यावर ती तीव्रतेने विद्युतल्लतेप्रमाणे कडाडली, “भिकारी तूं आहेस…. हात पसरुन माझी याचना करतोस, एका विवाहितेची.

 लक्षात ठेव जेवढा माझा अपमान केला त्याच्या किती तरी पट तुला भोगुन द्यावे लागेल. ही *हाय* एका अग्नीकन्येची आहे. अरे भूमीकन्येच्या शापाने रावणाची सोन्याची  लंका देखील दग्ध झाली! आणि हा शाप तर एका अग्नीकन्येचा आहे! सांभाळ…..! तुझा सर्वनाश  अटळ आहे…! अटळ आहे!

 तीला पांच पतींपासुन पांच पुत्र झालेत.

 युधीष्ठीर पासुन *प्रतिविंध्य*,

 भीमापासुन *सुतसोम*,

 अर्जुनापासुन *श्रृतकर्मा*,

 नकुल पासुन *शतानिका*,

 आणि सहदेव पासुन *श्रृतसेन* असे धाडसी व वीर पुत्र प्राप्त झालेत.

 कांही दिवसापुर्वीच द्रौपदीच्या  ज्या लांबसडक, काळ्या कुळकुळीत केसांवर राजसूय यज्ञाच्या वेळी अवभृथ मंत्रपूत जलाच्या अभिषेकाने धुतले होते त्याच केसांना दुष्ट  दुःशासनाने भर सभेत खेचले हा अपमान ती कधीच विसरु शकली नाही. ती आग सतत ह्रदयात जळत राहीली.

 म्हणुनच तीने संधी प्रस्ताव फेटाळुन लावला होता, आणि  आपल्या  अपमानाची आठवण देऊन युध्दासाठी पांडवांना उद्युक्त केले.

 ज्यावेळी श्रीकृष्ण पांडवांचा वतीने संधीचा प्रस्ताव घेऊन हस्तीनापुरला जायला निघाला तेव्हा तीने आपले लांब सडक केस हातात घेऊन म्हणाली की, माझ्या केसांचा विसर पडु नये, याची आठवण दिली. आणि हेही सांगीतले की, जर पांडव युध्द करणार नसतील तर अभिमन्युसहित माझे पांचही पुत्र आणि  माझा वृध्द पिता कौरवांशी लढतील

 अशा प्रकारे अपमानाची ठिणगी सतत तेवती द्रौपदीच ठेवु शकते

              क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

*द्रौपदीः*

 *भागः-९*

 द्रौपदी निडर, भयमुक्त व शक्तीमान होती. संकटाचा सामना तेवढ्याच समर्थपणे  करु शकत होती. याचे उदाहरण म्हणजे एकदा आश्रमात द्रौपदी एकटीच होती. तेवढ्यात दुर्योधननाचा मेव्हणा *सिंधुराज जयद्रथ* आश्रमात आला. द्रौपदीचे लावण्य, रुप पाहून तो तीचेवर मोहीत झाला. मदान्ध होऊन तीच्या समोर आपली पापेच्छा प्रगट केली. द्रौपदीने त्याचा धिक्कार करुन त्याला ठुकरावले. आणि एवढ्या जोराने धक्का दिला की, तो कापलेल्या झाडासारखा जमीनीवर कोसळला. पण लगेच सावध होऊन बळजबरीने तीला रथात घालुन घेऊन गेला. भीम-अर्जुनाने त्याचा पाठलाग करुन त्याला तिच्यासमोर पकडुन आणले.आणी चांगलेच बुकलुन काढले. चांगला चोप दिला. शेवटी द्रौपदीलाच दया आली . आणि त्याला क्षमा करुन सोडुन द्यायला लावले.

 अशाप्रकारे द्रौपदी क्रोधाबरोबर क्षमाशीलही होती. तीचे पावित्र्य तेज अपुर्व होते. ज्या ज्या कोणी तीची छेड काढली किंवा दुर्वतन केले त्यांना प्राण गमवावे लागले. रसातळाला गेलेत. खरोखरच पतिव्रता स्रीची हाय कोणाला लागत नाही?

दुर्योधन, दुःशासन,  कर्ण, जयद्रथ,  कीचक या सर्वांचा शेवट भयानक झाला.

 महाभारताच्या युध्दात कौरवांचा जो सर्वनाश झाला त्याचे मुळ द्रौपदीच्या अपमानातच होते.

 द्रौपदी ज्योत होती,

 थरथरणारी ज्योत.

 *याज्ञसेनी…!**

यज्ञातुन उद्भवलेली ज्योत!

 थरथरणारी … !

 दाहकृ… !

 आपल्या तेजानं दुसर्‍याच्या मनात दाह निर्माण करणारी,

 स्पर्शानं पेटवणारी ही ज्योत ..!

     *याज्ञसेनी . …. . !*

               *द्रौपदी . . . . . . !*

 यज्ञ करतांना दृपदानं यज्ञात कशाची आहुती दिली होती? कोणते मंत्र उच्चारले होते? अस्मिता, अहंकार यांच्या मंत्रांनी आणि काम, क्रोध, मद, मत्सर यांच्या समिधांनी का तो यज्ञ संपन्न झाला होता?

नाही तर त्या यज्ञातुन द्रौपदीसारखी भयानक ज्योत कशाला उपजली असती?

 द्रौपदी पांच पांडवांची पत्नी!       
 पराक्रमाचा अपमान केवढ भयानक पाप असत!              
अखेरीस याज्ञसेनी द्रौपदी पांच पांडवांची भिक्षा ठरली होती.

            क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.

*द्रौपदीः*

 *भागः-१०*

 पांडवांना कुटुंब  व द्रौपदीसह हस्तीनापुर सोडुन पंधरा दिवस झाले होते. गंगातीरावरुन ब्राम्हणवृंद आणि धौम्य मुनी सह काम्यकारण्या वाटेत मुक्काम करीत करीत वाटचाल सुरु होती. एका मुक्कामात सर्वजण टिपूर चांदण्यात झोपले अससतां एकाएकी अंधार दाटुन आला. अचानक द्रौपदीला जाग आली. कशाने जाग आली याचा विचार करीत असतांनाच अंगाखालची जमीन हादरत असल्याचा भास झाला. भास कसला? खरोखरीच धरणीकंप होत होता. त्या अनपेक्षीत संकटाने द्रौपदी गोंधळुन गेली. क्षणाक्षणाला  जमीनीचे कंपन वाढतच होते. कशीतरी अंधारात चाचपडत धावतच भीभसेन जवळ गेली. त्याला धरणीकंप होत असल्याचे सांगीतल्या बरोबर तो खडबडुन उठला, त्याचबरोबर बाकीचेही पांडव उठलेत. तीथून जवळच ब्राम्हणवृंदासह धौम्य मुनी झोपले होते.

 भीमाने मुनीला आवाज देऊन विचारले असतां त्यांनी सांगीतले ही राक्षसी माया आहे. मी आतां माझ्या मंत्रसामर्थ्याने दूर करतो. मंत्रघोष सुरु झाल्याबरोबर बघता बघता काळोख नष्ट झाला. पण जे दृष्य दिसले ते भयानक होते. काळजाचा थरकाप उडवणारं होतं. ते दृष्य पाहुन सर्वजण घाबरुन गेलेत. इतकं जीवघेणं, इतकं बीभत्स दृष्य कधीच पाहिलं नव्हतं.

 हाती मशाल घेतलेला एक महाकाय राक्षस समोर उभा होता. त्याचं धिप्पाड शरीर, निखार्‍यासारखे लाल डोळे आग ओकीत होते. त्याचा अक्राळ विक्राळ जबडा कळीकाळालाही गिळु पाहत होता. डोक्यावरचे राठ केस म्हणजे एक अरण्यच भासत होतं. त्याच्या गगनभेदी विकट गडगडणार्‍या हास्याने   चराचराला कंप सुटला.

 तो *किर्मीर राक्षस*  बकासुराचा भाऊ होता. बकासुराच्या वधाचा सुड घेण्यासाठी भीमाला शोधत तो आला होता.

 दोघांचे घनघोर युध्द सुरु झाले. कोणीच हार जात नव्हते. ते भयानक दृष्य न पाहवल्या मुळे बाकींच्यांनी डोळे मिटुन घेतले होते. एकाने एकाशीच लढावे असा धर्मयुध्दाचा नियम असल्यामुळे बाकीचे असाह्यपणे पाहत राहिले. शेवटी भीमाने  त्या महाकाय सैतानाला जमीनीवर पालथे पाडले. भीमाने त्याचा गळा घोटला. तो निप्राण झाला.

 भीमाचा पराक्रम पाहुन द्रौपदीचा ऊर भरुन आला पण त्याहुन कितीतरी कष्ट झाले, ज्याक्षणी दुःशासनानं तीच्या वस्राला हातघातला त्याच क्षणी झर त्याचा बिमोड केला असता तर द्रौपदीची विटंबना टळली असती, आणि नशीबी वनवास कशाला आला असता? पण सर्वच वडीलबंंधुच्या अर्धवचनात होते ना! जर त्यांनी वचन मोडलं असतं तर द्रौपदीची विटंबना, एवढा संहार आणी महाभारत घडलच नसतं!

           क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

                         

याज्ञसेना द्रौपदी संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading