याज्ञसेना द्रौपदी संपूर्ण भाग १, (१ ते ५)

ज्याला मुक्तीची चाड आहे त्याने नवविधा भक्तीचा अवलंब केल्यास इह लोकीचे सुखोपभोग व मृत्युनंतर परलोकी मुक्ती निश्चित मिळते. नवविधा भक्ती म्हणजे श्री दत्तप्रभुंचे स्मरण,वंदन सख्य(मैत्री) सेवन, अर्चना पुजन, दास्य, श्रवण, कीर्तन आणि सर्व( आत्म) निवेदन हे भक्तींचे नऊ प्रकार आहेत.या नवविधा भक्ती करुन महामुनी अत्री देवांना प्रिय होऊन देवपिता झालेत.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

ज्याला मुक्तीची चाड आहे त्याने नवविधा भक्तीचा अवलंब केल्यास इह लोकीचे सुखोपभोग व मृत्युनंतर परलोकी मुक्ती निश्चित मिळते. नवविधा भक्ती म्हणजे श्री दत्तप्रभुंचे स्मरण,वंदन सख्य(मैत्री) सेवन, अर्चना पुजन, दास्य, श्रवण, कीर्तन आणि सर्व( आत्म) निवेदन हे भक्तींचे नऊ प्रकार आहेत.या नवविधा भक्ती करुन महामुनी अत्री देवांना प्रिय होऊन देवपिता झालेत.

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

याज्ञसेना द्रौपदी

*भागः-१*

 द्रौपदी म्हटले की, आजची नोकरीपेशा स्रीची व तीही उच्चपदस्थ स्रीची आठवण होते द्रौपदीला जसे *पांच नवर्‍यांची* आघाडी सांभाळावी लागली तसेच आजच्या नोकरीपेशा स्रीचीश्रस्थिती आहे. तीलाही स्वतःचा नवरा, आॅफीसमधील मॅनेजमेंट, सॅंक्शनींग आॅथार्टी, सायनिंग आॅथार्टी, बाॅस, स्टाॅफ अशा वेगवेगळ्या आॅथाॅटींजना तोंड द्यावे लागते. त्यांचा सामना करावा लागतो. म्हणुनच मला द्रौपदी जवळची वाटते.

 पांचाल देशाचा *राजा द्रुपद* यांची द्रौपदी ही अयोनीज कन्या. तीची उत्पत्ती *यज्ञवेदीपासुन* झाली म्हणुन तीला *याज्ञसेना* म्हणत. तीच्या शरीरातुन कमळाचा सुगंध निघे. तो एक कोसापर्यत पसरत असे. ती कृष्णवर्णीय असलेमुळे *कृष्णा* सुध्दा म्हणत. तीचे जीवन तीच्या लग्नापर्यत सुखासीन गेले.

 राजकन्या असलेमुळे अभाव असण्याचा प्रश्नच नव्हता.  तीच्या जन्माचेवेळी आकाशवाणी  झाली. त्यानुसार तीचा जन्मच मुळी क्षत्रियांंचा संहार करण्यासाठी आणि कौरवांचा नाश करण्यासाठी झाला. पुर्व जन्मात तीं शंकराची निःस्सीम भक्त होती.शंकराने तीला प्रसन्न होऊन *ह्या जन्मी पांच पती मिळतील* असे प्रसन्न होऊन वर दिला.

 पांडव जेव्हा लाक्षागृहातुन वाचले तेव्हा ते वेश बदलुन फिरत असतांनाच द्रौपदी स्वयंवर असल्याचे पांडवांना कळले आणि त्यानुसार ते स्वयंवराच्या ठीकाणी पोहचले.

 द्रौपदी असामान्य म्हणुन तीचे स्वयंवरही असामान्य ठेवण्यात आले.द्रुपद राजाने मत्सयंत्र उभारुन महादुघट “पण” ठेवला होता.खाली सुवर्ण पात्रात पाणी, वर *मत्स्ययंत्र फिरते* ठेवले. त्या मत्स्याच्या डोळ्याचे प्रतिबिंब खालच्या सुवर्णपात्रात बघुन लक्षभेद करायचा.

 देशोदेशीचे राजे, महाराजे उपस्थीत होते. बर्‍याच राजांनी प्रयत्न केला पण कोणीही मत्स्याच्या डोळ्याचा भेद ते शकले नाहीत. शेवटी कर्ण उठला. त्याने बाणाने लक्ष साधले. तो बाण सोडणार एवढ्यात त्याचे कानावर शब्द आदळले की, “मी सुतपुत्राला वरणार नाही.” त्याने संतापाने, अपमानाने बाण तसाच टाकुन सभामंडपातुन निघुन गेला.

 त्यावेळच्या परिस्थीतीनुसार द्रौपदीचा *बाणेदारपणा* लक्षात येतो, ही सामान्य बाब नव्हती. ब्राम्हणवेशातील अर्जुन उठला वत्याने लक्षभेद करुन “पण” जिंकला. त्यावेळी तीथे कृष्ण सुध्दा उपस्थीत होते. तेव्हापासुनच पांडवांची व कृष्णाची जवळीक झाली. पांडवांची आई कुंती ही श्रीकृष्णाची आत्या.

 अर्जुनाने “पण” जिंकल्यामुळे द्रौपदीसह पांचही पांडव त्यांच्या निवास स्थानाकडे निघालेत.

         क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

*द्रौपदीः-*

 *भागः-२*

 पांचही पांडव द्रौपदीसह निवासस्थानी आलेत बाहेरुनच आईला सांगितले की, आई आम्ही *भिक्षा* आणली आहे. कुंतीने न पाहताच आतुन आज्ञा केली, *सर्वानी समान वाटुन घ्या*. ही झाली आख्यायिका. वास्तविक कुंती फार *दूर्ददर्शी होती*. कुंती तोंडातुन निघालेला शब्द प्राणपणाने जपत असे. जेव्हा तीला समजले की, मुलांनी एका कन्येला आणले आहे. तीने विचार केला, जर बोलणे मागे घेतले तर असत्याचा दोष लागेल आणि आपण सांगीतल्या प्रमाणे मुलं वागली तर सनातन मर्यादेचि लोप होईल. शिवाय तीने मुलांच्या डोळ्यात द्रौपदी बद्दललची अभिलाषा दिसली. *तीला तीच्या मुलांची एकी भंग होऊ द्यायची नव्हती.*

 पांच भावांचे एकाच मुलीशी लग्न लागलेले कोणी ऐकले किंवा पाहिलेले नव्हते त्यामुळे कुंती कर्तव्यमुढ झाली. शेवटी सदैव धर्माचे पालन करणार्‍या धर्मराज युधीष्ठीराला विचारले. त्याने सांगीतले की, कर्तव्यनिष्ठ राहुन सत्याची कास सोडू नकोस. दृपद राजाने हरकत घेतल्यावर वेदव्यासांनी  द्रौपदीची पुर्व जन्माची कथा सांगीतली की! भगवान शंंकराच्या वरामुळे पांच पांडवाचा विवाह द्रौपदीशी होईल.अशा प्रकारे *द्रौपदीचा विवाह पांच पांडवाशी झाला*. आणि कुंतीच्या सत्यनिष्ठेचा विजय झाला.

 आजच्या स्रीचीही परिस्थीती कमी अधिक प्रमाणात द्रौपदी सारखीच आहे. तीलाही नोकरीतील वेगवेगळ्या संबंधीतांचे मन राखावे लागते. जसे द्रौपदीला पांच पतींची मन राखावी लागली होती

 द्रौपदी उच्च कोटीची पतिव्रता आणी भगवद्भक्त होती. ती कृष्णाला आपला रक्षक, हितैषी आणी परम आत्मीय मानत असे. कृष्णाची सर्वव्यापकता, सर्वशक्तिमत्तावर तीचा पुर्ण विश्वास होता. तीची कृष्णचरणी अविचल प्रिती होती.

 धन्य त्या द्रौपदीची पांच भिन्न स्वभावाच्या पतींना संघटीत ठेवणे तीच जाणे.

 द्रौपदीला पांचही पतींसोबत दोन महिने सहा दिवस प्रमाणे एक निष्ठेने प्रत्येक पतीबरोबर व्यतीत करण्याचे ठरवुन दिले. हा काळ पुर्ण आणि पुर्ण त्याच पतीबरोबर राहायचे होते. जर एखाद्या कडून या नियमाचा भंग झालाच तर त्याला बारा वर्षाची शिक्षा म्हणुन निघून जावे लागेल असे ठरवून दिले.

           क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.

*द्रौपदीः-*

*भाग:-३*

 पांडव हस्तीनापुरला परत आलेत. तेव्हा त्यांना *खांडववनाचा उजाड, ओसाड* भाग देण्यात आला. पांडवांनी त्या वनाचे नंदनवन केले आणि *इंद्रप्रस्थ* नांवाने नगरी वसवली. मोठमोठे राजवाडे, इमारती  बांधल्यात. मयसभा बांधली. बाजारपेठ,अनेक व्यवसाय  वृध्दींगत केलेत. पांडवांनी इंद्रप्रस्थ राज्य स्थापन केलेले व त्यांचे आनंदाने राहणे

 कौरवांच्या डोळ्यात खुपायला लागले.  धर्माप्रमाणे युधीष्ठीर  द्युत खेळण्यास नकार देऊच शकत नाही हे माहीत असलेमुळे शकुनी आणि दुर्यौधनाने कट  करुन *युधीष्ठीराला द्युताचे आमंत्रण दिले.*

 द्युतामधे युधिष्ठीर सोने, जडजवाहर, दासदासी, राज्य,  स्वतःसह चारही भाऊ आणी शेवटी द्रौपदीसह सर्व हरला, सर्व गमावुन बसला.द्रौपदी कौरवांची दासी झाली.दासी म्हणुन जेव्हा तीला राजसभेत बोलावण्यात आले तेव्हा तीने विकर्णला विचारुन यायला सांगीतले की, *धर्मराज स्वतः हरल्यावर त्यांना काय अधिकार आहे  मला पणाला लावण्याचा?* असा कणखरपणे, बाणेदारपणे, परखडपणे फक्त द्रौपदीच विचारु जाणे.

 त्या स्वाभिमानी विकल असहाय्य स्रीने प्रत्येकाला त्यांच्या योग्यता व जेष्ठतेनुसार आव्हान केले पण सर्वजण मुग गिळुन खाली मान घालुन बसलेत. जेव्हा दुःशासनाने तीच्या वस्राला हात घातला, तीचे वस्रहरण करण्यास सुरुवात केली आणि दरबारातील  भीष्म, द्रोण वगैरे महानुभवांनाही हा प्रकार रोखण्यास असमर्थ आहे! असे पाहिल्यावर तीने स्वतःच्या लज्जारक्षणार्थ अत्यंत तळमळीने, कळवळ्याने, अंःतकरणापासुन करुण आर्त स्वरात *भगवान श्रीकृष्णाचा धावा केला.*

 दुर्योधनाने दुःशासनाला तीला भर सभेत आणायचा हुकुम केला. त्यावेळी ती *रजःस्वला*  एक वस्रा होती, तेव्हाही तीने बराच विरोध केला पण तीची विटंबना करुन तीचे केस पकडुन दुःशासनाने भर सभेत ओढत आणले. *सभेमधे भीष्म, द्रोणाचार्य, विदुर, कर्ण स्वतः धृतराष्र्ट इत्यादी मोठमोठे रथी-महारथी उपस्थीत होते*, पण राजनिष्ठेमुळे कोणीही या कृत्याचा प्रतिकार केला नाही.

 भक्तवत्सल कृष्णाने द्रौपदीची  आपल्या भक्ताची लाज राखली. *धन्य ती भक्तवत्सलता!*

 खर्‍या अंतःकरणापासुन मारलेली हाक व्दारकेत असलेल्या दयासिंधु कृष्णापर्यंत पोहचली. तात्काळ धर्मरुपाने द्रौपदीच्या वस्रात लपुन त्याने तीची लाज राखली, वाचवली. कृष्णाच्या कृपेने द्रौपदीची साडी अनंत झाली. बघता बघता वस्रांचा ढीग जमा झाला. दुःशासन तीचे वस्र खेचतच होता परंतु वस्र संपता संपत नव्हते. दुःशासनाच्या प्रचंड भुजा थकल्या, तो थकला, घामाघुम झाला पण साडीचे टोक काही त्याचे हाती आले नाही. शेवटी लज्जीत होऊन निघुन गेला.

          क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.

*द्रौपदीः*

 *भागः-४*

 धर्मराज युधीष्ठीराने *राजसूय यज्ञ* केला. सर्व देशोदेशीच्याराजांना आमंत्रित केले. तसेच कौरवांना सुध्दा. भीष्म, द्रोणाचार्य, विदुर, दुर्योधन कर्ण, शकुनी आदी रथी महारथी यज्ञात उपस्थित होते.दुर्योधनाला तेथील वैभव, *मयसभा* पाहुन मत्सर जागृत झाला. त्यात मयसभेत त्याची फजीती झाली, त्यावेळी द्रौपदीने त्याला म्हटले की,” *अंध पित्याचे पुत्र सुध्दा अंध आहेत की काय?* “

हा अपमान घेऊनच दुर्योधन हस्तीनापुरला परतला. शकुनीचे व दुर्योधनाचे कट कारस्थान सुरु झाले. *शकुनीला द्युताचे फासे वश असल्यामुळे* त्याने पांडवांना  द्युत खेळण्याचे आमंत्रण दिले.

 द्युतामधे युधीष्ठीर सर्व हरला.धृतराषट्राने सर्व परिस्थितीचा विचार करुन द्रौपदीला वर मागण्यास सांगीतले. त्याप्रमाणे तीने सर्व पतींची दास्यातुन मुक्ती मागीतली. तीला पुनः वर मागण्यास सांगीतले असतां, तीने स्पष्ट दिला व कणखरपणे, बाणेदारपणे सांगीतले की, माझे पती त्यांच्या शौयाने, सामर्थ्याने आपले राज्य स्वतः परत मिळवतील. अशा विकल आणि दयनीय परिस्थीततही तीचा आवेश, निष्ठा, क्षात्रतेज अलौकीक होते. तीने दिलेले उत्तर तीला शोभेसे होते. त्यावरुन तीचा निर्लोभीपणा, धर्मप्रेम स्पष्ट दिसते.

 अशा विपत्सागरात बुडत असलेल्या नौकाहीन बुडत असलेल्या पांडुपुत्रांना *तारणारी नौका ठरली द्रौपदी!* खरोखरच धन्य आहे द्रौपदी.

 द्रौपदीचे तेजस्वी व कणखर उत्तर ऐकुन धृतराष्टाला आनंद झाला आणी पांडवांचे राज्य त्यांना परत केले. अर्थातच ही गोष्ट दुर्यौधनादी लोकांना पटली नाही.आणि शकुनीने व पुनः कपट करुन पांडव इंद्रप्रस्थाकडे परतत असतांना  अर्ध्या वाटेतुनच युधीष्ठीराला परत द्युत खेळण्यास पाचारण केले. शकुनीजवळ जयद्रथाच्या हाडांपासुन बनवलेले फासे त्यालाच वश होते. त्यामुळे दुसर्‍यांदा युधीष्ठीर द्युतात  सर्व हरला. आणि ठरल्याप्रमाणे *१२वर्ष वनवास व १वर्ष अज्ञात वास* भोगायला पांडव द्रौपदीसह वनवासाला निघालेत.

            क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

*द्रौपदीः*

 *भागः-५*

 द्रौपदीसह पांडव काम्यकारण्यात वास्तव्यास होते. दुर्वासमुनी दुर्यौधनाकडे गेले असता. दुर्योधनाने त्यांची   मनोभावे खुप सेवा केली. त्यांनी प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगीतले असता, काम्यकारण्यात पांडवाकडे जाण्याची विनंती केली. त्यानुसार दुर्वासमुनी आपल्या दहा हजार शिष्यांसह पांडवांकडे आलेत. त्यांना मुद्दाम अश्यावेळी पाठविले की, पांडवांचे जेवण आटोपलेले असावे. कारण युधीष्ठीराला सुर्यदेवाकडुन एक *अक्षयपात्र* मिळाले होते. त्या पात्राने कितीही लोक एकावेळी जेवण करु शकत होते. पण अट एकच होती की, द्रौपदीचे जेवण होईपर्यंतच त्यातील अन्न अक्षय राहील. आणि हे दुर्योधनाला माहीत होते. युधीष्ठीराने अतिथीसेवेच्या उद्देशाने महर्षिसह सर्व शिष्यमंडळींना आमंत्रीत केले. पण इकडे द्रौपदीने  जेवण आटोपुन अक्षयपात्र  धुवून ठेवले होते.

 दुर्वासमुनी स्नानादी नित्यकर्म आटोपण्यासाठी शिष्यांसह गंगातीरी गेलेत. द्रौपदी अतिशय चिंतेत पडली. दुर्वासमुनी अतिशय कोपीष्ट म्हणुन प्रसिध्द. त्यांना भोजन मिळाले नाही तर ते नक्की शाप देतील.

 शेवटी तीने आर्तपणे करुणतेने कृष्णाचा धावा केला. *कृष्णच ते*. अंतर्मनाने सर्व जाणले, आणि तात्काळ तेथे धावुन आलेत. द्रौपदीला कांहीतरी खायला मागु लागले. ती म्हणाली, “अरे….! दयाघना कां असा अंत पाहतोस? मी आताच जेवण करुन अक्षयपात्र धुवून ठेवले आता कांहीच शिल्लक नाही.”

 कृष्ण म्हणाले अग मला खुप भुक लागली आहे, जरा ते पात्र दाखव तरी. द्रौपदी ते पात्र घेऊन आली. त्या *भांड्याला एक पान चिटकलेले दिसले*. तेच पान तोंडात टाकुन म्हणाले “भाजीच्या पानाने संपुर्ण जगाचा आत्मा यज्ञभोक्ता परमेश्वर लगेच तृप्त होवोत.”

 ज्यावेळी कृष्णाने तोंडात पान टाकुन तृप्तीचा ढेकर दिला,संकल्प केला, त्याच वेळी गंगातीरी दुर्वासमुनी व शिष्य पाण्यात उभेराहुन अधमर्षन करीत होते. एकाएकी त्या सर्वांना आपले पोट गच्च भरल्याची आणी अन्न गळ्यापर्यत आल्याची जाणीव झाली.

 दुर्वास मुनींनी मनोमन जाणले आणी आपल्या शिष्यासह चुपचाप निघुन गेलेत. अशाप्रकारे द्रौपदीच्या कृष्णभक्तीमुळे पांडवावर आलेले मोठे संकट टळले.त्यांना दुर्वासमुनीच्या कोपापासुन वाचवले.असे द्रौपदीशिवाय कोण करु जाणे?

           क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

                         

याज्ञसेना द्रौपदी संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading