
पलिशेटी नावाच्या इसमाने आपल्या मिरासीच्या शेतांपैकी शिवगंगेचा तुकडा मंबाजी नांवाच्या ब्राम्हणास देऊन मठ बांधुन दिला. तीथे मंबाजी राहुन लोकांना मंत्र, गुरुपदेश करत असल्यामुळे शिष्य संख्या वाढली. परंतु तुकोबांच्या मार्गाचा प्रसार झाल्याने लोक मंबाजीला सोडुन तुकोबांच्या भजनी लागल्याने त्यांचा द्वेष करुं लागला. एके दिवशी मंबाजीच्या मठातील बागेची एका म्हशीने बरीच नासधुस केली. .
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! संत तुकाराम महाराज चरित्र !!!
!!! संत तुकाराम !!!
भाग-११
पलिशेटी नावाच्या इसमाने आपल्या मिरासीच्या शेतांपैकी शिवगंगेचा तुकडा मंबाजी नांवाच्या ब्राम्हणास देऊन मठ बांधुन दिला. तीथे मंबाजी राहुन लोकांना मंत्र, गुरुपदेश करत असल्यामुळे शिष्य संख्या वाढली. परंतु तुकोबांच्या मार्गाचा प्रसार झाल्याने लोक मंबाजीला सोडुन तुकोबांच्या भजनी लागल्याने त्यांचा द्वेष करुं लागला. एके दिवशी मंबाजीच्या मठातील बागेची एका म्हशीने बरीच नासधुस केली. दुसर्या दिवशी एकादशी. दर्शनाला येणार्या लोकांना काट्यांचा उपसर्ग होऊ नये म्हणुन तुकोबांनी ती वाट निष्कटंक केली. हे पाहुन मंबाजीच्या अंगाचा भडका उडाला. त्याने एका काटेरी काडी घेऊन तुकोबाला झोडपु लागला. दहा काठ्या त्यांच्या पाठीवर मोडल्या. तुकोबा देवाचे ध्यान व तोंडाने हरीनामस्मरण करत मुकाट्याने मार खात होते. शेवटी मंबाजी थकला पण तुकोबाची शांती ढळली नाही. मंबाजीकडुन त्यांना अनेक प्रकारे उपसर्ग होत होता.
पुढे त्यांची योग्यता सर्वांना कळुन आली. रामेश्वर भट्ट सारखे त्यांचे शिष्य बनले. खुद्द शिवाजी महाराज जीव धोक्यात घालुन त्यांचे किर्तन श्रवण करण्यांस येत असे. एकदा शिवाजी महाराजांनी तुकोबांना दिवट्या, छत्री, घोडे पाठवुन त्यांना बोलावले, पण ते गेले नाहीत. तुकोबांच्या हयातीतच त्यांचे अभंग जयराम स्वामीसारखे संत आपल्या किर्तनात म्हणु लागले. हा त्यांचा मानमरातब काय कमी होता ?
तुकाराम महाराजांच्या काळी महाराष्ट सर्व बाजुंनी अवनतीच्या खड्यात पंगु होऊन दीन बनला होता. अशावेळी त्यांनी भागवत धर्माची दारे सताड उघडुन सर्व जनतेस स्थीर व धार्मिक ऐक्य उत्पन्न करुन कार्यप्रवृत्त केले.
तुकोबांनी विठ्ठल हाच गुरु मानला. त्यांचे युध्दाचे शस्र दया, क्षमा, शांती, प्रेम, नम्रता, आत्मपरिक्षण आणि परमेश्वर नामाचे स्मरण ही शस्रे वापरुन रात्रंदिवस घनघोर युध्द करुन शत्रुंना जिंकले. शत्रुला पादाक्रांत करुन इश्वराला वश केले. उपदेश कोणाकडुनही घेतला नाही. विचारशक्ती आपली असावी, गुरुचा गुलाम होऊ नये, गुरु जर परमेश्वर प्राप्तीच्या आड येत असेल तर त्याला बाजुला सारावे अशी तुकोबांची शिकवण होती. गुरुंच्या नादी न लागता जो जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, आकाशी ह्रदयात आहे अशा एका देवाची कास धरावी. तुकोबांचे परमगुरु राघव चैत्यन्य, ज्यांचे पुर्वाश्रमीचे नांव राघव होते.
तुकोबांच्या काळी गुणी माणसांचे पीक होते. त्यांच्या संपर्काने कांही माणसे संत झालीत, त्यातील मुख्य तीन संत- रामेश्वर भट,ज्याने सुरुवातीला तुकोबांना छळले, वह्या डोहात बुडवल्या, २- कचेश्वर ब्रम्हे, आणि तिसरी बहिणाबाई. रामेश्वर भटाने तुकोबांना छळल्यामुळे अंगाचा दाह होऊ लागला तेव्हा त्याला पश्चाताप होऊन डोळे उघडले, तुकोबांची योग्यता कळली, त्यामुळे त्यांना शरण जाऊन त्याच्या ठायी असलेला ज्ञातीचा व वर्णाचा अभिमान नष्ट होऊन तुकोबांचे शिष्यत्व पत्करले.
कचेश्वर ब्रम्हेचा जन्म वैदिक कुळात झाला. तुकोबांच्या अनुग्रहाने तो किर्तन करु लागला. पुढे त्यांचा तो मोठा भक्त झाला.
बहिणाबाई अकरा वर्षाची असतांना जयरामस्वामींच्या किर्तनांत तुकोबांचे वेदांत्यपर अभंग ऐकुन त्यांच्या दर्शनाचा ध्यास लागला असतां, तुकोबांनी तीला स्वप्नात दर्शन देऊन उपदेश केला.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
संत तुकाराम
भाग-१२
तुकोबांच्या शरीरावर अध्यात्मीक तेज इतके झळकत होते की, लोकांना त्यांच्यात पांडुरंग दिसत असे. बहिणाबाई आदी मंडळी मंबाजीच्या मठात उतरली ह्या मंडळीस त्याने आपल्या पाशांत ओढण्यासाठी तुकोबाविषयी मन कलुषित करण्याचा खुप प्रयत्न केला. रामेश्वर भट्टानाही भूरळ घालण्याचा प्रयत्न केला, परंतू ही मंडळी फसली नाही. त्यामुळे मत्सराग्नी भडकला. त्याने बहिनाबाईची गाय कोंडून सोट्याने बडविले. ते वळ तुकोबाच्या पाठीवर उमटलेले दिसल्याने त्यांच्याविषयीची निष्ठा अधिकच बळावली. स्रीया आणि शुद्र ह्यांना अधिकार नाही, परंतु शुद्र समजल्या जाणार्या तुकोबांच्या वेदात्तर अभंगानी मंबाजीसारख्या ब्राम्हणाच्या फुसलावणीस न भुलता तुकोबाच्या चरणी लीन झालेत. अधिकार ही बाब परमेश्वराच्या हाती आहे. ही अधिकाराची गोष्ट जातीवर किंवा स्रीपुरुष भेदावर अवलंबुन नाही.
रामेश्वर भट्ट, कचेश्वर ब्रम्हे आणि बहिणाबाई या तिघांनाही त्यांच्या सात्वीक वृत्ती व आध्यात्मिक तेजजाने त्यांच्यात प्रत्यक्ष विठोबा दिसत असे. महाराष्टात वारकरी संप्रदायने भक्तीमार्गाची सुंदर व भव्य इमारत उभारली आणि तुकोबांनी त्यावर कळस चढविला.” *तुका झालासे कळस* ” प्रमाणे ते स्वतः कळस झालेत.
भगवंताने मानवांच्या परम कल्याणासाठी प्रगट केलेला धर्म म्हणजे *भागवतधर्म*. भागवतधर्म इतर धर्मापेक्षा अधिक व्यापक व दुरवर पोहोवचणारा आहे. यात जातपात, भेदभाव, धर्मभेद, स्री-पुरुष असा संकुचित भाव या धर्मात नाही. या धर्माची परंपरा फार जुनी आहे. वेदकालापासुन उपनिषधे, पुढे महावीर, बुध्द, चक्रधर, ज्ञानदेव, नामदेव, नानक, तुकाराम, त्याचप्रमाणे जीसस, महंमद, राजमोहन, महर्षि देवेद्रनाथ, केशव चंद्रसेन, माधवराव रानडे वगैरे मंडळींनी एका सुत्रात गोवलेली आहे. या सर्वांच्या चळवळींचा भागवत धर्मात अंतर्भाव होतो.
पंढरीची वारी, एकादशी व्रत, विठोबाच्या मुर्तीचे पुजन, भजन किर्तन, हा तुकोबांचा मार्ग होता. शुध्द भाव, चित्त निर्मळ ठेवणे, हीच मुख्य गोष्ट मानीत. त्याचबरोबर दया, क्षमा, शांती धरावी, परोपकारी वृत्ती, अनाथांना सहाय्य, परद्रव्य, परनारीची अभिलाषा न ठेवणे, परनिंदा, द्वेष, आकस न करतां व्यवहारात चोख असावे, अशाप्रकारचा उपदेश करीत असे. देवाचा सहवास हवा असेल तर एकंदर वर्तन सत्याला धरुन पवित्र ठेवले पाहिजे. असा अमृताचा स्राव करणारे अभंग त्यांच्या वाणीतुन स्रवत असे.
विठोबा हे तुकोबांचे कुलदैवत. त्याची भक्ती करतां करतां परमार्थ मार्गात पाऊल पुढे टाकुन विठोबा म्हणजेच सर्व व्यापक विश्वंभर, अशी भावना ठेवुन त्यांनी साधनमार्ग चालु ठेवला. तुकोबांचा धर्म हा प्रेमाचा धर्म होता. वासना जिंकणे, मन ताब्यात ठेवणे, इंद्रिय दमन ह्या गोष्टी द्दृढ अभ्यासाशिवाय साध्य होत नाहीत.
तुकोबांना मुक्तीपेक्षा परमेश्वराच्या सेवेची व संतसमागमाची असल्यामुळे त्यांचा कल सामुदायीक धर्माकडे असुन आपण तरुण इतरांना तारावे, एकमेकांच्या समागमे वैकुंठ गाठावे, हेच त्यांचे ध्येय असल्यामुळे भजन, किर्तन, सत्संग अशा साधनाची त्यांना आवड होती. ते स्वतः नम्रतेची मुर्ती असुन जगन्मान्य पुरुष होते. वासना जिंकणे, मन ताब्यात ठेवणे ह्या गोष्टी द्द्ृढ अभ्यासाशिवाय होऊ शकत नाही, म्हणूनच देवाचे सहाय्य मागुन संसाराचा मार्ग आक्रमत होते.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
संत तुकाराम
भाग-१३
तुकोबांच्या अश्या निस्पृह वृत्तीमुळे पती पत्नीत नेहमी वाद होत असे. रामेश्वर, मंबाजी वगैरे धर्ममार्तडांनी त्यांचा छळ केला, कारण तुकोबा निर्जिव गतानुगतिक नसुन जागृत वृत्तीचे जिवंत व तेजस्वी सुधारक होते. त्यांच्या उमेदिच्या दिवसांत दुष्ट चालींचा व नाना प्रकारच्या दांभिक आचारांचा तिव्र शब्दात निषेध करुन असल्या चालीरिती विरुध्द बंडाचा झेंडा उभारला. त्यांचा देव फक्त विठोबा. अडाणी लोकात भूताखेतांच्या पुजेवर, शुद्र देवभावनेवर त्यांनी ताशेरे झाडलेत.
वृक्षाचा कोमल अंकुर कठीण जमीनीतुन, पाण्याचा झरा जसा खडक फोडून बाहेर पडतो, त्याप्रमाणे तुकोबांसारख्या संताच्या ह्रदयात असणारा सद्विचार आणि सद्भावनांचा झरा खळखळ पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे बाहेर आल्याशिवाय राहु शकत नाही, ही एक निसर्गाची किंवा परमेश्वराची योजनाच असते. तुकोबांनी जे काही केले तेजनहित लक्षात घेऊन त्यांनी शुध्द मार्गाकडे वळावे म्हणुन! स्वतःची किर्ति किंवा मान सन्मानवाढवण्यासाठी नव्हे! बाह्य उपचारांचा त्यांना तिटकारा होता. दांभिकपणावर त्यांनी कोरडे ओढलेत.
त्यांच्या ठायी जीवाचें जीवपण व आत्म्याचे आत्मपण ही दोन्ही एकाच वेळी दिसुन येतात. जीव परमात्म्याचे ऐक्य होऊन त्यांना स्वानंदप्रतिती होऊ लागल्यावर चित्सागरावर खेळणार्या आत्मस्वरुपाच्या व जीव स्वरुपाच्या सर्व कृती त्यांच्या अभंगातुन व्यक्त होत होत्या.
देवाबद्दल संत्कल्पना, त्यावर अखंड विश्वास अकृत्रीम व निरतिशय प्रेम, म्हणजेच धर्माचा पाया हीच निष्ठा ठेवुन यातील कर्मयोग, ज्ञानलालसा अवघा संसार या निष्ठेला जागुन पावन करावा हेच त्यांचे साधन होते. ज्यांच्या साध्याभोळ्या पण भावनोत्कट भक्तीरसाने संपुर्ण महाराष्ट आपलासा केला, ज्यांनी आपल्या शिकवणीने भक्तीभावा विषयक तत्वज्ञानांत फार मोठी भर घातली. संतशिरोमणी तुकाराम महाराज स्वतः महान भगवद् भक्त होते. शरण आलेल्याची देव उपेक्षा करत नाही ह्यावर त्यांची पुर्ण श्रध्दा होती.
ते नेहमी आत्मपरिक्षण करुन दोषांचा परिहार व्हावा, मन शुध्द व पवित्र राहावे म्हणुन सतत जागृत असत. नामस्मरण करण्यास मन आधी शुध्द लागते. औषध घेऊन पथ्य पाळले नाही तर जसा औषधाचा गुण येत नाही तसेच स्वैर आचरण करुन नुसते देव देव केल्याने काहीच उपयोग होत नाही. मठ स्थापणे, शिष्यशाखेचा विस्तार करणे अशा उपाध्या त्यांनी कधीच मागे लावुन घेतल्या नाहीत.
मेघवृष्टीप्रमाणे उपदेश परमात्म्यावरच केला. ते पराकोटीचे निस्पृह होते. त्यांनी वाईट मार्ग सोडुन धर्माने चला, हरिनाम घ्या, हे लोकांजवळ मागीतले तर देवाजवळ प्रेम, भक्ती मागीतली. शिवाजी महाराजांनी पाठविलेले दिवट्या, छत्री, घोडे, मोहरांनी भरलेले ताट त्यांचे घरी अठराशे दारिद्र्य असुन सुध्दा त्यांनी परत पाठवले.
इतकी निःस्पृहता जगांत तुकाराम महाराजांशिवाय कोणाजवळ असु शकते?
क्रमशः
संकलन -मिनाक्षी देशमुख
संत तुकाराम
भाग-१४
तुकारामांची भक्ती एवढी जावल्य ठरली की, प्रत्यक्ष परमेश्वर त्यांच्या घरी आलेत. सुदाम्याप्रमाणे ते गरीब असल्याने पाण्यांत कण्या शिजवून *फाल्गुन शुध्द दशमीला* जेऊ घातले. तेव्हापासुन देहुला या दिवशी कण्याचा नैवद्य दाखवण्याची प्रथा देवाच्या भेटीच्या स्मरनार्थ पडली आहे. जीवभाव देवाला अर्पन करुन संबंध आयुष्यभर परमेश्वराची आराधना, परमार्थिक धनाची कमाई तुकोबासारख्या साक्षात्कारी संताने आपल्या आध्यात्मिक साठा आपल्यासाठी ठेवला आहे.
एका एकादशीला जिजाईला जवळ बोलावुन तुकोबांनी अकरा अभंगांनी परमार्थाचा उपदेश करुन म्हणाले, “मानवदेह हे शेत आहे, या शेताची प्राप्ती होऊन जे भक्की करतात त्यांना ज्ञानरुपी चांगले पीक येते. याचा ८०% सारा द्यावा लागतो, न दिल्यास काळाला जबाब द्यावा लागेल. पांच ज्ञानेंद्रिय आणि पांच कर्मेंद्रिय! यापैकी १०% सारा राबवुन दिला. ७०% सारा देण्यासाठी कांहीही एवज नाही. आपल्या देहात दहा इंद्रिय आहेत, त्यांचा उपयोग सुखौपभोगासाठी किंवा मानप्रतिष्ठेसाठी न करतां कोणी शिव्या देवोत की, स्तुती करो असा कोणताही विचार न करतां निरिह वृत्तीने देवास अर्पण केल्यास १०% ची फेड होऊ शकते.”
ते पुढे म्हणाले, “देवाने माझा पिच्छा पुरवुन मन, मनोविकार सर्व हरण केले. आपल्याला हीन दशा आली म्हणुन वाईट वाटुन न घेता, खंत-खेद न मानतां नाशवंत गोष्टीची आसक्ती टाळुन कल्यानाचा मार्ग जर स्विकारला तर आपली कधीही ताटातुट, वियोग होणार नाही.मुलांबाळांत, संसारांत न गुरफटता मोहमाया पाशातुन मुक्त होऊन जन्म मरण्याच्या फेर्यातुन सुटका होण्यासाठी मोठ्या मनाने सर्वांना आपुलकीने सामावुन घेतल्यास उन्नती होईल. जवळची संपती चोराने लुटली, मुले नाहीतच, वासना दमण करुन मन वज्राप्रमाणे कठोर, सुखाचा हव्यास न केल्यास संसाराचे फाश तुटुन परमानंदाची प्राप्ती होईल.”
” उद्या शुध्द पक्षाची व्दादशी व पर्वकाळ आहे. व्दिजांना बोलावुन आपल्या जवळचे सर्व शुध्द अंतःकणाने दान कर, परमेश्वर आपली काळजी घेण्यास समर्थ आहे. जसे सांगीतले तसे वागलीस तर भवसागर तरुन जाशील. या उपदेशात त्यांनी कुठेही पती सेवा, किंवा पतीला देवाप्रमाणे मानावेचा चकार शब्दही आलेली नाही.”
जिजाई संसारात गुंतलेली, तर तुकाराम रात्रंदिवस
ध्यानपुजनात मग्न असल्यामुळे तीच्यावरच संसाराचा भार पडत असे. परंतु ते तीला संसारातुन, मोहातुन मन काढण्यास परम सुखाचा लाभ होईल, तिन्ही लोकांत मान्यता मिळेल असे वारंवार सांगत असे.
तुकोबा आणि जिजाई एकत्रीत राहत, परंतु दोघांचेही मार्ग भिन्न असुन वेगवेगळ्या भुमीकेवर त्यांचे वास्तव्य होते. जिजाई रुळलेल्या कर्मठांच्या मार्गाने जाऊन, तीचा संसार मर्यादित असल्याने लौकीक आचार धर्म पाळीत, तर तुकोबांचे लक्ष अचल अशा धृव्यतार्याकडे, उच्चस्थानी असलेल्या देवाच्या चरणावर अधिष्ठान ठेवले होते. एकदा एकांताची संधी साधुन एका विलासप्रिय स्रीने त्यांच्याजवळ कामवासनेची इच्छा व्यक्त केली. तुकोबांनी तर इंद्रियावर विजय मिळवला असल्याने, परस्री मातेसमान आहे असे म्हणुन तीला फटकारुन परत पाठविले.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
संत तुकाराम
भाग-१५
तुकोबांच्या किर्तनाचा नाद एका भाविक भक्ताला लागला होता. घरात कितीही अडचण आली तरी तो किर्तन चुकवित नसे. एकदा त्याचा मुलगा खुप आजारी असल्यावर सुध्दा हा वेळ होताच किर्तनाला गेलाच. इकडे मुलगा आत्यंतिक होऊन प्राण सोडला. त्याची आई दुःखाने व संतापाने वेडीपिसी होऊन मुलाचे प्रेत उचलुन किर्तनस्थळी तुकारामांच्या समोर ठेवले, व अद्वातद्वा बोलु लागली. परंतु तुकोबा थोडेही विचलीत न होता श्रोत्यांना हरिनामाचा गजर करण्यास सांगुन स्वतः नामघोष सुरु ठेवला. हरिनामाचा गजर दाही दिश्यांनी दुमदुमले, आणि आश्चर्य म्हणजे ते मृत बालक जिवंत होऊन उठुन बसले.
डाॅक्टर व वैद्य शरीर सुस्थीतीत ठेवण्यासाठी जसे उपाय योजना करतात, तसेच मन आणि आत्मा ह्यांची वाईट अवस्थेतुन सुटका करुन अमृताचा लाभ देणे हेच संतजनांचे वैशिष्ट्य आहे. मेललं शरीर जिवंत करण्यांत विशेष अद्भुतपणा नसुन मेलेल्या आत्म्याला जिवंत करणे हे विशेष आहे.
एकदा तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महारांजांच्या समाधी दर्शनास गेले असतां, प्रदक्षिणा घालीत असतांना कांही पक्षी तीथे कणसातले दाणे खात होते, पण तुकोबांच्या चाहुलीने भिऊन उडुन गेले. पक्षांना आपल्यापासुन त्रास झाल्याचे पाहुन त्यांच्या हळव्या मनाला अतिशय यातना झाल्यात. आपली भक्ती अद्याप अपुरी आहे असे मनांत विचार आल्याने तिथेच बसुन नामस्मरण सुरु केले. नामस्मरण करतां करतां देहभान विसरुन त्यांची ब्रम्हानंदी टाळी लागली, इतकी की, ते विदेहावस्थेत पोहोचले. पक्षी परत येऊन त्यांच्या अंगाखांद्यावर खेळु लागले. भानावर आल्यावर पक्षी अंगावर वावरत असलेले पाहुन त्यांना अतिशय आनंद झाला.
तुकोबाचा कोंडोंबा लोहकरे या शिष्याला काशीयात्रा करण्याची इच्छा झाली, म्हणुन द्रव्यासाठी तुकोबाला विनंती केल्यावर तुकोबांनी त्याला एक होन देऊन सांगीतले की, हा होन मोडुन यात्रेसाठी लागेल तो खर्च कर, परंतु त्यांतील एक पैसा राखुन ठेव म्हणजे शेवटपर्यत कमतरता येणार नाही.आणि यात्रा पुर्ण झाल्यावर माझा होन परत कर!
कोंडोबाचा विश्वास न बसल्यामुळे प्रचिती पाहण्यासाठी त्याने होन मोडुन यात्रेसाठी आवश्यक सामान खरेदी केले व एक पैसा बांधुन ठेवला. दुसर्या दिवशी त्या पैशाचा होन झालेला पाहुन आश्चर्यमाश्रीत आनंद झाला व यात्रेला निघुन गेला.
यात्रेवरुन परत आल्यावर त्याला मोह सुटल्यामुळे तुकोबाला होन परत न करतां घरी लपवुन ठेवला व होन हरवला म्हणुन खोटेच सांगीतले. त्यावर तुकोबा स्तब्ध होऊन म्हणाले “तु होन गमावलास”. कोंडोबा घरी येऊन पाहतो तर ठेवलेल्या जागेवरचा होन नाहीसा झाला. मनात खजील होऊन स्वस्थ बसला.
पैशाच्या लोभाने तुकारामासारख्या संतपुरुषाला फसवुन, सतत त्यांच्या सहवासांत राहुन होनाच्या लोभाने त्याने परमार्थाचा होन गमावला.
ह्यावरुन एवढे निश्चीत की, शुद्र विचार बलवान असतात, ते नाहिसे करण्याकरितां निकराचा प्रयत्न आवश्यक आहे, केवळ सत्पुरुषाच्या सहवासाने कृतार्थ होते असे मुळीच नाही.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
८/११/२०, सकाळ १०:५७ – Akola Minakshi Deshmukh: तुकाराम
८/११/२०, सकाळ १०:५७ – Akola Minakshi Deshmukh: तुकाराम
९/११/२०, सकाळ ११:०१ – Akola Minakshi Deshmukh: तुकाराम


