संत तुकाराम महाराज चरीत्र भाग ४, (१६ ते १७)

"तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।" असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇


          सर्व साधारणपणे जनसामान्याची कल्पना अशी आहे की, तुकाराम महाराज अंतकाळी देहासकट विमानात बसुन वैंकुठास गेलेत. परंतु या काल्पनिक वैंकुठगमनाची कल्पना भागवत धर्मिय तत्वात बसु शकत नाही. त्यांनी मोक्ष, सुख ज्या वैंकुठांत मिळते, त्या स्वर्गवासाची कल्पना सुध्दा कधी मनास शिवु दिली नाही. उलट त्यांच्या जिविताचा हेतु जनोध्दार व भक्तिप्रसारासाठीच आहे.

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! संत तुकाराम महाराज चरित्र

भाग १६

 तुकाराम महाराजांचे अवतार कार्य महाराष्ट उध्दाराच्या दृष्टीने फार उपयोगी पडले. त्यांनी भक्तीवृक्षाच्या छायेखाली महाराष्टातील निरनिराळ्या जाती, पंथाच्या हिंदुना एकत्रीत आणले.

 त्यांची धार्मिक व परमेश्वराच्या बाबतील भेद नष्ट व्हावे म्हणुन जातीची कृत्रिमता, उच्चनिच्चता,स्री-पुरुष  हे न मानण्याचे महान तत्व लोकांच्या गळी उतरवले. त्यांनी पक्षभेद व मतभेद नाहीसे करुन *भागवतधर्मरुपी* सुत्रात पध्दतशीरपणे ओळुन एकजीनसी हार तयार केला.

 *न लगे देवा तुझे आम्हासी वैकुंठ ।*

*सायुज्याचा पट न लगे मज ।।*

*देई तुझे नाम मज सर्व काळी ।*

 *मागणें वनमाळी हेचि तुज ।।*

 सर्व साधारणपणे जनसामान्याची कल्पना अशी आहे की, तुकाराम महाराज अंतकाळी देहासकट विमानात बसुन वैंकुठास गेलेत. परंतु या काल्पनिक वैंकुठगमनाची कल्पना भागवत धर्मिय तत्वात बसु शकत नाही. त्यांनी मोक्ष, सुख ज्या वैंकुठांत मिळते, त्या स्वर्गवासाची कल्पना सुध्दा कधी मनास शिवु दिली नाही. उलट त्यांच्या जिविताचा हेतु जनोध्दार व भक्तिप्रसारासाठीच आहे.

 तुकोबांनी स्वर्गसुखापेक्षा पंढरपुर या वैंकुठास जास्त महत्व दिले होते. त्यांची इच्छा नसतांनाही जबरीने वैंकुठवास लादला असेल का? यापुर्वी कोणताही             साधु-महंत किंवा सिध्दपुरुष सदेह वैंकुठास गेल्याचे एकही उदाहरण दिसत नाही, मग ही अशक्य गोष्ट फक्त त्यांनाच का चिकटवावी ? स्वर्गातुन त्यांचा देह नेण्यासाठी स्वतः देवाने विमान पाठवले हे जागृत मनाच्या कल्पनाशक्तीस न पटणारी आणि प्रत्यक्ष वस्तुस्थितीच्या विरुध्द वाटते.

 तुकारामांना जर वैंकुठास जायचेच होते तर त्यांनी आषाढ किंवा महिण्याची निवड कां केली नाही ?  या दोन्ही महिण्यांचे महत्व त्यांच्यासाठी अनन्यसाधारण होते असे असतांना त्यांनी गमनासाठी फाल्गुन महिनाच कां निवडला ? ते एकादशीला विशेष मानत असतांना एकादशी कां नाही निवडली? शिवाय फाल्गुन महिण्यातील द्वितिया म्हणजे अत्यंत ओंगळ स्वरुपाचा, माणुसकी विसरणारा, मर्यादेचे उल्लंघन करणारा शिमग्याचे विभित्स स्वरुप असतांना हा दिवस निवडणे शक्य वाटत नाही.

 त्यांच्या कोणीतरी शत्रुने वैरभावाने त्यांचा घात केला असुन प्रेत नाहीशे केले असावे ही संभावना जास्त वाटते. कारण फाल्गुन वद्य द्वितिया या दिवशी धुळमातीचा धुमाकुळाचा उपसर्ग होऊ नये म्हणुन ते करंजाई बेटाजवळ एकांतात भजनास बसले असावे, नंतर ते स्नानासाठी इंद्रायणी नदीत गेले असता वैर्‍याने कट करुन त्यांना डोहात बुडवले असावे, कारण हे दुष्ट कृत्य कोणी पाहु शकणार नाही आणि कदाचित कोणी पाहिलेच तर शिमग्याच्या थट्टामस्करीच्या रुढीखाली दबुन  झाकण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

 त्यांनतर ते दिसले नाहीत म्हणुन शोधाशोध सुरु झाली परंतु ते किंवा त्यांचा देह सापडला नाही, मात्र तीन दिवसांनी पंचमीला लोकांची दिशाभुल करुन त्यागाची खुण म्हणुन गोधडी, आणि भक्तीमार्गाची खुण म्हणुन टाळ, वीणा स्वर्गातुन पाठविली असा धूर्त डाव भासवला असावा.

           क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

संत तुकाराम

 *अंतिम भाग-१७*

 तुकाराम महाराज हे भक्त होते, योगी नव्हते.

 योगबलाने ते देह अदृष्य कसं करुं शकतील ? 

तीन दिवसांनंतर त्यांची गोधडी व टाळ वीणाच फक्त पृथ्वीवर कां पाठविले ?

कां ?

त्यांना दुसरी कोणती वस्तु पाठवावीशी वाटली नाही ?

 जर त्यांना पाठवणे जरुरीचेच वाटले होते तर घरी का पाठवल्या नाहीत ?

 ह्या वस्तु जर देवदुताने परत केल्या तर  घरी पाठवण्याची भिती वाटली असेल काय ?

 किंवा

घरी पाठवणे शक्य नव्हते म्हणुन नदीकाठी टाकुन ते परस्पर चालते झाले असतील किंवा कसे ?

 पुर्ण विचारांती असे वाटते की, महाराजांस पाण्यात बुडवतांना ह्या वस्तु तिथेच राहिल्या असतील किंवा तिथेच जवळपास लपवुन ठेवल्या असतील!

लोकांचे लक्ष खर्‍या कारणांपासुन विचलीत करण्यासाठी व काल्पनिक गोष्टीकडे वेधण्यासाठी पंचमीस नदीकिनारी नांदुरकीच्या झाडाजवळ टाकल्या असाव्यात आणि महाराजांनी स्वर्गातुन पाठविल्यात असा भाविकांचा समज केला असावा !

तुकोबांचे तेरा टाळकरी होते, पैकी रामेश्वरभट्टच फक्त महाराज सदेह वैकुंठास गेल्याचे सांगतो. या तीनशे वर्षाच्या दिर्घकाळात एकही विश्वासनीय साधार पुरावा मिळाला नाही.

 वैकुंठगमनाच्या वेळी               तुकोबांचे वय ५०-५१  वर्षाचे होते, शरीरप्रकृतीही उत्तम होती, या वयात त्यांना शरीराचा वा जीविताचा कंटाळा येण्यासारखे कांहीही कारण सांपडत नाही. शिवाय ते भागवत धर्माचे वारसदार असुन धर्मप्रसारक, कट्टर कर्मयोगी होते. परकीय सत्तेने घातलेला धुमाकुळ त्यांना सहन होत नव्हता, त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न पण सुरु होते.

*न घडे यावरी न धरावे धीर ।*

*पिडितां राष्ट देखोनी ।।*

लोकहित साधने हेच त्यांनी उदिष्ट, ध्येय ठरविले होते.

*तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता ।।*}

 याच जनहिताच्या दृष्टीने ते अभंग निर्मिती करीत असत. किर्तनाव्दारे जनतेत नवचैतन्य, जनहिताचे, लोककल्यानाचे अनेक महत्वाचे प्रश्न त्यांच्या समोर असल्याने रात्रंदिवस झटत होते. शरीर धर्माची पर्वा नव्हती. अशा अनेक गोष्टींवरुन या लोकीचा त्याग करावा, वैकुंठवासाची कल्पना येणे शक्य वाटत नाही.

 त्यांचा स्वतःचा मुलगा *हरीपंत*  सुध्दा सहमत नव्हता. त्यांचे दुसरे पुत्र *नारायण* यांनी छत्रपती शिवाजी महारास लिहिलेल्या पत्रात “एकाएकी नाहिसे झाले” असा उल्लेख आहे.

 तुकाराम महाराजांनी अभंगरुपाने महाराष्टास कायमचे ञृणी करुन ठेवले. ज्या अभंगवाणीचा प्रसार जगभर झाला अशी ती अमोल वाणी, ठेवा जपुन ठेवावा असा त्यांच्या वंशजांनी प्रयत्न केलेला दिसत नाही आपला वारसा, आपली गादी ही त्यागाची आहे याचा वारसदारांना पुर्ण विसर पडलेला दिसुन येतो.

 तुकाराम महाराज शके १५७२ मधे इहलोकातुन नाहिसे झालेत.

हेंचि दान देगा देवा ।

तुझा विसर न व्हावा ॥१॥

गुण गाईन आवडी ।

 हेचि माझी सर्व जोडी ॥२॥

न लगे मुक्तीधन संपदा ।

संतसंग देई सदा ॥३॥

तुका म्हणे गर्भवासी ।

सुखे घालावे आम्हासी ॥४॥

 *समाप्त

संकलन-मिनाक्षी देशमुख


*जगद्गुरु संत तुकाराम

*जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे

संत तुकाराम म. चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading