1. मारुतीचे मूर्ती प्रकार, म्हणजेच हनुमंताच्या मूर्तीचे प्रकार एकूण दहा आहेत.

मारुतीचे मूर्ती प्रकार, म्हणजेच हनुमंताच्या मूर्तीचे प्रकार एकूण दहा आहेत.  १) चपेटदान मारुती.  २) वीर मारुती.  ३) दास मारुती.  ४) प्रताप मारुती.  ६) मिश्र मूर्ती.  ७) योगी मारुती.  ८) वार्ताहर हनुमान. ९) वीणा पुस्तकधारी हनुमान. १०) पंचमुखी मारुती. 

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

मारुतीचे मूर्ती प्रकार, म्हणजेच हनुमंताच्या मूर्तीचे प्रकार एकूण दहा आहेत.  १) चपेटदान मारुती.  २) वीर मारुती.  ३) दास मारुती.  ४) प्रताप मारुती.  ६) मिश्र मूर्ती.  ७) योगी मारुती.  ८) वार्ताहर हनुमान. ९) वीणा पुस्तकधारी हनुमान. १०) पंचमुखी मारुती. 

Marutichya Murtiche Prakar Artaht Hanumantachya Murtiche Prakar

मारुतीचे मूर्ती प्रकार, म्हणजेच हनुमंताच्या मूर्तीचे प्रकार एकूण दहा आहेत. 

Marutichya Murtiche Prakar Artaht Hanumantachya Murtiche Prakar

१) चपेटदान मारुती :- (Chapet Maruti- Hanuman)

२) वीर मारुती :– (Veer Maruti- Hanuman)

३) दास मारुती :– (Das Maruti- Hanuman)

४) प्रताप मारुती :- (Pratap Maruti- Hanuman)

५) रामसेवक मारुती :– (Ram Sevak Maruti- Hanuman)

६) मिश्र मूर्ती – (Mishra Maruti- Hanuman)

७) योगी मारुती – (Yogi Maruti- Hanuman)

८) वार्ताहर हनुमान – (Wartahar Maruti- Hanuman)

९) वीणा पुस्तकधारी हनुमान :– (Vina Pustakdhari Maruti- Hanuman)

१०) पंचमुखी मारुती :– (Panchmukhi  Maruti- Hanuman)

१) चपेटदान मारुती :- (Chapet Maruti- Hanuman) हे हनुमानाचे एक वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप आहे. या स्वरूपामध्ये अशोकवनात रामदूत म्हणून सीतामाईची भेट घेतल्यानंतर त्या अशोकवाटिकेचा विध्वंस करणारा हनुमंत दाखविण्यात येतो. प्रभूरामचंद्राच्या आज्ञेने हनुमंताने लंकेला भेट देऊन सीतामातेला प्रभुरामचंद्रांचा संदेश दिला. तेव्हा त्याची दूताची भूमिका असल्यामुळे तो निशस्त्र होता. अशोक वाटिकेच्या रक्षणासाठी रावणाने राक्षस स्त्रियांची नेमणूक केली होती. त्यांच्या शस्त्र विरोधाला न जुमानता मारुतीने केवळ शरीर बळावर हे वन उद्ध्वस्त केले. रामायणातील या घटनेचे वर्णन असलेले शिल्पांकन मारुतीच्या

चपेटदान मारुती :- या स्वरूपात पाहायला मिळते. आपल्या शरीराचा आकार इच्छेप्रमाणे लहान किंवा मोठा करण्याची विद्या मारुतीकडे होती. अशोकवाटिका उद्ध्वस्त करताना त्यांनी आपल्या शरीराचे आकारमान वाढवले होते. त्याच्या हाताच्या फटक्याने मोठे मोठे वृक्ष जमीनदोस्त होत होते. मारुतीचा डावा हात त्याच्या कमरेवर टेकवून ठेवलेला असून त्या हातात उन्मळून काढलेला डेरेदार वृक्ष किंवा झाडाची फांदी धरलेली असते. मारुतीचा उजवा हात थप्पड मारण्याच्या अविर्भावात कानाजवळ उगारलेला असतो. अगदी कानफडात मारल्यासारखा असतो, म्हणून याला कानफाडया मारुती असेही म्हणतात. उजव्या हाताने संकटांना चापटीने पळवून लावणारा असा याचा अर्थ असावा. शेपटी उजवीकडून वरील बाजूकडे मस्तकावरून डाव्या बाजूला कमरेपर्यंत कमानी सारखी दाखविली जाते. या प्रकारच्या शिल्पाचे आणखी एक वेगळेपण म्हणजे मारुतीची उभारलेली शेंडी. जी मारुतीच्या क्रोधायमान अवस्थेचे प्रतीक आहे. मूर्तीच्या हातात व दंडावर कडे, गळ्यात अलंकार व पायात तोडे असतात. आजन्म ब्रह्मचारी असलेल्या मारुतीच्या पायाखाली असलेले स्त्री शिल्प हे त्याचं वेगळेपण आहे. अशोकवाटीकेच्या रक्षणासाठी रावणाने नेमलेल्या राक्षस स्त्रियांनी मारुतीला सशस्त्र प्रतिकार केला. त्याला न जुमानता मारुतीने आपले विध्वंसाचे कार्य सुरूच ठेवले. या प्रसंगाचे शिल्पांकन म्हणून अशा शिल्पातील मारुतीच्या पाया खालील पराभूत अवस्थेतील सशस्त्र पनवती नावाची राक्षसीण स्त्री दाखवली जाते. एकंदरीतच रामायणातील अशोकवाटिकेच्या विध्वंस प्रसंगाचे यथार्थ चित्रण असलेल्या मारुतीच्या अशा मूर्ती दुर्मिळ असल्या तरी कोल्हापूर परिसरात मात्र अनेक मूर्ती पाहायला मिळतात.

२) वीर मारुती :– (Veer Maruti- Hanuman) वीरासनात बसलेला, एक गुडघा जमिनीला टेकवलेला आणि एक उंच केलेला. पटकन उठता येईल अशा पोजमध्ये बसलेला असतो. या मूर्तीच्या डाव्या हातात गदा असते. डाव्या हाताला पुढे केलेल्या डाव्या पायाच्या मांडीचा आधार देऊन ती गदा डाव्या खांद्यावर टेकवलेली असते. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवलेला असून उजवा हात अभयमुद्रेत असतो. वीरमारुतीची शेपटी वर उभारलेली असते. वीरमारुति हा युध्दाच्या पवित्र्यात असतो.

३) दास मारुती :– (Das Maruti- Hanuman) एखादा दास जसा आपल्या इष्ट देवतेच्या सेवेसाठी रात्रंदिवस कशाचाही विचार न करता हात जोडून उभा राहतो, तसा हा दास मारुती अयोध्यापती मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या पुढे अखंड हात जोडून उभे राहत असतो,
या हनुमंताचे मस्तक आणि शरीर थोडे पुढे झुकलेले,
दोन्ही पाय सम असलेले,
शेपटी भूमीवर रुळलेली
आणि सेवा करण्यासाठी तत्पर
अशा मुद्रेमध्ये हा दक्ष हनुमान असतो यालाच सेवेचा भाव असलेल्या हनुमंतालाच दास मारुती असे म्हटले जाते.
भक्त प्रल्हाद आपल्या पित्याला सांगतो पिताजी भगवान विष्णूची भक्ति नऊ प्रकाराने केली जाते ती कोणी कोणी केली
श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् ।।
इति पुंसार्पिता विष्णौ भक्तिश्चेन्नवलक्षणा ।
क्रियते भगवत्यद्धा तन्मन्येऽधीतमुत्तमम् ।।
भागवत सातवा स्कंध पाचवा अध्याय

अर्थ प्रल्हाद हिरण्यकश्यपुला सांगतो विष्णूची भक्ति –

1. श्रवणं  :- श्रवण भक्ती (राजा परीक्षिती प्रमाणे)
२. कीर्तनं :- नामसंकीर्तन भक्ती, (नारद मुनी, संत नामदेव प्रमाणे)
३. स्मरणं  :- स्मरण भक्ती  मनात स्मरण करणे, (प्रल्हाद ,ध्रुव ,जटायू प्रमाणे)
४. पादसेवनम्  :- चरण भक्ती, पाय चेपणे, (लक्ष्मी व भरत प्रमाणे)
५. अर्चनं :- पूजन भक्ती,  पूजा करणे, (पृथु राजा प्रमाणे)
६. वन्दनं :- नमन भक्ती ,नमस्कार करणे, ()
७. दास्यं :- दास्य भक्ति (हनुमाना प्रमाणे),
८. सख्य :- सख्य भक्ति (अर्जुन,उध्दव प्रमाणे)
९. आत्म निवेदनम्
:-  आत्मनिवेदन भक्ती बळी राजा प्रमाणे  (स्वतः देव आपलं ऐकतो आहे अशा प्रकारे त्याला सर्व सांगणे )– अशी नवविधा भक्ति केली तर ते उत्तम शिक्षण होय.

४) प्रताप मारुती :- (Pratap Maruti- Hanuman)  आता भव्य म्हणजे खूपच मोठे असे स्वरूप असते भीमकाय कोणतेही अवघड आणि मोठे कार्य करण्यासाठी ज्या रूपाची आवश्यकता असते ते रूप आणि त्याच रूपाने व शरीराने प्रचंड कार्य करता येतात त्यालाच प्रताप असे म्हटले जाते. तेच रूप म्हणजेच प्रताप मारुती रूप आहे तसेच हातामध्ये द्रोणागिरी दुसऱ्या हातामध्ये गदा असं कार्य तत्परता या रूपामध्ये दिसून येते

५) रामसेवक मारुती :– (Ram Sevak Maruti- Hanuman) दोन्ही खांद्यावर राम लक्ष्मणाला घेऊन निघालेला असा हा मारुती. रामाची सेवा करतो म्हणून सेवक मारुती. कधी कधी केवळ रामच खांद्यावर असतो.

६) मिश्र मूर्ती (Mishra Maruti- Hanuman) पाय जुळवलेले आणि हात जोडलेले, म्हणजे हा भक्त मारुती झाला. त्याला दोनच हात असले तरी त्याला धनुष्यबाण, ढाल, तलवार दाखवलेले असते. वीर आणि भक्त मारुतीची सांगड घालणारी ही मूर्ती आहे.

७) योगी मारुती – (Yogi Maruti- Hanuman) योगांजनेय (अंजनी + योगी) असा हा मारुती योगसाधना करणारा वाटतो.

८) वार्ताहर हनुमान (Wartahar Maruti- Hanuman) विमानअर्चनाकल्प ग्रंथाच्या २१ व्या अध्यायात याचा उल्लेख आहे. उजवा हात तोंडावर ठेवून, डाव्या हातात वस्त्राचा काठ धरून उभा असतो आणि श्रीरामाला बातमी सांगत असतो. गुप्तपणे एखादी बातमी सांगण्याचा जो आविर्भाव असतो तसा आविर्भाव या मूर्तीत असल्यामुळे तो तोंडावर हात ठेवून उभा असतो.

९) वीणा पुस्तकधारी हनुमान :– (Vina Pustakdhari Maruti- Hanuman) मारुतीला संगीत आणि गायनाचीदेखील देवता मानले जाते. मारुती चांगला संगीत व गायन तज्ज्ञ होता. या मूर्तीच्या उजव्या हातात वीणा आणि डाव्या हातात पोथी असते. हा दक्षिणेत आंध्रात पाहायला मिळतो. आंध्रात चतुर्भुज मारुतीची मूर्ती पाहायला मिळते.

१०) पंचमुखी मारुती :– (Panchmukhi  Maruti- Hanuman) हा महाराष्ट्रातदेखील अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. हनुमानजींनी पाच मुखी का धारण केले याचे रहस्य जाणून घ्या

अंजनीसुत महावीर श्री राम भक्त हनुमान हे असे एक भक्तआहेत ज्यांच्याकडे चातुर्य, भक्ती, धैर्य आणि सामर्थ्य त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या तुलनेत बटू दिसते. ते संपूर्ण रामायणाचे मध्यवर्ती पात्र आहे. श्रीरामाचे प्रत्येक दुःख दूर करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. या हनुमानाचे एक रूप म्हणजे पंचमुखी हनुमान. त्यांनी हे रूप कधी, का आणि कोणत्या हेतूने धारण केले याविषयी पुराणात एक अद्भुत कथा आहे.

श्रीराम आणि रावणाच्या युद्धात एक वेळ अशी आली जेव्हा रावणाला मदतीसाठी आपला भाऊ अहिरावण याची आठवण करावी लागली. ते तंत्र-मंत्राचे मोठे पंडित आणि माता भवानीचे निस्सीम भक्त होते. त्याचा भाऊ रावणाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्याला एक सोपा उपाय सापडला. श्रीराम आणि लक्ष्मण यांचे अपहरण झाले तर युद्ध आपोआप संपेल. त्याने असा भ्रम निर्माण केला की संपूर्ण सेना गाढ झोपेत गेली आणि त्याने श्रीराम आणि लक्ष्मण यांचे अपहरण केले आणि ते झोपेत असताना त्यांना पाताळात नेले.

जेव्हा विभीषणाला या संकटाची जाणीव झाली आणि त्यांनी असे धाडस फक्त अहिरावाणच करू शकतो हे रहस्य उघड केले, तेव्हा नेहमीप्रमाणेच सर्वांच्या नजरा या संकटाचे रक्षणकर्ता हनुमानजींवर खिळल्या.
हनुमानजी लगेच पाताळात पोहोचले. मकरध्वजाबरोबर गेटवर पहारेकरी म्हणून युद्ध करून त्याचा पराभव करून, जेव्हा तो पातालपुरीच्या राजवाड्यात पोहोचला तेव्हा त्याला श्रीराम आणि लक्ष्मणजींना ओलीस ठेवलेले दिसले.
वेगवेगळ्या दिशांना पाच दिवे जळत होते आणि माता भवानीसमोर श्री राम आणि लक्ष्मणाला आहुती देण्याची पूर्ण तयारी होती. अहिरावण संपवायचे असेल तर हे पाच दिवे एकाच वेळी विझवावे लागतील. हे रहस्य कळताच हनुमानजींनी पंचमुखी हनुमानाचे रूप धारण केले.
उत्तरेला वराह मुख,
दक्षिणेला नरसिंह मुख,
पश्चिमेला गरुड मुख,
हयग्रीवाचे मुख आकाशाकडे आणि
हनुमानाचे मुख पूर्वेला आहे.
ही पाच मुखे धारण करून त्यांनी सर्व दिवे एकत्र विझवले आणि अहिरावानाचा वध करून श्रीराम आणि लक्ष्मण यांना मुक्त केले. समुद्र ओलांडत असताना एका माशाने आपल्या घामाचा एक थेंब स्वीकारून मकरध्वजाला जन्म दिला, त्यामुळे मकरध्वज हा हनुमानजींचा पुत्र आहे, हे जाणून श्रीरामांनी हनुमानजींना पातालपुरीचे राज्य मकरध्वजाच्या स्वाधीन करण्याची आज्ञा केली. हनुमानजींनी त्यांच्या आज्ञेचे पालन केले आणि त्या दोघांसह समुद्र किनारी युद्धभूमीवर परतले.

देशात अनेक ठिकाणी हनुमानजींच्या या अद्भूत स्वरूपाच्या मूर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत.
रामेश्वर येथे स्थापन झालेल्या पंचमुखी हनुमान मंदिरातील त्यांच्या भव्य मूर्तीबाबत वेगळी कथा आहे.

पुराणातच नमूद केलेल्या या कथेनुसार
मायल-रावण नावाच्या राक्षसाने भगवान विष्णूचे चक्र चोरले. जेव्हा अंजनेय हनुमानजींना हे कळले तेव्हा त्यांच्या हृदयात सुदर्शन चक्र परत आणून विष्णूजींच्या स्वाधीन करण्याची इच्छा निर्माण झाली. मायिल त्याचे रूप बदलण्यात माहीर होता. हनुमानजींचा संकल्प जाणून भगवान विष्णूंनी हनुमानजींना आशीर्वाद दिला आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांना
हवेच्या हालचालीची शक्ती असलेले गरुडमुख,
भय निर्माण करणारे नरसिंह-मुख आणि हयग्रीव आणि वराह-मुख प्रदान केले.
पार्वतीजींनी त्याला कमळाचे फूल दिले आणि
यम-धर्मराजाने त्याला पाश नावाचे शस्त्र दिले. या आशीर्वादाने आणि या सर्व शक्तींनी हनुमानजी मायिलवर विजय मिळवण्यात यशस्वी झाले. तेव्हापासून त्यांच्या पंचमुखी रूपालाही मान्यता मिळाली. या पंचमुखी देवतेची पूजा केल्याने
कोणत्याही व्यक्तीला नरसिंह मुखाच्या सहाय्याने शत्रूवर विजय,
गुरुमुखाच्या सहाय्याने सर्व दुष्टांवर विजय,
वराहमुखाच्या सहाय्याने सर्व प्रकारची समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते, असे मानले जाते.
हयग्रीव मुखाच्या मदतीने ज्ञान प्राप्त होऊ शकते.
हनुमान स्वतः धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करतात.

मारुती-हनुमान मूर्ती व रंग

हनुमानाची मूर्ती मोजक्या ठिकाणी काळ्या आणि बहुतेक तांबड्या रंगात दिसते. त्या हनुमंताचा वर्ण काळाअसून तो  हा शनीदेवाच्या प्रकोपाने-प्रभावाने झाला, असे काही जाणकारांचे मत आहे.
तांबड्या रंगाचा हनुमान म्हणजे शेंदूर लावलेला हनुमान. या  शेंदूर आणि हनुमान याचे सुंदर वर्णन आनद रामायण नावाच्या रामायणात आले असून ती कथा थोडक्यात अशी आहे .
कि प्रभू रामचंद्र जेव्हा रावणाला मारून आयोध्यामध्ये राजगादीवर विराजमान झाले. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्या पतीच्या सेवेमध्ये, रममाण सीतामाता आपल्याच्या आवडी निवडीचा विचार करत, आणि त्या गोष्टीचा विचार करून मग त्यांच्या अस लक्षात आलं की. त्यांना सेंदरी रंग म्हणजेच तांबडा रंग खूप आवडतो. त्यानुसार त्यांनी आपल्या शरीरावर तो रंग जास्तीत जास्त धारण केला. जसे. भागेमध्ये कुंकू. कपाळावरची मुख्य उठून दिसणारा. सौभाग्यचा कुंकू. अंगावरील कपडे. शिवाय फुलमाला. इत्यादी.

हे पाहून सेवेमध्ये उभ्या असलेल्या हनुमान सीतामातेला विचारतो आईसाहेब. आज हा रंग. तुम्ही का धारण केला? तेव्हा सीतेने हनुमानाचाला सांगितले की. हनुमंता हा रंग प्रभू रामचंद्रांना खूपच आवडतो  ‘‘त्यामुळे तुमच्या स्वामींचे आयुष्य वाढते.’’  आणि त्या रंगामुळे मग मी सुद्धा त्यांना आवडेल. म्हणजे आवडावी त्यासाठी मी हे सगळ केला. हे ऐकून हनुमान त्यांना आश्चर्य वाटलं की आपणही प्रभू रामचंद्रांना आवडलोपाहिजेत. त्यासाठी त्यांनी. लाल रंगाचे खडे, गेरू. पान. लाल रंगाचे फूल. लाल रंगाचे साहित्य. हे सगळं एकत्र करून चोळून मळून  एकत्र घेऊन आपल्या सगळ्या अंगाला लावले. त्यामुळे. त्यांच्या अंगाचा रंग सेंद्रिय झाला. आणि मग प्रभुरामचंद्राच्यापुढे उभी जाऊन राहिले. आणि सांगितलं. आणि हनुमंत म्हणतात. देवा तुम्ही सांगा तुम्हाला कोण आवडते तेव्हा हनुमंता च्या प्रश्नाला उत्तर देताना प्रभू रामचंद्र म्हणतात. हनुमंता. अरे मला आता तूच जास्त आवडतो आणि मी तुला आतां वर देतो,  तुम्ही भोळी भक्ति पाहून. आजपासून जो कुणी तुला शेंदूर लावीन. त्याच्यावर मी कृपा करीन व तू अमर होशील; म्हणून हनुमंत सप्तचिरंजिवांपैकी एक आहेत. म्हणून आपण हनुमंताला जो शेंदूर लावतो. तो कशासाठी लावतो हे सुद्धा आणि कारण माहित नाही. धन्यवाद.

दुसरी माहिती. :-  राम रावण युद्धात. जेव्हा म्हणून चाक. लक्ष्मणाला शक्ती लागली. सुषेण नावाच्या वैद्याने. वल्ली आणायची सांगितली. तेंव्हा ती वल्ली द्रोणागिरी नावाच्या पर्वतावर होती, मग तो द्रोणागिरी पर्वत हनुमान घेऊन लंकेला जात असता भरताने पाहिलें, कुणी राक्षस आहे असे समजून बाण मारला. तेव्हा हनुमंत खाली पडली ते तीर्थराज प्रयागराजला त्रिवेणी संगमाच्या जवळ त्यांची झोपलेल्या मारुतीचे मंदिर आहे त्या ठिकाणी. त्याला बाण मारला. त्यामुळे त्याच्या पायाला जखम झाली. ती जखम शेंदूर आणि तेल लावून बरी झाल्याने हनुमानाला शेंदूर आणि तेल आवडते.

हनुमंताची सर्व माहिती एकाच ठिकाणी

हनुमंताची सर्व माहिती एकाच ठिकाणी

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading