४. सातारे (संभाजीनगर) खंडोबा, १३ खंडोबा ठिकाणे 96 कुळी मराठा कुलदैवत

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

Satare Chhatrapati Sambhajinagar (Aurangabad) Khandoba 96 Kuli Maratha Kuladaivat

महाराष्ट्र खंडोबा मंदिरे
महाराष्ट्रामधील खंडोबा मंदिरांची सविस्तर माहिती पहा

१. सातारे २. बीड ३. पाली ४. शेगुड ५. रेवडी ६. निमगाव ७. माळेगाव ८. नळदुर्ग ९. अणदूर १०.चंदनपुरी ११. नेवासा १२. मलवडी १३. धामणी

सध्या उपलब्ध माहितीनुसार खंडोबाची एकूण मुख्य बारा ठिकाणे सापडतात.
१.) जेजुरी, २.) पाली, ३.) नळदुर्ग, ४.) देवरगुड्डा, ५.) मृणमैलार, आदिमैलार या स्थाना शिवाय इतर स्थाना विषयी देशकालपरत्वे भेद आढळतात.

या लेखात आज सातारे खंडोबाची माहिती पाहणार आहोत

सातारे
सातारे खंडोबा साठी प्रसिद्ध असणारे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जवळील गाव येथील रेल्वे स्टेशन पासुन फक्त ५ किमी असणारा गाव.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबादचे) शहर विस्ताराने त्याचाच एक भाग बनत आहे. रिंग रोडला पुणे, पैठण, बीड कडून येणारे मार्ग मिळतात त्या परिसरातील एम आई टी कॉलेज चे जवळून पाठीमागे जाणाऱ्या रस्त्याने सातारे येथे पोहचता येते.

गर्भगृहात प्रवेश केल्यावर समोर पश्चिमेस पूर्वाभिमुख तीखणी मेघदम्बरी असुन ती उंचावर आहे मध्यभागीचे मेघदम्बरी धातूची म्हाळसेसह घोड्यावर विराजमान खंडोबाची झालेली उत्सव मुर्ती आहे. या मुर्ती मागे एक शेंदूर चर्चित डोळे बसविलेला खंडोबाचा तांदळा आहे

गर्भगृहाचे नेरुत्य कोपऱ्यात एक अश्वारूढ शेंदूर चर्चित घोडेस्वार असुन त्याचे शेजारी सुमारे ८ फुट उंचीचा दुधारी खंडा आहे.

गर्भगृहाचे वयाव कोपऱ्यात अश्वारूढ खंडोबा म्हाळसा यांची प्रतिमा आहे त्याचे पश्चिमबाजुस लिंग व तांदळे आहेत.

जुन्याकाळी खंडोबाचे वास्तव्य मंदिरामागे दिसणारे डोंगरावर होते, सातारे येथील जहागीरदार दर्शनासाठी तेथे रोज जात ते वृद्ध झाल्यावर त्यांचे भक्तीने देव या ठिकाणी गोकुळ अष्टमी चे दिवशी आले अशी जनश्रुती आहे.
मंदिराचा गाभारा बाहेरून तारकाकृती करण्यात आलेला आहे त्या वरील नक्षीकाम सुंदर आहे गर्भगृहास दक्षिण बाजूनेही दरवाजा आहे मंदिराचे काम जांभ्या दगडात करण्यात आलेले आहे.
मंदिराचे शिखर सुंदर असुन त्या वरील गिलावा गेलेला आहे. त्या मुळे त्या वरील मुर्ती काम कसे होते हे समजत नाही,
हे मंदिर छत्रपती संभाजीनगर जवळील बोरसर येथील कुलकर्णी यांनी बांधल्याचे सांगतात तर ईस १७६६ मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी यांचा जिर्णोधार केल्याचेही सागितले जाते.
दसरा नवरात्र, चंपाषष्टी षडरात्र , पौष पौर्णिमा, या दिवसा मध्ये येथे यात्रा भरते.

13 खंडोबा ठिकाणे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading