
shegud Khandoba 96 Kuli Maratha Kuladaivat
महाराष्ट्र खंडोबा मंदिरे
महाराष्ट्रामधील खंडोबा मंदिरांची सविस्तर माहिती पहा
१. सातारे २. बीड ३. पाली ४. शेगुड ५. रेवडी ६. निमगाव ७. माळेगाव ८. नळदुर्ग ९. अणदूर १०.चंदनपुरी ११. नेवासा १२. मलवडी १३. धामणी
सध्या उपलब्ध माहितीनुसार खंडोबाची एकूण मुख्य बारा ठिकाणे सापडतात.
१.) जेजुरी, २.) पाली, ३.) नळदुर्ग, ४.) देवरगुड्डा, ५.) मृणमैलार, आदिमैलार या स्थाना शिवाय इतर स्थाना विषयी देशकालपरत्वे भेद आढळतात.
या लेखात आज शेगूड खंडोबाची माहिती पाहणार आहोत
शेगूड
शेगूड हे अहमदनगर सोलापूर जिल्ह्याचे सीमेवरील लहान गांव असून ते येथील खंडोबा मंदिरासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. अहमदनगरच्या कर्जत तालुक्याच्या ठिकाणा पासुन १४ किलोमीटरवर आहे. सोलापूर मधील करमाळा या तालुका ठिकाणाहून १५ किलोमीटरवर आहे. हे मंदिर कर्जत-करमाळा या रोडवर लागुनच आहे.
उतरल्यानंतर आपण थेट मंदिराचे कोटाचे दक्षिण दरवाज्यातच उभे असतो हा दरवाजा लहान असल्याने त्यास खिडकी असे सुद्धा म्हणतात.
या मंदिराचा पुर्व कडील दरवाजा हा मुख्य दरवाजा आहे आणि तो भव्य असून त्याचे हे दगडी बांधकामातील दरवाज्यावर वीटीने नगारखाना बांधला आहे.
मंदिराचा संपूर्ण तट हा दगडी बांधकामाने युक्त असून त्या कोटाची लांबी सुमारे लांबी १४८ फुट व रुंदी १२० फुट भरेल. कोटाला अंतर्भागात चारी दिशेला ओवरी आहेत.
कोटावर सज्जा असुन पुर्वदरवाजा जवळूनच नगारखाना आणि सज्ज्यावर जाण्यासाठी पायरी रस्ता आहे. कोटास चारही दिशांना दरवाजे असुन दक्षिण व उत्तरेचा दरवाज्या लहान असल्याने स्थानिक लोक यास खिडकी असे म्हणतात
मुख्य मंदिराचे समोरच जमिनीच्या दगडी फरशीवर हात जोडून लोटांगण घातलेल्या अवस्तेतील एक पुरुष प्रतिमा कोरलेली आहे ती नगर जिल्ह्यातील चर्मकार समाज्यातील एका पुरुष्याची असल्याचे सांगितले जाते,
जुन्याकाळी मंदिराचे काम सुरु असताना कळस स्थिर राहत नव्हता त्या वेळी देव येथे राहावा या साठी सदर व्यक्तीने आपल्या पोटातील आतडे काढून त्याची वाट लावली तेव्हा कळस स्थिर झाला व देव तेथे राहिला देवा साठी बलिदान देणाऱ्या चर्मकाराचे हे स्मारक असल्याची जनश्रुती आहे
समोरच पूपूर्वेकडे मुख असलेल्या मंदिराची रचना मंडप ते गर्भगृह अशी आहे. आज या ठिकाणी नवीन तयार केलेला मंडप दिसतो. या मंडपाचे अगोदर दगडी खांबावर आधारलेला मंडप होता तो कॉक्रिट चे नवनिर्माण करताना काढून टाकल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे येथील मंदिराचा काळ ठरविणे अशक्य आहे मात्र मंदिराचे काम कोटाचे कामा पूर्वेचे आसवे हे निश्चीत.
मंदिराचे पूर्वाभिमुख गर्भगृहात उतरून जावे लागते. गर्भगृहाचे मध्यभागी खंडोबा म्हाळसा यांची छोटी स्वयंभू लिंगे आहेत यांना पितळी मुखवटे लावतात लिंगाचे कडेने योनीचा आकार तयार केलेला आहे. या लिंगाचे पाठीमागे एका चौथऱ्यावर खंडोबा, म्हाळसा, बाणाई यांच्या बसलेल्या मुर्ती आहेत. शेगूड गावा जवळील म्हाळुंगी गावातील एका भक्ताचे भक्तीने देव येथे लिंग रूपाने प्रगटला अशी जनश्रुती आहे.
कोटाचे आग्नेय कोपऱ्यात एक दगडाने बांधलेली विहीर असुन तिला तीर्थाची विहीर असे म्हणतात,
मुख्य मंदिरामागे पूर्वाभिमुख मंदिरात शिवलिंग आहे.
कोटाचे नैऋत्य कोपऱ्याच्या पूर्वाभिमुख ओवरीत विठ्ठल रुक्मिणीची स्थापना केलेली आहे.
शेजारील ओवरीत लाकडी घोडा असुन तो मार्गशीर्ष महिन्यात उत्सवाचे वेळी दर्शना साठी व मिरवणुकीसाठी बाहेर काढला जातो.
कोटाचे उत्तर बाजुस कोटा मध्ये सतीशिळा आहेत या ठिकाणी अनेक विरगळ व सतीशिळा होत्या त्या मंदिराचे नवीन काम करताना काढण्यात आल्या.
उत्तर बाजूचे ओवरीत गणपतीची मुर्ती आहे.
कोटाचे पश्चिम व उत्तर बाजुने एक ओढ वाहतो कोटाची पश्चिम बाजू व ओढ्याचे मध्ये दक्षिण बाजुस एक घुमटीत पादुका आहेत या ठिकाणी लोक नवसाचे बळी देतात याच ठिकाणी उत्तरबाजुस ईस १९९० मध्ये मंदिराचे मंडपाचे काम करताना जुन्या मंडपाचे अवशेष येथे टाकल्याचे ग्रामस्थ सांगतात. आता ते गाडले गेले आहेत.
यात्रा उत्सव
चंपाषष्टी
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस घट स्थापना होते.
चंपाषष्टीस देवाचा लाकडी घोडा दर्शनासाठी बाहेर काढला जातो.
मार्गशीर्ष शुद्ध षष्टीस खंडोबा म्हाळसा यांचा विवाह सोहळा होतो.
मार्गशीष पौर्णिमेस देवाचा छबिना रात्री निघतो.
छबीन्या पुढे लाकडी घोडा लोक खांध्यावर घेऊन नाचतात.
छबिना रात्रभर चालतो व पहाटे मंदिरात पोहोचतो.
सकाळी कुस्त्यांचा आखाडा होऊन उत्सव संपतो.
सोमवतीस देव अंघोळीसाठी महाळूगी गावातील डोहा वर जातात.


