नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२८७१
हित जाणे चित्त । कळों येतसे उचित ॥१॥
परिहार ते संपादणी । सत्य कारण कारणीं ॥ध्रु.॥
वरदळ तें नुतरे कसीं । आगीमध्यें तेंथें रसीं ॥२॥
तुका म्हणे करुनी खरें । ठेवितां तें पुढें बरें ॥३॥
अर्थ
आपले हित कशात आहे हे चित्त जाणत असते आणि चित्ताला त्यामुळेच योग्य काय आहे ते कळून येत असते. नुसतेच परमार्थाचे सोंग संपादनी करुन लोकांमध्ये त्याचा दंभ दाखवण्यात काहीही उपयोग नसतो आपण परमार्थामध्ये जे सत्य कर्म करतो तेच फलासाठी कारण ठरतात. हिणकस पदार्थ कसासाठी खरा उतरत नाही कारण तो अग्नीमध्ये घातला तर त्या रसामध्ये हिणकस पदार्थ राहतोच. तुकाराम महाराज म्हणतात, “त्यामुळेच आपले चित्त हे खरे म्हणजे चांगले करुन ठेवावे ते जर चांगले करुन ठेवले तर ते पुढे आपल्या हितासाठी चांगलेच ठरते.”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
